Tonic 
वुमेन्स-कॉर्नर

आईशी संवाद : मुलांना टॉनिक द्यावे का?

डॉ. अमोल अन्नदाते, बालरोगतज्ज्ञबालरोगतज्ज्ञ

प्रत्येक पालकाला वजन वाढण्यासाठी टॉनिकचे प्रीस्क्रिप्शन हवे असते. विशिष्ट वयात काही व्हिटॅमिन्स व लोह सोडले तर नियमित द्यावे अशा टॉनिकची मुलांना गरज नसते; पण काही आजार किंवा परिस्थितीत डॉक्टरांनी स्वतःहून काही मल्टिव्हिटॅमिन ठरवून दिलेल्या कालावधीसाठी दिले तर नाकारू नये.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गरजेचे आहे व द्यावे असे टॉनिक सप्लिमेंट्स 

  • बाळ नॉर्मल वजनाचे म्हणजे २.५ किलो व पूर्ण ९ महिन्यांत जन्माला आले असेल तर -
  • व्हिटॅमिन डी - जन्मानंतर पहिल्या वर्षात रोज ४०० आययू ( इंटरनॅशनल युनिट्स) व्हिटॅमिन डी प्रत्येक मुलाला आवश्यक असते. यानंतर १८ वर्षाचे होईपर्यंत दर तीन महिन्यांनी ६०,००० आययू द्यायला हवे. हे तोंडावाटे द्यायचे व्हिटॅमिन असते. 
  • आयर्न/लोह - ६ महिन्यांनंतर वरचे अन्न सुरू केल्यापासून रोज रात्री ३ मिलिग्रॅम प्रती किलोप्रमाणे आयर्न/ लोह २ वर्षापर्यंत द्यायला हवे. या दरम्यान जर हिमोग्लोबिन ११ पेक्षा कमी असल्याचे आढळून आले, तर लोहाचे टॉनिक ६ मिलिग्रॅम/ किलोप्रमाणे ३ महिन्यांसाठी द्यावे. 
  • कुटुंब व मूल शाकाहारी असेल तर : कुटुंब व मूल शाकाहारी असल्यास व मूल दूध, दही व दुग्धजन्य पदार्थ खात नसल्यास बी १२ या व्हिटॅमिनची कमतरता निर्माण होते. अशा वेळी बालरोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने बी १२ व्हिटॅमिनचे सप्लिमेंट घ्यावे लागते.
  • या व्यतिरिक्त चांगला संतुलित आहार असलेल्या बाळाला नियमित टॉनिक देण्याची गरज नसते.

कमी वजनाचे व नऊ महिने पूर्ण होण्याआधी जन्माला आलेले बाळ  

  • या बाळाला व्हिटॅमिन डी हे नॉर्मल असलेल्या बाळासारखे द्यावे लागतेच; पण लोह/आयर्न मात्र पहिल्या महिन्यात बाळ आईचे दूध पिऊ लागले, की लगेच सुरू करावे लागते. 
  • व्हिटॅमिन ए, ई, के : डी व लोहाव्यतिरिक्त कमी वजनाच्या व ९ महिन्यांआधी जन्मलेल्या बाळाला हे चार व्हिटॅमिन्स असलेले औषध द्यावे लागते. 

विशिष्ट्य आजारामध्ये व्हिटॅमिन 

  • कावीळ : काही काळासाठी व्हिटॅमिन ए, ई, के द्यावे लागतात. 
  • जुलाब : जुलाब बरे झाल्या नंतर एक महिना रोज ५ मिलिग्रॅम झिंक देणे गरजेचे असते. याने जुलाब होत नाहीत 
  • किडनी व हृदयाचे आजार : संबंधित तज्ज्ञांच्या सल्ल्याने टॉनिक द्यावे लागतात. 
  • अतिचंचल मुले : ओमेगा थ्री असलेले सिरप द्यावे लागते. 
  • वारंवार तोंड येत असल्यास : बी कॉम्प्लेक्स, फोलिक अॅसिड, बी १२ ही व्हिटॅमिन्स द्यावे लागतात. 
  • गोवर : व्हिटॅमिन ए द्यावे लागते. 
  • स्कर्व्ही : व्हिटॅमिन सीच्या तीव्र कमतरतेमुळे होणाऱ्या या आजारात व्हिटॅमिन सी द्यावे लागते. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT