Generation-Next 
वुमेन्स-कॉर्नर

जनरेशन नेक्स्ट : व्यवसायासाठी सोशल मीडिया कंन्टेट

प्रसाद शिरगांवकर

सोशल मीडियावर आपल्या व्यवसायाचं पेज किंवा प्रोफाइल उघडल्यानंतर त्याला पुरेसे फॉलोअर्स मिळवणं, ही अत्यंत महत्त्वाची पायरी असते, हे आपण गेल्या भागात बघितलं. असे फॉलोअर्स मिळविण्यासाठी आपण आपल्या प्रोफाइलवर किंवा पेजवर नेमकं काय प्रकाशित करतो, हे महत्त्वाचं असतं. आपल्या व्यवसायाच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करायचा कन्टेंट नेमका काय असावा आणि तो कसा पोस्ट करावा, याविषयी या भागात चर्चा करूया.

नियमित पोस्ट हव्यात
मार्क झुकेरबर्ग यांच्याकडं ‘फेसबुक’प्रमाणेच ‘व्हॉट्सॲप’चीही मालकी आहे. या आणि अशा सोशल मीडियावर आपण प्रोफाईल सुरू केल्यानंतर पहिल्या चार-पाच पोस्ट काय असाव्यात, हे आधीच तयार करून ठेवून त्या पहिल्या आठवडाभरात पोस्ट कराव्यात. त्यापुढेही, आपण तयार केलेली सर्व माहिती  एकाच वेळी एकाच दमात पोस्ट करू नये, तर ती टप्प्याटप्प्यानं काही दिवसांच्या अंतरानं पोस्ट करत जावी.  खरं तर आपण पुढचा महिनाभर किंवा दोन-तीन महिनेही काय पोस्ट करणार आहोत, याचं नियोजन करून त्या पद्धतीनं आपला कन्टेंट तयार करून ठेवावा आणि तो टप्प्याटप्प्यानं पोस्ट करत जावा. कारण, एकदम एकाच वेळी आलेल्या भरपूर पोस्ट्सपेक्षा नियमितपणे येत राहणाऱ्या पोस्ट्सना जास्त प्रतिसाद मिळतो. कोणत्याही व्यावसायिकांना आपल्या स्वतःच्याच वस्तू व सेवांविषयीचा असा वैविध्यपूर्ण आणि रोचक कन्टेंट तयार करणं हे प्रथमदर्शनी अवघड वाटू शकतं.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपण आपल्या व्यवसायावर लक्ष द्यावं, की असा कन्टेंट तयार करणं आणि प्रकाशित करण्यावर लक्ष द्यावं, अशी द्विधा अवस्था होऊ शकते. मात्र, व्यवसायाचं सोशल मीडिया प्रोफाइल आपल्या मार्केटिंगसाठीचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, हे लक्षात ठेवा. त्यासाठी लागणारा कन्टेंट स्वतः तयार करणे शक्य नसल्यास सेवा देणारे व्यावसायिक सध्या उपलब्ध आहेत. आवश्यक तिथं अशा सेवा जरूर घ्याव्यात. आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलवर सातत्यानं भरपूर रोचक कन्टेंट प्रकाशित करत राहून फॉलोअर्स वाढवावेत.

प्रोफाइल असे असावे...

  • आपल्या व्यवसायाची संपूर्ण माहिती, आपण देत असलेल्या वस्तू किंवा सेवांची संपूर्ण यादी त्यांच्या किमतीसह.
  • आपल्या वस्तू आणि सेवांची गुणवैशिष्ट्ये यांचा तपशील. 
  • उत्पादनाचं वेगळेपण काय आहे, आपल्या स्पर्धकांपेक्षा आपण वेगळं काय देत आहोत, ग्राहकांना नेमका अधिक फायदा काय देत आहोत.
  • ही सर्व माहिती देताना फक्त लिखित स्वरूपात न देता फोटो आणि व्हिडिओचा वापर करावा. 
  • सोशल मीडिया हे एक दृक्श्राव्य माध्यम आहे आणि तिथं अत्यंत रोचक असे दिसणाऱ्या फोटो किंवा व्हिडिओंना जास्त प्रतिसाद मिळतो. 
  • आपल्या वस्तू वा सेवांविषयीचा कन्टेंट तयार करताना शक्य तिथं चांगल्या दर्जाचे फोटो आणि व्हिडिओ यांचा वापर करावा. 
  • यासाठी ‘प्रोफेशनल’ फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी लागत नाही. आपल्या हातातल्या चांगला कॅमेरा असलेल्या मोबाईलमधूनही हे करता येतं. 
  • आपल्या या मूलभूत माहितीबरोबरच, आपल्या ग्राहकांचे आपल्या वस्तू किंवा सेवांविषयीचे अभिप्रायही आपल्या पेजवर प्रकाशित करावेत. 
  • आपण वेळोवेळी देत असलेल्या ऑफर्स आणि डिस्काउंट्सची माहिती पेजवर प्रकाशित करत राहावी. 
  • मात्र, आपल्या वस्तू वा सेवांची माहिती, त्यांची गुणवैशिष्ट्ये ऑफर्सचा सतत भडिमार करू नये. 
  • वेगवेगळ्या प्रकारचा कन्टेंट देत आपल्या प्रोफाइलवर सतत वैविध्यपूर्ण माहिती येत राहिली, याची काळजी घ्यावी.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणारे आजोबा! राज ठाकरेंनी शेअर केला प्रबोधनकरांसोबतचा लहानपणीचा फोटो; जयंतीनिमित्त सांगितली आठवण

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

दीड वर्षही झालं नाही आणि झी मराठीची आणखी एक मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या भावुक पोस्टमुळे चर्चेला उधाण

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Junnar News : जुन्नर तालुक्यातील रस्त्यांना कायदेशीर ओळख; सांकेतिक क्रमांक देणारे बोरी बुद्रुक पहिले गाव

SCROLL FOR NEXT