Contact Lens Sakal
वुमेन्स-कॉर्नर

मेकअप-बिकअप : कॉन्टॅक्ट लेन्स आणि डोळ्यांचा मेकअप

कॉन्टॅक्ट लेन्स या तशा चष्म्याला पर्याय म्हणून लावल्या जायच्या. मात्र, अलीकडच्या काळात सुंदर दिसण्यासाठीही कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्या जातात.

सकाळ वृत्तसेवा

कॉन्टॅक्ट लेन्स या तशा चष्म्याला पर्याय म्हणून लावल्या जायच्या. मात्र, अलीकडच्या काळात सुंदर दिसण्यासाठीही कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्या जातात. डोळे हा नाजूक भाग असल्याने कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना विशेष काळजी घ्यावी लागते. त्याचबरोबर या लेन्स लावल्यानंतर, अनेक जणी डोळ्यांचा मेकअप करावा की नाही या संभ्रमात असतात. आज आपण या लेन्स लावल्यानंतर डोळ्यांच्या मेकअपसाठी कोणती उत्पादने वापरू शकता, हे पाहूया.

  • बरेचदा हाताला बारीक कचरा चिकटून असल्याने त्याचे इन्फेक्शन डोळ्यांना व्हायची शक्यता असते. त्यामुळे डोळ्यांमध्ये कॉन्टॅक्ट लेन्स लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्यायला हवेत.

  • मेकअप करण्यापूर्वीच लेन्स लावून घ्या. अनेकदा मेकअप केल्यानंतर लेन्स लावल्या जातात; पण असे केल्याने डोळ्यांत कचरा जमा होतो आणि चुरचुरते. त्यामुळे कधीही मेकअप करण्यापूर्वीच लेन्स लावाव्यात.

  • लेन्स लावल्यानंतर डोळ्यांचा मेकअप करताना सावधानता बाळगा. डोळे चोळले जाणार नाहीत, जास्त दाब दिला जाणार नाही याची दक्षता घ्या.

  • आयलायनर ‘वॉटरलाइन’वरच लावले गेले पाहिजे. कधीकधी आयलायनर लावताना ते ‘वॉटरलाइन’च्या आत सरकले जाते. असे होता कामा नये, यासाठी विशेष काळजी घ्यायला हवी.

  • कॉन्टॅक्ट लेन्स वापरणार असल्यास पावडर आयशॅडोऐवजी क्रीम आयशॅडो लावायला हवा.

  • मस्कारा लावताना विशेष काळजी घ्यायला हवी. डोळ्यांच्या फार जवळ धरून पापण्यांना मस्कारा लावू नये. शक्य तितक्या लांब ब्रश धरून मस्कारा लावावा. ‘लॅश बिल्डिंग मस्काऱ्या’पासून दूरच राहावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT