Makeup Sakal
वुमेन्स-कॉर्नर

मेकअप-बिकअप : चेहऱ्याला परफेक्ट लूक देणाऱ्या आयब्रो!

दैनंदिन जीवनात तुम्ही तुमचे आयब्रोचा आकार व्यवस्थित ठेवू शकत असाल, तर तुम्हाला परफेक्ट लूकसाठी फार काही करण्याची गरज भासत नाही.

सकाळ वृत्तसेवा

दैनंदिन जीवनात तुम्ही तुमचे आयब्रोचा आकार व्यवस्थित ठेवू शकत असाल, तर तुम्हाला परफेक्ट लूकसाठी फार काही करण्याची गरज भासत नाही. मात्र, बऱ्याचदा सेलिब्रिटींसारखे दिसण्याच्या नादात अनेक जण आपल्या आयब्रोचा आकार बिघडवून ठेवतात. परिणामी चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील मूळ आयब्रोच्या आकाराला धक्का न देता आयब्रो कोरले गेले पाहिजेत.

  • आयब्रो कोरण्याच्या नादात आयब्रोजचा नैसर्गिक आकार बदलू नका.

  • आयब्रोचा आकार बदलला असेल आणि मूळ स्वरूपात तो परत आणायचा असल्यास, आयब्रोज ६ ते ८ आठवडे वाढू द्या. त्यानंतर आयब्रो करा.

  • चेहरा सुंदर दिसण्यासाठी खोटे आर्क काढू नका. असे केल्यास आयब्रोचा मूळ आकार तर बदलतोच; पण बऱ्याच जणींना ते आर्क चांगलेही वाटत नाहीत.

  • आयब्रो कोरणे म्हणजे फक्त जादाचे केस प्लक करणे होय.

  • प्रत्येकाच्या आयब्रोचा आकार हा वेगळा आणि युनिक असतो. हे युनिक आयब्रोच आपल्या चेहऱ्याला वेगळेपण देत असतात. त्यामुळे आयब्रो कोरण्याच्या नादात हे वेगळेपण गमावू नका.

  • आयब्रो करण्यासाठी थ्रेडिंग करण्यापेक्षा वॅक्सिंग किंवा ट्विजींग चांगले असते. कारण, थ्रेडिंग केल्यानंतर आयब्रो लवकर वाढतात. या उलट वॅक्सिंग किंवा ट्विजींगचा परिणाम जास्त काळ राहतो.

  • हल्ली घरच्या घरी आयब्रो करण्यासाठीही पर्याय उपलब्ध आहेत. ‘आयब्रो ट्रिमर’चा वापर करून तुम्ही घरच्या घरी आयब्रो करू शकता.

  • मेकअप करताना आयब्रोचा मेकअपसुद्धा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. आयब्रो दाट दिसण्यासाठी आयब्रो पेन्सिलचा वापर करू शकता. यासाठी आयब्रोच्या सुरवातीला, मध्यभागी आणि टोकाला असे तीन ठिपके काढून घ्या. त्यानंतर हे तीन ठिपके देऊन आयब्रोचा आकार हायलाइट करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT