Office Makeup Sakal
वुमेन्स-कॉर्नर

मेकअप-बिकअप : ऑफिस मेकअप

दैनंदिन जीवनात तुम्हाला चांगले दिसायचे असेल, आणि प्रेझेंटेबल राहायचे असल्यास तुमचा लूक चांगला असणे गरजेचे आहे.

सकाळ वृत्तसेवा

दैनंदिन जीवनात तुम्हाला चांगले दिसायचे असेल, आणि प्रेझेंटेबल राहायचे असल्यास तुमचा लूक चांगला असणे गरजेचे आहे. अनेक जणींना दररोज मेकअप करण्याची सवय असते. मात्र, हा मेकअप कधीकधी इतका भडक होतो, की आपण ऑफिसमध्ये असलेल्या सौम्य वातावरणात बटबटीत दिसू लागतो. हे टाळण्यासाठी ऑफिसच्या ठिकाणी योग्य मेकअप करण्याची गरज आहे.

  • आधी चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. त्यानंतर मॉइश्‍चरायजर लावा. मॉइश्‍चरायजर चेहऱ्यात उतरल्यानंतर सनस्क्रीन लावावे.

  • चेहऱ्यावर लाइट फाउंडेशन लावावे. ते नसल्यास त्याऐवजी तुम्ही बीबी-सीसी क्रीमचा देखील वापर करू शकता. लक्षात ठेवा, इतर ब्रायडल लूकप्रमाणे फाउंडेशन लावू नये. यामुळे चेहऱ्यावरचा थर ऑफिसच्या वातावरणात सहज दिसून येतो.

  • चेहऱ्यावर डाग किंवा पुरळ असल्यास कन्सिलरचा वापर करा. कन्सिलर निवडताना एक शेड लाइट निवडावी. जेणेकरून तो चेहऱ्याला सूट होईल. कन्सिलर फक्त डाग किंवा पुरळ असलेल्या ठिकाणीच लावावे.

  • पूर्ण चेहऱ्यावर कॉम्पॅक्ट पावडर लावावी. त्यानंतर हलक्या रंगाच्या ब्लशचा वापर करावा. ब्लशचा वापर गालावर, हनुवटीवर, नाकाच्या टोकावर, मानेच्या काही भागावर आणि थोडासा कपाळावर करावा.

  • सर्वांत शेवटी आयलायनर आणि मस्कारा लावावा. डोळ्यांचा मेकअप गडद करणार असल्यास लिपस्टिकची लाइट शेड वापरावी. लिपस्टिक लावायची नसल्यास लिपग्लॉस किंवा लिप बामचा वापर करावा.

  • हेअरस्टाइलही तेवढीच महत्त्वाची असते. ऑफिस लूकसाठी फार फॅन्सी हेअरस्टाइल करू नये. सॉफ्ट कर्ल करून मोकळे सोडलेले केसही चांगला लूक देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT