Charul malik Sakal
वुमेन्स-कॉर्नर

माय फॅशन : ‘शरीराला साजेसे पोशाख हवेत’

डेनिम हा प्रकार माझा आवडता प्रकार आहे, हा प्रकार सर्वांवर शोभून दिसतो. मला शॉर्ट स्‍कर्ट्‌स घालायलाही आवडतात, कारण त्‍यामध्‍ये मला कम्फर्टेबल आणि हलके वाटते.

सकाळ वृत्तसेवा

डेनिम हा प्रकार माझा आवडता प्रकार आहे, हा प्रकार सर्वांवर शोभून दिसतो. मला शॉर्ट स्‍कर्ट्‌स घालायलाही आवडतात, कारण त्‍यामध्‍ये मला कम्फर्टेबल आणि हलके वाटते.

- चारुल मलिक

डेनिम हा प्रकार माझा आवडता प्रकार आहे, हा प्रकार सर्वांवर शोभून दिसतो. मला शॉर्ट स्‍कर्ट्‌स घालायलाही आवडतात, कारण त्‍यामध्‍ये मला कम्फर्टेबल आणि हलके वाटते. माझी मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मध्‍ये मी सर्व पाश्चिमात्‍य पोशाख घालते, ज्‍यामधून मी स्‍टायलिश, उत्‍साहपूर्ण व कम्फर्टेबल वाटते.

मी अविचाराने ट्रेंड्स फॉलो करत नाही. त्‍याऐवजी मी मला शोभून दिसणारे व योग्‍य वाटणारे पोशाख घालते. पोशाख घालताना हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे, की ते नेहमीच चांगल्‍या स्थितीत असले पाहिजेत. तुम्‍ही शरीराला फिट होणारे पोशाख घालत असाल, तर अन्य गोष्टींचीही काळजी घ्‍या, ज्‍यामुळे तुम्‍हाला अस्‍वस्‍थ वाटणार नाही. तसेच साडी नेसताना तुमच्‍या शरीरयष्‍टीनुसार योग्‍य फॅब्रिक निवडणे महत्त्वाचे आहे; पण माझ्या मते, साडीसोबत हिल्‍स घालणे आवश्‍यक आहे, कारण त्‍यामधून तुम्‍हाला आकर्षक लूक मिळतो आणि तुमच्‍या शरीराची ठेवणदेखील सुधारते. माझ्या मते, दिवसा साडी नेसताना अधिक भडक रंग टाळले पाहिजे.

माझा एकच फॅशन फंडा आहे, तो म्‍हणजे आपल्‍या शरीराला साजेसा पोशाख घालणे. मी ब्रॅण्डेड किंवा नॉन-ब्रॅण्‍डेडला अधिक महत्त्व देत नाही. मी दिसायला सुंदर व मोहक बनवणारे पोशाख घालते. माझ्या मते, आपण मूडनुसार रंगांची निवड करावी. सायंकाळच्‍या वेळी काळ्या रंगासारखे गडद रंगांचे पोशाख घालू शकता आणि दिवसा पेस्‍टल व फ्लोरलसारख्‍या सौम्‍य रंगांचे पोशाख घालू शकता. मात्र, तुमच्‍या रंगानुसार पोशाखांच्या रंगाची निवड करणे योग्य आहे.

मला दीपिका पदुकोण खूप आवडते. ती उंच आहे आणि तिची मोहक शरीरयष्‍टी आहे. ती परिधान करणाऱ्या पोशाखांमधून खूपच आकर्षक दिसते. मी तिची स्‍टाइल व फॅशन आत्‍मसात करते. ती सतत प्रयोग करत राहते आणि याच गुणामुळे मी तिच्‍याकडे माझी फॅशन आयकॉन म्‍हणून पाहते.

फॅशन टिप्‍स

  • कम्फर्टेबल व आत्‍मविश्‍वासपूर्ण वाटेल असे पोशाख परिधान करा.

  • तुमच्‍या शरीरयष्‍टीनुसार पोशाख परिधान करा.

  • गरजेपेक्षा अधिक अधिक आभूषणे घालू नका.

  • तुमच्‍या मूडनुसार पोशाखांची निवड करा.

  • ज्या पोशाखांची निवड कराल, त्या पोशाखांबाबत समाधानी राहा.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT