वुमेन्स-कॉर्नर

दोन विचारांमधील पॉज...

देवयानी एम

पुणे : तुमच्याकडं पाळलेलं कुत्रं किंवा मांजर आहे का? ते पिल्लू असताना आणलं, त्याला खायला घातलं, वेळोवेळी औषधोपचार केले, प्रेम दिलं, गोंजारलं, त्याच्याबरोबर खेळलात, त्याचा सांभाळ केला आणि एक दिवस ते तुम्हालाच येऊन कचकन् चावलं तर कसं वाटेल? अरे, मी पाळलेलं मलाच नुकसान करत आहे! आपलं मन कधीकधी (बऱ्याचदा) असंच करतं. त्याच्याबरोबर आपण लहानाचे मोठे झालो, त्याला वेळोवेळी गोंजारलं, सांभाळलं, हवं नको ते दिलं, पण अनेक प्रसंगी ते आपलंच दुश्मन बनतं.

विचारचक्र आणि स्ट्रेस
मी गेल्या एक-दीड आठवड्यापासून अनेक जणांकडून गांगरलेल्या, गोंधळलेल्या आवाजात, ‘पुन्हा लॉकडाउन होणार आहे का?’, ‘असं म्हणतात बाबा’, ‘तुम्हाला काही माहिती आहे का?’, ‘खरंच लॉकडाउन होणार आहे का?’ असे ढीगभर प्रश्न एकमेकांना आणि मलाही विचारताना ऐकलं. जी गोष्ट अजून घडलेलीच नाही, नियमावली जाहीर झाली नाही, खात्रीशीर बातमी अजून बाहेर आली नाही त्याच्या आत आपले विचार व आपलं मन सैरावैरा धावत सुटलं. गोंधळ, अतिविचार आणि त्यामुळं स्ट्रेस असे चक्र चालू होऊ लागतं. अनावश्यक विचारांनी उगीचच डोक्यातली जागा अडून बसते. म्हणजे बाहेर गोष्टी घडायच्या आत आपल्या मनात निर्माण होऊन, मोठ्या होऊन, उच्छाद मांडू लागतात. याची काहीच गरज नसते खरंतर. लॉकडाउन झाला तर जे करायला लागणार आहे, ते तुम्ही करणारच आहात. प्रत्यक्ष घटना घडायच्या आधी त्याची रंगीत तालीम मनात सुरू होते. अशा प्रकारे विचारांची भुणभुण हरप्रसंगी होत गेली, तर हळूहळू मन अशा पॅटर्नच्या आहारी जायला लागते.

विचारचक्र थांबण्यासाठी...
आता हे विचारांचं चक्र थांबवायचं कसं? आपल्यातील प्रत्येकाला हा प्रश्न आहेच आणि त्याची नितांत गरज देखील आहे. विचारांना विचार थांबवू शकत नाहीत. विचारांवर एकच शस्त्र आहे ते म्हणजे शांतता. शांत बसणं इतकं सोपं असतं तर प्रश्नच मिटला असता! या शांततेची प्रॅक्टिस योग सरावात होत असते. नियमित योगसाधना दोन विचारांमध्ये पॉज निर्माण करायला शिकवते. हा पॉज आपल्याला हळूहळू वाढत न्यायचा आहे. जितकी याची प्रॅक्टिस होईल तितकी मनाला सवय लागत जाते आणि हळूहळू मनाची ठेवण बनते. अशी सवय विकसित झाल्यावर एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर माकड उड्या मारतं, तसं मन एका विचारावरून दुसऱ्या विचाराकडं धावणार नाही. त्याला थांबायची सवय लागेल. मग बाहेरून उत्तेजन आलं, तरी विचारांचा गदारोळ न होता ‘थांबा, पाहा, पुढे जा’ असे आपोआप व्हायला लागेल. कारण अगोदरच विचारांनी थकलेल्या मनाला या शांत बसण्यानं विश्रांती मिळेल आणि मग ते मन अशी विश्रांती कशी मिळेल यासाठी योगाद्वारे प्रयत्न करू लागेल. विचारांना थांबवायचं कसं हे शास्त्र आपल्याला योग शिकवतो, ते समजलं आणि विकसित केलं, की मग तेच विचार कधी थांबवायचे ही कला आपोआप आत्मसात होत जाईल.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi cabinet meeting: मोठी बातमी! मोदी सरकार 'या' राज्याचे नाव बदलणार... कॅबिनेट बैठकीत घेणार महत्त्वाचा निर्णय

Pune Air Pollution: पुण्याच्या हवेत तासाला मिसळते ६ टन सिमेंट; आरोग्यासाठी गंभीर धोका

लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! योजनेचे अडकलेले हफ्ते लवकरच खात्यात जमा होणार; महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय, पण कोणता?

उड्डाणानंतर हवेतच विमानाचं इंजिन फेल, १५० प्रवाशांचा जीव टांगणीला; दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

Gokul Dudh Sangh Election : गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया दोन दिवसांत, कोल्हापुरात पुन्हा राजकीय धुरळा उडणार

SCROLL FOR NEXT