वुमेन्स-कॉर्नर

माती, खडू खाण्याचा आजार 

डॉ. अमोल अन्नदाते

लहान मुलांना माती किंवा इतर गोष्टी खाण्याची सवय असते. यात खडू, पाटीची पेन्सिल, पेपर, साबण, प्लॅस्टर, भिंत चाटणे, क्ले, कोळसा, राख, पेंट, खेळणी चाटणे अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. थोड्याफार प्रमाणात कळत नसल्याने दुसऱ्या वर्षापर्यंत या गोष्टी नॉर्मल असतात, पण दुसऱ्या वर्षानंतर सतत एक महिना अशी माती व इतर वस्तू खाण्याची लक्षणे दिसत असल्यास त्याला ‘पायका’ असे म्हटले जाते व उपचाराची गरज असते. 

वय 
मुलांमुलींमध्ये २ वर्षांपासून ते १८ वर्षांपर्यंत हा आजार कधीही दिसू शकतो. अनेक जणांना मोठे झाल्यावरही त्यातच महिलांना गरोदर असतना माती, खडू खाण्याची इच्छा होते. लहान मुलांमध्ये मतिमंदत्व, स्वमग्नता (ऑटिझम) तसेच इतर मानसिक आजारात याचे प्रमाण जास्त आढळून येते. 

कारणे 
- सहसा शरीरात लोहाची कमतरता माती व इतर गोष्टी खाण्याची इच्छा होण्यामागचे मुख्य कारण असते. त्यासोबत झिंक व काही प्रमाणात कॅल्शियमची कमतरता असते, पण कॅल्शियमपेक्षाही लोह हाच यात महत्त्वाचा घटक आहे. 
- मानसिक तणावामुळे ही मुले माती खातात. पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष होत असेल, तर मुले लक्ष वेधून घेण्यासाठी माती खातात. दुष्परिणाम माती खाल्ल्यामुळे जंताचा त्रास तर होतोच, शिवाय जेवण कमी जाते व शरीरात इतर जीवनसत्वांची कमतरता निर्माण होते. तसेच खडे किंवा खात असलेल्या इतर गोष्टी पोटात अडकून आतड्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. यासाठी ऑपरेशनही करण्याची गरज पडू शकते. 
- माती व इतर गोष्टी खाणाऱ्या मुलांमध्ये जुलाब व कुपोषणाचे प्रमाण जास्त असते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

उपचार 
- यासाठी तीन महिने सहा मिलीग्रॅम प्रती किलोग्रॅम याप्रमाणे रोज रात्री झोपताना लोहाचे औषध द्यावे लागते. तीन महिन्यांनंतर गरज असल्यास १ मिलीग्रॅम प्रती किलोग्रॅम या कमी डोसमध्ये ते सुरू ठेवावे लागते. 
- यासोबत तीन दिवस रात्री झोपतना जंताची गोळी – अल्बेनदेझोल किंवा डोसाप्रमाणे पातळ औषध स्वरुपात द्यावी लागते. लोह दिल्यावर काही दिवसांनी माती खाणे कमी झाले तर जंताची गोळी तीन महिन्यांनी एकदा परत द्यावी लागते. 
- माती खाणाऱ्या मुलांना अधिक मानसिक आधार द्यावा. त्यांना माती खाताना बघितले तर लगेच रागावू नये. याविषयी त्यांना भीती दाखवून, मारून ही सवय जात नाही. 
- उपचार सुरु केल्यावर मुलाला माती खाण्याची संधी मिळणार नाही, याबद्दल दक्षता घ्यावी. 
- माती , खडू, पेन्सिल खाताना दिसला तर त्याला याबद्दल प्रेमाने सांगून, या गोष्टी त्याच्याकडून घ्याव्यात व त्याच्या आवडत्या खेळणी, वस्तू द्याव्यात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England vs Argentina: ७ मिनिटांत मॅच फिरवली! अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक; इंग्लंडचे ६० वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले

भारतावर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचं अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक; रशियाच्या तेल खरेदीवरुन पाच देशांवर संकट?

Kannad Water Supply Scheme : कन्नड शहरासाठी ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर! ​आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

Tukaram Mundhe: सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंच्या पथकाचा दणका; पुण्यातलं दुकान केलं सील, आठ लाखांचा माल जप्त

Mangalwedha News : स्व. नागनाथ आण्णाचा पाण्याचा लढा पुढे कायम ठेवू; प्रा. शिवाजीराव काळुंगे

SCROLL FOR NEXT