mother-baby 
वुमेन्स-कॉर्नर

वूमन हेल्थ  : वंधत्व, प्रसूती आणि नवीन तंत्रज्ञान 

डॉ. विशाल गावडे

प्रसुतीचा काळ स्त्रीच्या जीवनातील अविस्मरणीय आणि आनंददायी असतो. अर्थात, या काळात आरोग्याची अधिक काळजी घेणे, तणावाचे व्यवस्थापन गरजेचे आहे. आपल्या पोटात एक नवीन जीव निर्माण होणे, ही कल्पना आणि त्या जीवाला वाढवण्याचा अनुभव स्त्रीच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवतो. 

एकीकडे काही लोकांना हा नैसर्गिक प्रसूतीच्या आनंददायी अनुभव मिळत असताना, पुरुष आणि स्त्रियांमधील वाढणाऱ्या वंध्यत्वाचे प्रमाण चिंताजनक आहे. हे प्रमाण पुरुष आणि स्त्रियांमध्ये एक समान असले, तरी याला कारणीभूत ठरणारे अनेक जोखमीचे घटक आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने माता होण्याचे, गर्भधारणेचे वय पुढे ढकलणे हे असून याशिवाय जीवनशैली, पीसीओएस (पॉलीसिस्टिक ओवॅरियन सिंड्रोम), एन्डोमेट्रिओसिस, मासिक पाळी, काही प्रकारचे संसर्ग, आर्थिक स्थिती आणि कामाच्या ठिकाणी असलेली जोखीम याचा समावेश आहे. 

वंध्यत्वाचे भावनिक आणि सामाजिक दुष्परिणाम दिसून येतात. आधुनिक काळात काही जोडपे मूल न होऊन देण्याचा निर्णय घेतात, तरी दुसरीकडे अनेक भारतीय जोडप्यांमध्ये गर्भधारणेची असमर्थता ही नैराश्य, ताण वाढवणारी ठरू शकते. त्यांच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. वंधत्व पुरुष आणि महिला दोघांमध्ये एकसमान दिसत असले, तरी ही स्थिती महिलांसाठी कठीण ठरते. 

वाढती जागरूकता, महिला सक्षमीकरण आणि वंध्यत्वाची वाढती संख्या यांमुळे जोडपी उपचारासाठी चिकित्सालयांकडे जात आहेत. परिस्थिती स्वीकारून योग्य सल्ला व उपचार घेण्यासाठी अनेक दांपत्ये पुढे येत आहेत आणि अशा जोडप्यांसाठी नवीन तंत्रज्ञान आशेचे किरण ठरले आहे. या तंत्रज्ञानाला असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (एआरटी) म्हणतात. त्यामध्ये प्रामुख्याने इन-विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) आणि इंट्रा सायटोप्लास्मिक स्पर्म इंजेक्शन (आयसीएसआय) या तंत्रांचा समावेश आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या लेखमालाद्वारे बदलती जीवनशैली व त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम, वंधत्व, नवीन तंत्रज्ञान, प्रसूती आणि प्रसूतीदरम्यान घायची काळजी, सामान्यत- आपल्या मनातील प्रश्‍न यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कांदा उत्पादकांची व्यथा! एकरी खर्च १ लाख, उत्पन्न ६३ हजार; नफा राहुदे, स्वत:चेच ४० हजार खर्च

Mumbai Pune Expressway: पुन्हा टँकर उलटला तर एअरलिफ्ट करणार, चाचणी सुरू; मंत्र्यांनी दिले अपडेट

Latest Marathi News Update : सांगलीत औषधांच्या नावाखाली गोवा बनावट देशी दारूची तस्करी

Marriage Astrology : 'या' महिन्यात जन्मलेल्या व्यक्तीनी अजिबात करू नये 'सिंह' राशीवाल्यांशी लग्न; नाहीतर लग्न अजिबात टिकणार नाही

कश्मीरमध्ये फिरायला जाण्यासाठी नीना गुप्ता यांनी केलेलं लग्न, 'या' कारणामुळे मोडलं Delhi IITमध्ये शिकणाऱ्या मुलासोबतचं नातं!

SCROLL FOR NEXT