Healthy-Food 
वुमेन्स-कॉर्नर

Video : वुमन हेल्थ : गर्भधारणा आणि प्रसूती सुलभ असाव्यात म्हणून सगळ्यात महत्त्वाचे

डॉ. ममता दिघे, स्त्रीरोगतज्ज्ञ

प्रवासाला जाताना आपल्या अवतीभोवती दिसणारी हिरवीगार शेती, डुलणारी कणसे पाहून मन प्रसन्न होते. मात्र, चांगले पीक यायला जमीन सकस असावी लागते, याचा विचार आपण केला आहे का? तिची योग्य वेळी मशागत करावी लागते, तरच चांगले बीज अंकुरते आणि सकस पीक येते. शरीराचे अगदी जमिनीसारखेच आहे. निरोगी आणि तणावशून्य गर्भधारणा, गर्भावस्था, प्रसूती आणि बाळंतपण हवे असल्यास त्याची तयारी गर्भ राहायच्या आधी करून उपयोग नाही. वयात आल्यापासूनच काही गोष्टींकडे नीट लक्ष दिल्यास स्त्रियांचे स्वास्थ्य चांगले राहते आणि त्या पुढील गर्भावस्था पेलायला सक्षम असतात. 

गर्भधारणा आणि प्रसूती सुलभ असाव्यात म्हणून सगळ्यात महत्त्वाचे असते कायम सकस आणि योग्य आहार घेणे. फळे, पालेभाज्या, प्रथिने मिळतील असे खाणे जाणीवपूर्वक आणि योग्य प्रमाणात खाणे अतिशय महत्त्वाचे आहे. चांगल्या आहाराबरोबरच फॉलिक ॲसिड घेणेही लाभदायक ठरू शकते. याचबरोबर नियमित व्यायाम करणेही अतिशय आवश्यक आहे. वजन आटोक्यात असले की, आरोग्य चांगले राहते आणि पुढील शारीरिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पेलता येतात. वजन अनियंत्रित असल्यास पाळी नीट न येणे, ‘पीसीओडी’सारख्या समस्या मागे लागतात. त्यातून पुढील गुंतागुंत वाढत जाते. आहार आणि विहार या दोन्हीबरोबरच स्वतःची प्रजननक्षमता जाणणे, आनुवंशिक मुद्दे लक्षात घेऊन उपाययोजना करणे, वेळेवर लसीकरण करून घेणे, विचार न करता कोणतीही औषधे न घेणे या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत.

आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे स्ट्रेस न घेणे. त्यामुळे त्या बाजूला ठेवायला शिकणे तब्येतीसाठी खूप गरजेचे असते. धूम्रपान, मद्यपान यांसारख्या व्यसनापासून लांब राहणे उत्तम. गर्भधारणेचा विचार करण्याच्या खूप पूर्वीपासून आपले शरीर त्यासाठी आरोग्यपूर्ण ठेवण्यासाठी पुढील पथ्ये नक्की पाळा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT