Appreciation Sakal
वुमेन्स-कॉर्नर

‘पॉवर’ पॉइंट : कौतुकाचे अर्थ अनेक...

हा लेख तुम्ही वाचत असाल तेव्हा तुमचा माझा संवाद सुरू होऊन बरोब्बर अर्ध वर्ष लोटलं असेल.

हर्षदा स्वकुळ

हा लेख तुम्ही वाचत असाल तेव्हा तुमचा माझा संवाद सुरू होऊन बरोब्बर अर्ध वर्ष लोटलं असेल. मोठ्या शहरात आपलं असं कुणी नसणं, कालांतरानं आपण आपलं जग त्यात तयार करणं, आणि कुठूनही आलो असलो तरी आपले विषय सारखेच आहेत याची जाणीव होणं, असं सगळं तुमच्याशी बोलताना मला मागच्या सहा महिन्यांत जाणवलंय. मग कधी कुणी कौतुकाचे चार शब्द बोलले तर मन आनंदी होतं; पण हरळून जात नाही. म्हणजे बघा ना, कुणीतरी आपलं कौतुक करणं ही खरंचच छान भावना असते. मात्र, या कौतुकाच्या काही शेड्स फार घातक असतात असं मला वाटतं.

एका आईला तिच्या मुलाचं फार कौतुक. त्यात नवऱ्याचा ‘असा तापट’ स्वभाव असं म्हणत ती नकळत नवऱ्याच्या विम्झिकल स्वभावाला पदाराखाली घालते आणि मुलावर कौतुकाचा वर्षाव अखंड सुरू ठेवते. अगदी एवढा, की मुलगा चुकला तरी ‘वेड्या आईची वेडी माया’ असं गाणं मागे आपोआप वाजेल. मुलानं वडिलांचे अधिक गुण घेतलेत बहुधा, असं बाकीच्यांना काही वेळा वाटतं; पण आईचं तोंड कौतुक करून थकत नाही. ‘मुलानं माझ्याकडे दुर्लक्ष करण्यातही कसं प्रेम दडलंय,’ हेही ती समाधानानं सांगते.

आईच्या निरागसतेवर मी प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीये; पण जन्मभरच्या या कौतुकातून मुलाचाही असलेला ‘अहोंसारखा तापट स्वभाव’ आईनं तिच्यापुरता, दुसरी बोच नको म्हणून जन्मभर गिळला, ही खंत तिच्याकडे बघितल्यावर जरूर वाटते. तसं आईचं त्यातून काही बिघडलं नाही. तिच्या मनाला शांतता. मुलाचं का काही बिघडावं? सतत आपल्या कानाशी आपल्याबद्दल छानच ऐकायला मिळाल्यानं त्याचा इगो जपला गेला... पण आईच्या कौतुकातून तयार झालेलं मुलाच्या ‘स्वभावाचं ओझं’, कालांतरानं घरात आलेल्या नव्या स्त्रीच्या माथी गेलं एवढंच..

कशी गंमत असते ना, प्रोत्साहन देण्याच्या नादात काही लोक इतके गोड गोड बोलायला लागतात की एकवेळ ते प्रोत्साहन नको बाबा; पण तुझे शब्द आवर, असं म्हणावंसं वाटतं. ‘तुझ्यातलं सगळं छान’ असं सांगणारी कित्येक माणसं मी जवळून अनुभवली आहेत, जी आपली पाठ फिरताच फस्सकन् आपलं हसं करतात; पण तरी ‘मी किती भारी’ हे ऐकण्याचा क्षणिक आनंद मिळण्यासाठी त्या व्यक्तींच्या कडेला माणसांची गर्दी असते.

याच्याही एक विरूद्ध टोक असतं, जे सर्वसाधारणपणे घरांतल्या बायकांना संस्काराचा भाग म्हणून शिकवलं जातं. ‘कुणी कौतुक केलं तुझं, तर भस्सकन् त्यावर उत्तर द्यायचं नाही हं. जरासं लाजून, हसून, हळूच विषय बदलायचा...’ माझ्या एका मैत्रिणीला अशाच संस्कारांच्या शिडीवरून मी खाली आणलंय. खरंचच एखाद्या व्यक्तीनं अनेपेक्षितपणे केलेलं आपलं कौतुक ऐकून ‘खूप बरं वाटलं’ ही आपली भावना त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं, हा संवाद पूर्ण होण्याचा बिंदू असतो.

नको तिथे, सतत केलेलं कौतुक विसंवादात बदलू शकतं; पण अनपेक्षितपणे आलेली दाद तितक्याच सहजतेनं झेलताही आली पाहिजे, ती झेलली गेली याची पावती समोरच्यालाही मिळायला पाहिजे. शब्दांचे फार खेळ खेळले नाहीत तर बोलणाऱ्याच्या प्रत्येक शब्दाची किंमत राहते. ती किंमत आपण कमवणं, आणि समोरच्यानं जपणं, ही तारेवरची कसरत असते, नाही का!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Monorail: मोनोरेलचा ट्रायल रनदरम्यान अपघात! मग नियमित प्रवासी सेवेचं काय? सिग्नल फेल की सिस्टम फेल? मुंबईकरांचा सवाल

अहमदाबाद सारखी घटना, विमान धावपट्टीवर असतानाच लागलेली आग, उड्डाणानंतर लगेच कोसळलं; धक्कादायक VIDEO समोर

ऐतिहासिक निकाल! 'अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार'; नराधमाला ‘मृत्यूपर्यंत जन्मठेप’; वाशीम न्यायालयाचा निकाल..

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील ऊसदर आंदोलनात भाजपचा सहभाग

Guru Nanak Jayanti 2025: गुरु नानक जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा मंगल शुभेच्छा!

SCROLL FOR NEXT