Power Point
Power Point Sakal
वुमेन्स-कॉर्नर

‘पॉवर’ पॉइंट : शब्दांमागची भावना समजून घेऊ!

हर्षदा स्वकुळ

अत्यंत चिडक्या आणि विचित्र स्वभावाच्या एक काकू ओळखीच्या होत्या. त्याचं वय तेव्हा असावं ३८-४० आणि माझं ६-७. त्या इतक्या विचित्र स्वभावाच्या होत्या, की आई दूध आणायला पिटाळायची तेव्हा रस्ता वाकडा करून त्यांचं घर टाळून जावं लागायचं. त्यांना मी ‘चिडक्या काकू’ असंच नाव पाडलं होतं; पण त्यांची मुलगी माझी डबडा-ऐसपैस पार्टनर. लपाछपीसारख्या खेळांची मला भीती असल्यानं अशा खेळांत राज्यं आल्यावर या काकूंची मुलगी आमच्या मैत्रीखातर तिच्यावर राज्यं घ्यायची. त्या वयात तिच्या या सॅक्रिफाईसचं कौतुक वाटायचं. तिच्या घरी गेल्यावर चिडक्या काकूंच्या आरडाओरड्याला शांतपणे इग्नोर करून आमच्याकडे बघून मिश्किलपणे हसणारे काका हिरो वाटायचे.

मध्ये अनेक वर्षं लोटली. अचानक एक दिवस रस्त्यात चिडक्या काकू दिसल्या. कशी मजा असते, लहानपणीच्या काही आठवणी मेंदूत कोरून भरलेल्या असतात. टीनएज संपल्यावर त्या फार आठवत नाहीत. अशा आठवणी तेव्हाच जाणवतात, जेव्हा त्या आठवणींना डिवचणारी व्यक्ती समोर येते. आज समोर आलेली व्यक्ती विचित्र वागेल असं वाटत असतानाच पटकन हसून बोलली. माझी चौकशी केल्यानंतर ‘‘ये कधी तरी घरी’’ म्हणत, शांतपणे वळून हातातल्या पिशवीतून पेन काढत नंबरही लिहून घेतला. ‘‘तुम्ही तेव्हा अशा का होतात?’’ हा प्रश्न जिभेवर रेंगाळलेला असतानाच त्या पटकन म्हणाल्या, ‘‘आता मी त्या घरात राहत नाही. मुलीला घेऊन बाहेर पडले, तिला वकील केलंय, तिच्या बाबांनी मला हलक्यात काढू नये यासाठी खूप प्रयत्न केले; पण नेमकं मी ‘काय’ बोलतीये यापेक्षा मी ‘कसं’ बोलतीये याची चारचौघात खिल्ली उडवत, सतत दुर्लक्षच केलं माझ्याकडे.’’ एवढी चार वाक्यं बोलून त्या निघूनही गेल्या. पाठमोऱ्या काकूंना मी खूप वेळ बघत राहिले. माझी बालमैत्रीण आता वकील झाली याचं कौतुक वाटलं. दुसऱ्यांवर आलेलं राज्यं स्वत:वर घेण्याची तिची लहानपणापासून हिंमत होतीच म्हणा.

आपण एखाद्या व्यक्तीची एक ठराविक इमेज डोक्यात पक्की केलेली असते. ती व्यक्तीही त्या आपल्या डोक्यातल्या इमेजला तोडून काही फारसं वेगळी वागत नसते. मग काळ सरतो. आपल्या मनात ती इमेज घट्ट असते; पण समोरच्या व्यक्तीची परिस्थिती मात्र बदललेली असते. ‘‘मला थोडं गांभीर्यानं घ्या’’, इतकी साधी अपेक्षा होती. ठरावीक वयानंतर कदाचित साधी अपेक्षा साधेपणानं मांडता येईलच असं नाही. मग त्या अपेक्षेपेक्षा त्या मांडण्याच्या पद्धतीचं हसं घरच्याच व्यक्तीनं केल्यानं काकू दुखावल्या होत्या.

आपल्या जवळची असणारी व्यक्ती एवढी दुखावलेली असेल याची जराही जाणीव नसणारे अनेक स्त्री-पुरुष आपल्या आजूबाजूला दिसतात. ‘‘ऐक ना मला काय म्हणायचंय’’ हे सारखं स्वत:हून सांगता येत नाही. ते कधीतरी समोरच्याला समजून घ्यावं लागतं; पण रोगापेक्षा लक्षणांवरच इलाज घेण्याची सवय लावल्यामुळे, ‘‘तुझा प्रॉब्लेम काय आहे नेमका’’ हे वाक्य समजुतीनं नाही तर कमी लेखत विचारलं जातं. कित्येक चेहऱ्यांमागे असे किती गिळलेले राग असतील. आपण त्या रागानुसार चेहरे ओळखायला जातो. कालांतरानं चेहरे बदलतात, राग शमतात, बोच मात्र राहते. त्यामुळे वेळीच आपल्या जवळच्या व्यक्तीचा चेहरा नीट वाचा. कदाचित तो काही वेगळं सांगत असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT