Trust Sakal
वुमेन्स-कॉर्नर

‘पॉवर’ पॉइंट : भूमिका नसलेल्यांपासून... दूर राहा

कामाच्या ठिकाणी, ओळखीत, शेजारी राहणारी, जवळची वाटणारी अशी कोणतीही व्यक्ती जिच्याबद्दल तुम्ही कधीकाळी हक्कानं बोलू शकत होतात.

हर्षदा स्वकुळ

कामाच्या ठिकाणी, ओळखीत, शेजारी राहणारी, जवळची वाटणारी अशी कोणतीही व्यक्ती जिच्याबद्दल तुम्ही कधीकाळी हक्कानं बोलू शकत होतात, अशी व्यक्ती अगदी ऐन मोक्याच्या क्षणी तुमच्या बाजूनं उभी राहत नाही, असं कधी झालंय? माझ्या बाबतीत मागच्या १० वर्षात, जेव्हापासून मी शिक्षण संपवून काम करायला लागले तेव्हापासून, असं बरेचदा झालंय. आणि प्रत्येक अनुभवावरून मी शहाणी होण्याचा प्रयत्न केलाय. किमान ज्या व्यक्तीनं असं केलंय, त्या व्यक्तीच्या बाबतीत तरी मी शहाणी झालीच आहे; पण असं तुमच्याही बाबतीत झालं असेल तर मला वाटतं मी घेतलेला अनुभव फार काही जगावेगळा नसावा.

एखाद्या व्यक्तीशी झालेल्या पहिल्याच भेटीत ‘आपलं जुळेल की नाही’ याचा अंदाज येतो, अशा मताची मी आधी होते. अनुभवांनुसार मतं बदलतात. कदाचित ती तुम्हाला पटणार नाहीत. पण आता माझं मत असं आहे की, पहिल्या भेटीच्या ‘वाईब्स’वर ‘पटेल की नाही’ हे कधीच ठरवता येत नाही. अनेकदा असं होतं, पहिल्या भेटीत वाटतं आपलं मस्त पटेल. मग स्नेह वाढतो, मग त्या व्यक्तीबद्दल आपण हक्कानं काही बोलू शकतो असं नातं तयार होतं. मात्र, जेव्हा एखाद्या प्रसंगात आपल्या बाजूनं कुणीतरी ठोस भूमिका घ्यावी अशी वेळ येते, तेव्हा तीच व्यक्ती ‘तटस्थ’ होते. त्या पॉइंटला आपल्याला सो कॉल्ड ‘हक्काची’ वाटणारी व्यक्ती पळपुटी, कातडीबचाऊ, पॉलिटिकली राईट, भूमिका घेत असेल, तर आपण ज्याला हक्क म्हणत होतो ते नेमकं काय होतं? की क्षणिक चांगलं वाटणं होतं, याचा एकदा विचार व्हावा.

‘प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या प्रायोरिटीज असतात. स्वत:चे ‘रिलेशन्स’ सांभाळायचे असतात,’’ वगैरे अशा आग्रुमेंट्स यावर होतात. पण इतरांबरोबरचे ‘रिलेशन्स’ टिकवण्याच्या नादात जवळच्या व्यक्तीसाठी भूमिका न घेणारे खरंतर कुणाचेच नसतात. ज्यांच्याबरोबर ‘रिलेशन्स’ टिकवायचे आहेत, त्यांचेही नाहीत. ‘तटस्थ’ असं एक गोंडस नाव देऊन ‘आपण परिस्थिती कसली भारी हँडल केली’ असं त्यांना वाटतं; पण हा त्यांचा गैरसमज असतो. आणि अशा गैरसमजामध्येच जगणं हा अशा व्यक्तींचा ‘कम्फर्ट झोन.’ ‘तटस्थ’ असं काहीही नसतं. जगाला नाही सांगितलं तरी एकवेळ ठीके; पण खोल मनात आपली अशी एक भूमिका नेहमी असते.

आता मुद्दा येतो की दुसऱ्यानं कसं वागावं हे आपण ठरवणारे कोण? मग अशा अनुभवांमधून आपण काय शिकू शकतो? तर कसं वागायचं नाही. जवळच्या वाटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी गरज पडल्यास ठोस भूमिका घ्यायला बिचकायचं नाही, हे मी माझ्यापुरतं ठरवलं आहे. त्यानं भले आणखी दोन लोक लांब जाण्याची शक्यता असते; पण आपल्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या व्यक्तीचा नात्यावरचा विश्वास हलणं ही आणखी वेदनादायी गोष्ट असते.

सांगायचा मुद्दा असा, या सगळ्याला ‘जर-तर’ बरेच जोडता येतील. काही व्यक्ती पहिल्या दिवसापासून स्ट्रेट फॉरवर्ड असतात. मी कुणाच्या मागे उभी राहणार नाही, माझ्या मागे कुणी उभं राहावं याची अपेक्षा नाही; पण समोरच्याला अगदी जवळचं म्हणत म्हणत ऐन वेळी, बरोब्बर भूमिका घ्यायच्या वेळी, पाठ फिरवणाऱ्या या ‘पीपल प्लिझिंग पर्सनॅलिटी’सारखी मी चुकूनही होऊ नये, यासाठी मी मनापासून प्रयत्न करत असते. आणि त्यासाठी सगळ्याबाबतीत नेहमी स्वत:चं ठाम मत असणं, ही पहिली पायरी वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT