Expectation
Expectation Sakal
वुमेन्स-कॉर्नर

‘पॉवर’ पॉइंट : ‘किमान’ अपेक्षांवर जगू नका...

हर्षदा स्वकुळ

‘किमान दिवसातून एकदा तरी फोन करत जा रे,’ असं म्हणत ती त्याला अक्षरश: विनवण्या करत होती. ‘मी एकदा घराबाहेर पडलो की माझ्याकडून अपेक्षा करू नकोस माझा फोन वगैरे येईल,’ हा त्याचा स्वर. मी तिला म्हटलं, ‘कशाला अशा किमान अपेक्षांवर जगतीयेस?’’

‘माझ्यासाठी एवढं तर करूच शकतोस तू,’ हे वाक्य असंख्य लोक एकमेकांना ऐकवतात. नातं नवीन नवीन असतं तेव्हा ते ‘किमान’ अपेक्षांवर जगत नसतं. ओंजळ भरून वाहील इतकं प्रेम, इतकी काळजी, इतका पुढाकार नव्या नात्यांत असतो. नातं मुरत जातं तसं ओंजळीचा आकार बदलायला लागतो. आता हे अगदी सगळ्यांच्याच बाबतीत होतं असं नाही; पण एक माणूस अनेक वर्षं आयुष्यात असल्यावर नात्याचा एक पॅटर्न तयार होतो. खरंतर असा पॅटर्न तयार होणार नाही याची खबरदारी घेत पुढे जायला हवं. नाहीतर ओळख- जरा जास्त ओळख- मग प्रेम- मग अती ओळख- मग सवय- मग तोचतोचपणा- आणि अखेरीस साचलेपणा-अशी उतरंड व्हायला वेळ लागत नाही.

पण कुणाच्या बाबतीत ही उतरंड होत असेल, आणि प्रेमाच्या पायरीवरून तुम्ही जरा एक पायरी खाली उतरला असाल तर मैत्रिणींनो वेळीच सावरा. ‘‘किमान चांगलं वागव रे मला, माझ्यासाठी किमान पाच मिनिटं तरी दे रे, किमान मला सांग तरी मी काही चुकले का, चारचौघांत किमान माझा आदर तरी ठेव, किमान थोडी तरी सहानुभूती राहूदे रे तुला माझ्या कंडिशनची’’, मैत्रिणींनो हीच ती वेळ असते जेव्हा क्षणभर थांबून पुन्हा विचार करण्याची. एखाद्याच्या पुढे नाक घासत ‘बेअर मिनिमम’ गोष्टी मागून जगण्यात काहीही अर्थ नसतो.

नात्याचा ‘कमाल’ बिंदू तुम्ही अनुभवलेला असतो. तिथून ‘किमान हे तरी कर’ इथपर्यंत येणारं नातं भविष्यात टिकेलही कदाचित; पण ते स्वत:ला अगतिक करेल हे नक्की. जाणिवेचा, प्रेमाचा, स्पर्शाचा ‘सर्वोच्च’ बिंदू नेहमीच राहिल असं नाही; पण त्याच्या ‘नीचांकी’ बिंदूवर येऊन ‘किमान तेवढा तरी मेन्टेन ठेव’ हे सांगण्याची वेळ समोरचा आणत असेल, तर आयुष्यात जगण्यातला ग्राफ बदलण्याची वेळ आलीये हे ‘किमान’ स्वत:सा समजवा. अनेक मैत्रिणींच्या डिक्शनरीमध्ये ‘एवढी साधी अपेक्षा होती’ हे वाक्य असतं. ही ‘साधी’ अपेक्षा नाही तर ‘किमान’ अपेक्षा आहे. कधीकाळी समोरच्यानं त्याहीपेक्षा भरभरून आपल्याला दिलेलं असतं. म्हणून आपण त्याच्याबद्दल किमान अपेक्षेची व्याख्या करू शकतो याची जाणीव असूद्या.

चारचौघांत पटकन घरातल्या बाईचा अपमान करणं, आवाज चढवणं, फस्कन तिच्यावर हसणं, ‘तुला काय कळतंय’ म्हणत विनोद निर्मिती करणं, असे पुरूष अनेकदा आजूबाजूला दिसतात. म्हणजे यातली प्रत्येक विचित्र कृती मी सांगताना आत्ताच्या आत्ता तुम्ही ही कुठल्याशा व्यक्तीशी रिलेट केलीच असेल ना! तर अशा लहरी व्यक्तींकडून किमान अपेक्षा करणं, आणि नातं पुढे नेणं हे फार घुसमटवणारं असतं. अशी घुसमट भोगण्याचे काही पैसे मिळत नाहीत. ना कुणी तुमचा सत्कार करणार असतं. त्यामुळे योग्य कळत्या वेळीच अशा नात्यांना पूर्णविराम द्या. ‘किमान’ जगताना आयुष्यातला ‘कमाल’ आनंद हरवू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूची फलंदाजी कोलमडली; अवघ्या 24 धावांत गमावल्या 6 विकेट्स, विराटचं अर्धशतकही हुकलं

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT