वुमेन्स-कॉर्नर

Big Breast Issue : मोठ्या स्तनांमुळे वैतागलात?; असे बनवा सुडौल अन् परिपूर्ण

एखादी छोटी गोष्ट मोठी करणे सोपे असते, पण मोठ्या गोष्टीला लहान करणे खूप अवघड असते.

सकाळ डिजिटल टीम

Big Breast Issue : एखादी छोटी गोष्ट मोठी करणे सोपे असते, पण मोठ्या गोष्टीला लहान करणे खूप अवघड असते. ही गोष्ट महिलांच्या स्तनांबाबतही घडते. काही महिलांचे स्तन आकाराने लहान असतात तर काहींचे स्तन इतके मोठे असतात की त्यांना हाताळणे कठीण होते. यामुळे अनेक शारीरिक समस्याही उद्भवतात.

अशा परिस्थितीत प्रश्न समोर येतो की, मोठ्या स्तनांचा आकार कसा कमी करायचा? जेणेकरून ते सुडौल आणि परिपूर्ण दिसतील. आज आम्ही तुम्हाला मोठ्या आकारातील स्तनांचा आकारा सुडौल आणि परिपूर्ण कसा करायचा याबाबत काही टिप्स सांगणार आहोत.

मोठ्या स्तनांमुळे होणाऱ्या समस्या

ज्या महिलांचा स्तनांचा आकार खूप मोठा असतो, त्यांना ते हाताळणे खूप कठीण जाते. त्यामुळे अनेकवेळा महिलांना पाठदुखीचा त्रास होतो आणि स्नायूही कठीण होतात. तसेच स्तनांजवळील अतिजास्त चरबीमुळे स्लीव्हलेस कपडे घालण्यासही अडचणी येतात. इतकेच नाही तर, ज्या महिलांच्या स्तनाचा आकार मोठा असतो, त्यांना बहुतेक वेळा स्तनांमध्ये वेदना जाणवतात.

कसा कमी कराल मोठ्या स्तनांचा आकार

आहाराची काळजी घ्या

स्तनांचा मोठ्या आकारासाठी आहारातील जास्त फॅट असणारे पदार्थदेखील कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे आहारात कमी फॅट असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. अशा स्थितीत तुम्ही तुमच्या आहारात चरबीयुक्त पदार्थांचा समावेश करावा, कारण त्यामुळे तुमचे स्तन अधिक वाढू शकतात. लो कॅलरी आणि पौष्टिक डाइट ब्रेस्ट लहान करण्याचे काम करतो. त्यामुळे आहारात कमी फॅट असणाऱ्या पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढवा.

व्यायाम

स्तन सुडौल बनवण्यासाठी व्यायाम नेहमीच प्रभावी असतो. हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी व्यायाम केल्याने स्तनांभोवती असलेली चरबी लवकर बर्न होते. स्तनांचा आकार कमी करण्यासाठी तुम्ही जॉगिंग, रनिंग, स्विमिंग यासारख्या व्यायाम प्रकारांचा समावेश करू शकता. याच्या मदतीने तुम्हाला कर्व्ही आणि सुडौल आकाराचे स्तन मिळू शकतात.

इस्ट्रोजेन कमी करा

इस्ट्रोजेन नावाचा हार्मोन स्तनाच्या टिशूंच्या विकासासाठी उपयुक्त आहे. अशा परिस्थितीत आपण इस्ट्रोजेनची पातळी संतुलित ठेवली पाहिजे. यासाठी अंबाडीच्या बियांचा आहारात समावेश करा. हे इस्ट्रोजेनची पातळी कमी करते आणि स्तनाचा आकार कमी करण्यासदेखील मदत करते.

ग्रीन टीने करा दिवसाची सुरुवात

ग्रीन टीमध्ये अनेक अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्याचे सेवन मेटाबॉलिज्म वाढवते आणि कॅलरी आणि चरबी बर्न करण्यासदेखील उपयुक्त आहे. ग्रीन टी प्यायल्याने स्तनाभोवतीची चरबी झपाट्याने कमी होते आणि तुम्हाला परिपूर्ण आकाराचे स्तन मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI म्युच्युअल फंड आणि डीमॅट नॉमिनेशनचे नियम बदलणार! सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा 'हे' महत्त्वाचे काम

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णयाने जीवदान मिळालेला वॉशिंग्टन नडला; गुजरातला सावरले, बंगळुरूसमोर ठिकठाक लक्ष्य

IPL 2026 Final, RCB vs GT live: वॉशिंग्टन सुंदरची एकाकी झुंज, नाबाद अर्धशतक झळकावून वाढवली गतविजेत्यांची डोकेदुखी

नेपाळनेही भारतीय जमीन बळकावली, पंतप्रधान बालेन शाह यांचे मोठे विधान, लिपुलेख-कालापानी वाद पुन्हा चर्चेत!

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णय? पाटीदार अम्पायरकडे धावला, विराट संतापला... वॉशिंग्टनला परत बोलवल्याने राडा

SCROLL FOR NEXT