erandel oil sakal
वुमेन्स-कॉर्नर

दिलखुलास : एरंडेल तेल

आमच्या लहानपणी आई आम्हाला महिन्यातून एकदा एरंडेल तेल पाजायची. हा एक मोठा सोहळाच असे.

सकाळ वृत्तसेवा

आमच्या लहानपणी आई आम्हाला महिन्यातून एकदा एरंडेल तेल पाजायची. हा एक मोठा सोहळाच असे.

- कांचन अधिकारी

आमच्या लहानपणी आई आम्हाला महिन्यातून एकदा एरंडेल तेल पाजायची. हा एक मोठा सोहळाच असे. एका कपात गरम पाणी घेऊन त्यात चमचाभर एरंडेल तेल घालण्यात येत असे. मग ओठांना लिंबाची फोड चोळायची व एका दमात श्वास न घेता ते एरंडेल गपकन खाली गेलेच पाहिजे. कारण एरंडेल तेलाचा एक टिपिकल वास यायचा आणि एकदा का तो नाकात घुसला, की दिवसभर सगळ्या गोष्टींना तोच वास येत असे. म्हणजे अगदी अत्तरालासुद्धा एरंडेलाचा वास येत असे. दिवसातून तीन-चार तरी एरंडेलाच्या ढेकरा येत असत आणि पोट साफ, म्हणजे थोडक्यात त्याकाळी त्याला कोठा साफ करणे असं संबोधलं जायचं. आजकाल ज्याला Detoxification असं प्रगल्भ नाव देण्यात येतं.

पण खरंच सांगते, या एरंडेल तेल पिण्याचे खूप फायदे असत, पोट तर साफ व्हायचंच, त्यामुळे चेहरा नितळ राहायचा. तारुण्यपीटिकांचा त्रास होत नसे. पोट साफ झाल्यामुळे पोटात कृमी होणं, जंत होणं असले प्रकार होत नसत. आतड्यातील व्रण भरून निघत असत. शिवाय ताप येत नसे. केसांसाठीसुद्धा एरंडेल उत्तम तेल मानलं जातं. आता हे इतके फायदे असले, तरी त्याचा वास घेतला तर कुणीच ते घ्यायला तयार होणार नाही. माझ्या लहानपणी मला आठवतंय, आई म्हणायची, ‘जर एरंडेल घेतलं नाहीस, तर बाथरूममध्ये कोंडून ठेवीन.’ तर मी बाथरूममध्ये कोंडून घ्यायला तयार व्हायची; पण एरंडेल नको असं वाटायचं. मात्र, आजकाल तर काय, अहो आश्चर्यम्! चक्क वासरहित मेडिकेटेड एरंडेल तेल मिळायला लागलंय, त्यामुळे त्याचे सर्व फायदे मिळत आहेत व नकोशा वासाचा तोटाही नाहीसा झालाय.

या एरंडेलावरून मला एक किस्सा आठवतोय. आमच्या गल्लीत एक जोडपं राहायचं. त्यांना दोन जुळी मुलं होती. एक नकुल आणि दुसरा सहदेव. मुलं जुळी असल्यामुळे एकसारखीच दिसायची. एक दिवस त्यांच्या आईनं नकुलला सहदेव समजून दोनदा एरंडेल तेल पाजलं. बिचारा नकुल स्वच्छतागृहात वारंवार जातोय आणि सहदेवाचं पोट काही साफ होत नाहीये...

आजकालच्या मुलांना आपण एरंडेल तेलाचे फायदे सांगितले, तरी ते एरंडेल तेल ते पिण्यास नकार देतील. त्याऐवजी एखादी गोळीच द्या, असं म्हणतील. आजकाल प्रत्येक गोष्टीवर गोळी हेच समीकरण घेऊन बसलं आहे... पण खरं सांगायचं, तर आजीच्या बटव्यातल्या गोष्टीच जास्त परिणामकारक असतात. कारण त्याने उपायच होतो... अपाय मात्र कधीच होणार नाही!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, ODI: ८ षटकार अन् ८ फोर... भारताविरुद्ध गुरबाजचं शतक, डिविलियर्सचा विक्रमही मोडला; पण विदर्भाच्या पठ्ठ्याही चमकला

Aadhaar Card Rule: मोठी बातमी! १८ वर्षांवरील लोकांना आधार कार्ड मिळणार नाही; असा निर्णय नेमका कुणी घेतला अन् का? नवे नियम लागू

Latest Marathi News Live Update : जळगावचा विचार करता, हा विजय एकतर्फी असेल - गुलाबराव पाटील

IND vs AFG, ODI: पाऊस सुरू असताना भारताचे खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये नक्की काय करत होते? BCCI नेच शेअर केलाय Video

Pune Traffic: विश्रांतवाडी चौक ते फुले नगर रस्त्यावरचा बीआरटीमार्ग काढून टाकण्याचा निर्णय; पीएमपीचा विरोध मनपाने झुगारला

SCROLL FOR NEXT