Banana Bread Sakal
वुमेन्स-कॉर्नर

ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : रंजक ‘स्वाद’कथा

रोमन त्यांच्या काळातील विलासी जीवनशैलीकरिता ओळखले जातात. अनेक शोध त्यांनी लावले, यांत्रिकीकरण केले.

मधुरा पेठे

इतिहासात डोकावताना अनेक मजेशीर गोष्टी हाताला लागतात. अनेक वस्तू, भाज्या, पदार्थ आज ज्या स्वरूपात आहेत, त्यापेक्षा कितीतरी निराळ्या मूळ स्वरूपात ते होते, तर काहींच्या उत्पत्तीच्या मनोरंजक कथा वाचायला मिळतात. अशाच काही मजेशीर गोष्टी पाहूयात.

रोमन त्यांच्या काळातील विलासी जीवनशैलीकरिता ओळखले जातात. अनेक शोध त्यांनी लावले, यांत्रिकीकरण केले. त्यातीलच एक होते ते म्हणजे पीठ मळायचे यंत्र. त्या काळातील ब्रेड तयार करण्याची पद्धत अतिशय क्लिष्ट होती. त्यामुळे बेकरकडून ताजा ब्रेड विकत घ्यायला सुरुवात झाली. परंतु पूर्ण गावाला पुरेल इतक्या ब्रेडचे पीठ मळण्याचे काम मोठे थकवणारे होते. यावर उपाय म्हणून त्यांनी पीठ मळण्याचे यंत्र तयार केले. तेलाचा घाणा असतो, त्याप्रमाणे हे यंत्र होते, ज्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर ब्रेड तयार करण्यासाठी होत असे. 

आजकाल मिळणाऱ्या आकर्षक केशरी रंगात दिसणाऱ्या गाजराचा रंग जुन्या काळात सफेद, पिवळा किंवा काळपट जांभळा असे. अधिक गोड गाजर तयार करण्यासाठी केलेल्या प्रयोगातून गाजराचा रंगही बदलला आणि चवदेखील गोड झाली. आजही उत्तर प्रदेशात थंडीच्या दिवसात गडद जांभळ्या रंगाची गाजरे तयार होतात आणि यापासून गाजर हलवा तयार केला जातो. टोमॅटो केचप हा असाच मूळ रंगरूप पूर्णतः बदलेला पदार्थ आहे. आज केचप म्हणजे टोमॅटो सॉस अशा अर्थी हा शब्द घेतला जातो; परंतु हा मूळ चायनीज फिश सॉस! ‘के-त्सियाप’ हा मूळ फिश सॉस खलाशांमार्फत युरोपमध्ये आला. सतराव्या शतकात त्यात मश्रूम्स आणि अँचोव्ही मासे वापरून त्याचा केचप तयार केला. अमेरिकेतदेखील एकोणिसाव्या शतकापर्यंत हा निव्वळ मश्रूम्स सॉस होता, त्यानंतर त्यात टोमॅटो वापरले गेले आणि पुढे टोमॅटो केचप प्रसिद्ध झाला.

दर वर्षी १२ अब्ज टन बटाटा वेफर्स खाल्ले जातात आणि लहानथोरांना आवडणारे हे वेफर्स पहिल्यांदा कसे तयार केले बरे, असा प्रश्न तुम्हाला तुम्हाला पडला असेल. सन १८५३ मध्ये एका रेस्टॉरंटमध्ये तळलेले बटाटे कुरकुरीत नाहीत म्हणून ग्राहक नाराज होते. सततच्या तक्रारींना कंटाळलेल्या शेफने चिडून उत्तर द्यावे म्हणून बटाट्याचे शक्य तितके पातळ काप करून तळले आणि भरपूर मीठ लावून सर्व्ह केले. बटाट्याचे कुरकुरीत काप खाऊन ग्राहक इतके खूश झाले, की त्याची मागणी वाढली आणि पुढे हे वेफर्स जगभर प्रसिद्ध झाले.

जगात सर्वांत आवडते पेय म्हणजे कॉफी आणि या कॉफीचा शोध कसा लागला ही एक मजेशीर गोष्ट आहे. इथियोपियात एकदा एका गुरख्याला त्याच्या बकऱ्या कायम अतिशय उत्साहात कशा असतात याचे कोड पडले. थोडा शोध घेतला असता त्याला त्या एका विशिष्ट झाडाचा पाला आणि बिया खाताना दिसल्या. कुतूहलाने त्यानेही त्याचा पाला आणि फळे खाऊन पाहिली आणि इतरांना वाटली. त्या पाल्याने आणि बियांनी त्या सर्वांना उत्साह वाटला आणि त्यापासून त्यांनी काढा तयार केला आणि हीच सुरुवात होती कॉफीची. पुढे कॉफी जगभरात पोचली आणि तिने इतिहास घडवला.

भारतात तयार होणारी केळी युरोपियन देशात अतिशय प्रिय. आपल्याकडे जसे आंब्याला महत्त्व तसे युरोपात केळ्यांना महत्त्व आहे. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने ब्रिटिश सैन्याची समुद्री मार्गावर कोंडी केल्याने इंग्लडमध्ये अन्नधान्य पोचेना. त्यातूनच ब्रिटिश गव्हर्नमेंटने केळी आयात करण्यावर पूर्ण बंदी घातली आणि साखर आधीच महागलेल्या परिस्थितीत गोड पदार्थ मिळण्याचा एकमेव उरलासुरला मार्गही बंद झाला. तेव्हा कोणा चतुर गृहिणीने केळ्यांच्या ऐवजी पर्सनीप आणि बनाना इसेन्स वापरून पदार्थ करायला सुरुवात केली. गंमत म्हणजे हाडे गोठवणाऱ्या थंडीनंतर येणारी पर्सनीप चवीला मधुर असतात आणि त्यात बनाना इसेन्स वापरून पदार्थ तयार केला, तर हुबेहूब चव येते. या आणि अश्या मनोरंजक ऐतिहासिक गोष्टी आहेत लिहायला घेतले तर पुस्तक कमी पडेल. आज या निमित्ताने एक खास पदार्थ पाहूयात. पिकलेल्या केळ्यांपासून तयार होणारा हा ब्रेड फार छान लागतो.

सोपा व्हेज

बनाना ब्रेड

साहित्य : चार मोठ्या आकाराची पिकलेली केळी, अर्धा कप साखर, १ टेबलस्पून बटर, अर्धा कप तेल, दीड कप मैदा, दीड टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, पाव टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून दालचिनी पावडर, पाव टीस्पून जायफळ पावडर, २ चमचे व्हॅनिला इसेन्स, २ टेबलस्पून मिक्स ड्रायफ्रूट.

कृती :

  • प्रथम केळी आणि साखर एकत्र करून काट्याने मऊ करून घ्या.

  • त्यात बटर आणि तेल घालून मिक्स करून ठेवा.

  • मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ, दालचिनी पावडर, जायफळ पावडर एकत्र करून चाळून घ्या.

  • मैद्याचे मिश्रण केळ्याच्या मिश्रणात घालून छान एकत्र करून घ्या. त्यात व्हॅनिला इसेन्स टाका आणि आवडत असल्यास यात ड्रायफ्रूट टाकू शकता.

  • हे मिश्रण ब्रेड टिनमध्ये घालून १८० डिग्रीवर ३५ ते ४० मिनिट बेक करा.

  • पूर्ण थंड झाल्यावर टिनमधून बाहेर काढून सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: अतिवृष्टीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला फटका

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT