mouli ganguly sakal
वुमेन्स-कॉर्नर

माय फॅशन : ‘स्वतःची स्टाइल शोधा’

फॅशनसंदर्भात मी कंफर्टेबल वाटण्याला अधिक प्राधान्‍य देते. मी हवामानास अनुकूल असे पोशाख, कोमल कपड्याला पसंती देते. मला पारंपरिक व पाश्चिमात्‍य असे दोन्‍ही पोशाख आवडतात.

सकाळ वृत्तसेवा

फॅशनसंदर्भात मी कंफर्टेबल वाटण्याला अधिक प्राधान्‍य देते. मी हवामानास अनुकूल असे पोशाख, कोमल कपड्याला पसंती देते. मला पारंपरिक व पाश्चिमात्‍य असे दोन्‍ही पोशाख आवडतात.

- मौली गांगुली

फॅशनसंदर्भात मी कंफर्टेबल वाटण्याला अधिक प्राधान्‍य देते. मी हवामानास अनुकूल असे पोशाख, कोमल कपड्याला पसंती देते. मला पारंपरिक व पाश्चिमात्‍य असे दोन्‍ही पोशाख आवडतात. मी मध्‍यम व कमी प्रमाणात स्टायलिंगला महत्त्व देते, कारण सौंदर्य साधेपणामध्‍येच आहे. ‘अँड टीव्ही’वरील ‘बाल शिव’ या मालिकेमधील माझ्या भूमिकेसाठी मला सर्वांत कंफर्टेबल; पण आकर्षक पोशाख परिधान करायला मिळतात. फॅशन करताना, पोशाख घालताना, साडी नेसताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

इतर करतात म्हणून मी कोणतेही ट्रें‍ड्स फॉलो करत नाही. मी नेहमीच माझ्या व्‍यक्तिमत्त्वाला अभिव्‍यक्‍त करणारी आणि मला आरामदायी अनुभव देणारी स्‍टाइल अवलंबते. रंग, कपडे, स्‍टाइल असो किंवा अधिक फिटिंग असो, ट्रेंड्स फॉलो करण्‍याऐवजी आपण आपल्‍याला आरामदायी काय वाटेल याचा विचार केला पाहिजे. कारण, त्यामधूनच आपलं व्यक्तिमत्व खुलत असतं.

फॅशन वैयक्तिक आहे, म्‍हणून लोकांनी नेहमीच त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या स्‍टाइल मंत्राचं पालन केलं पाहिजे. माझा फॅशन फंडा आहे, की स्‍वत:ची स्‍टाइल शोधा आणि कधीच इतर करतात म्हणून ट्रेंड्स फॉलो करू नका. कारण, फॅशन येते अन् जाते; पण आपल्या शरीरयष्टीला आणि आपल्या रंगाला कोणत्या प्रकारचे कपडे सूट होतात, हे आपल्यालाच चांगल्या प्रकारे माहीत असतं. त्यामुळे आपल्याला जे कपडे शोभतील, ज्या कपड्यांमधून आपलं व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी होईल, अशा प्रकारच्या पोशाखांना प्राधान्यक्रम दिला पाहिजे.

कपड्यांच्या रंगांची निवड करतानाही काळजी घ्यावी लागते. कारण, अनेक रंग व शेड्स उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येकानं स्वतःला आवडणारे व आनंदी करणारे रंग निवडावेत. तुमचा मूड वाढवणारे, उत्‍साहित करणारे रंग कोणत्‍याही प्रसंगासाठी उत्तम आहेत. तसंच व्‍यक्‍तीची त्‍वचा व अंडरटोननुसार रंग निवडावेत. हवामान व ऋतूदेखील तुमच्‍या फॅशनमध्‍ये अत्‍यंत महत्त्‍वाची भूमिका बजावतात. म्‍हणून आपण नेहमीच ऋतूला अनुसरून आणि आपल्‍यासाठी सर्वोत्तम असलेल्‍या रंगांची निवड करावी.

मी फॅशन आयकॉन्‍स म्‍हणून अनेकांकडे पाहते. त्‍यापैकी काही म्‍हणजे ऑड्री हेप‍बर्न, प्रिन्‍सेस डायना, रेखा, गायत्रीदेवी. फक्‍त सेलिब्रिटीज नाही तर मी प्रवास करताना समोर येणाऱ्या सामान्‍य व्‍यक्‍तींच्‍या स्‍टाइलकडेदेखील पाहते आणि त्‍यांनी केलेल्या फॅशनदेखील मला प्रेरित करतात. ते सर्व त्‍यांची व्‍यक्तिमत्त्वं त्यांच्या फॅशनमधून ठळक करतात. म्‍हणूनच ते माझ्यासाठी आयकॉन्‍स आहेत. ते चिरंतन आहेत.

फॅशन टिप्‍स

  • ओव्‍हरड्रेसिंग टाळा.

  • स्‍वत:ची वैयक्तिक स्‍टाइल शोधा.

  • इतर करतात म्हणून ट्रेण्‍ड्स व फॅशनचे कधीच अनुकरण करू नका.

  • फिटिंग योग्‍यरीत्‍या असली पाहिजे.

  • तुमच्या शरीरानुसार आणि तुमच्या कंफर्टनुसार पोशाख परिधान करा.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: सेम टू सेम आर्ची! पुण्याच्या निवडणुकीत आर्चीसारखी दिसणारी उमेदवार कोण?

LPG Subsidy : 'एलपीजी सबसिडी' बंद होणार?; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

Latur Crime : अहमदपूर तहसील कार्यालयात बनावट सह्या, शिक्के वापरून फसवणूक; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

Pune Political : सूत्रे हलली, रात्रीत चित्र बदलले; कोथरूडमध्ये भाजपकडून ‘डॅमेज कंट्रोल’, उमेदवारांची फेररचना!

Test Team of 2025: या वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघात शुभमन गिलसह चार भारतीयांना स्थान, तर टेंबा बाबुमा कर्णधार

SCROLL FOR NEXT