Respect Her Sakal
वुमेन्स-कॉर्नर

अब्रू योनीत असते ना!

रोज एक बातमी बलात्काराची... अनेक बलात्कार जे बातम्यांपर्यंत पोहोचूही शकत नाहीत. अनेक त्यांच्या कुटुंबीयांनाही कळत नाहीत. अनेक कळूनही दाबून टाकले जातात.

रसिका आगाशे

आपण अशा समाजात राहतो, जिथे बलात्कार ही इतकी सामान्य गोष्ट झाली आहे आणि इतकी सततची, की रॉड वगैरेचा वापर झाला नसेल तर आता आता आपण निषेध वगैरेही करण्याच्या भानगडीत पडत नाही. ती जर बलात्कारात मेली नसेल, तर आसपासचा समाज तिला रोज कसं मरण येईल, हे बघत राहतो. तिच्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगत राहतो...

रोज एक बातमी बलात्काराची... अनेक बलात्कार जे बातम्यांपर्यंत पोहोचूही शकत नाहीत. अनेक त्यांच्या कुटुंबीयांनाही कळत नाहीत. अनेक कळूनही दाबून टाकले जातात. बलात्कार करणाऱ्या पुरुषांबद्दलच्या भावना तऱ्हेतऱ्हेच्या... विकृत, मारून टाकलं पाहिजे वगैरे. मुलींबद्दल- त्यांची जात, धर्म, बलात्काराची वेळ बघून विविध भावना व्यक्त होतात... म्हणजे अमुक वेळी गेलीच कशाला होती तिकडे, काय कपडे घातले होते, ही ‘आमची’ मुलगी आहे, ‘त्यांच्यातल्या’ असतातच अशा, इत्यादी इत्यादी... पण बातमी एकच असते. बिचारी मुलगी, तिची अब्रू लुटली गेली. म्हणजे अब्रू, इज्जत हा प्रकार योनीशी निगडित असतो. कारण नुसतं किस केलं, रस्त्यावरून चालत असताना कोणी चिमटा काढून गेलं तरी अब्रू जात नाही! हल्लीच्या काही कोर्टाच्या ऑर्डरनुसारही लग्न केल्यानंतर जबरदस्ती केली तरी, तो बलात्कार मानला जात नाही! मग अब्रू जायचा प्रश्न येत नाही. कारण लग्न केलं की स्त्रीची अब्रू ही तिची राहातच नाही ना!

मुळात इथे अब्रू किंवा इज्जत ही स्त्रीच्या योनीशी कशी निगडित असते, हे शोधण्याची गरज आहे. अगदी पुरातन काळापासून ज्या कथा ऐकवल्या जातात, त्यात कौमार्य हे किती महत्त्वाचं असतं, यावर वारंवार प्रकाश टाकलेला असतो. व्यभिचाराला कारणं शोधली जातात. म्हणजे अमुक माणूस कामवासनेने आंधळा झाला किंवा त्यांनी तिचा ओघळता पदर पाहिला वगैरे. ‘ती सुंदर होती’ हे कारणही अनेकदा पुरेसं असतं. मग आपण आज जे पुरुष बलात्कारित स्त्रियांच्या कपड्यांबद्दल वगैरे बोलतात, ते ठीकच मानलं पाहिजे! कारण तेही याच संस्कारात मोठे झालेत आणि रोज बलात्कार होऊनही तोंडही न उघडू शकणाऱ्या स्त्रियाही... हेच संस्कार ना त्यांच्यावरही.

सगळ्या गोष्टी काय सांगतात, अगदी परिकथाही, की एक पराक्रमी पुरुष येणार आहे, तोच वाचवणार आहे. लग्न हाच मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस असतो वगैरे वगैरे. लग्न म्हणजे काय तर संभोग करण्याचं प्रमाणपत्र! त्याआधी केलं तर गैर, त्याशिवाय केलं तर व्यभिचार इत्यादी...

आपण अशा समाजात राहतो, जिथे बलात्कार ही इतकी सामान्य गोष्ट झाली आहे आणि इतकी सततची, की रॉड वगैरेचा वापर झाला नसेल तर आता आता आपण निषेध वगैरेही करण्याच्या भानगडीत पडत नाही. न्यायव्यवस्था इतक्या संथ वेगाने काम करत असते की अनेकदा तक्रार करणारीही कंटाळून जाते. ती जर बलात्कारात मेली नसेल, तर आसपासचा समाज तिला रोज कसं मरण येईल, हे बघत राहतो. तिच्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगत राहतो, कारण अब्रू तिच्या योनीत असते ना!

आपल्या हात, पाय, डोक्याला इजा झाली तर अब्रू जात नाही, पण योनी या अवयवाला स्पर्श जरी झाला तरी ती व्यक्ती, तिच्या घरचे, तिचा समाज, तिचे जातवाले, तिचा धर्म या सगळ्यांची अब्रू जाते. इतर सर्व गुन्ह्यांत, गुन्हा केल्यामुळे, गुन्हेगाराची, त्याच्या घरच्यांची इज्जत जाते. बलात्कार हा एकच गुन्हा असा आहे, ज्यात गुन्हा झाल्यावर पीडितेची इज्जत जाते. कारण हा गुन्हा एका पुरुषाने किंवा पुरुषांच्या एका गटाने एका स्त्रीवर केलेला हमला नसतो! बलात्कार ही पुरुषप्रधान पद्धतीची निष्पत्ती असते. कारण स्त्री ही दुय्यम आहे, उपभोग्य आहे या विचारसरणीतून आलेला आहे. बलात्कार हे फक्त वासनेमुळे नाही तर स्त्रियांना त्यांची ‘लायकी’ दाखवण्यासाठीही होतात. ही लायकी पुरुषांनीच ठरवलेली आहे, हा सगळ्यात हताश करणारा भाग आहे.

योनी हा गुंतागुंतीचा असला तरी अवयव आहे. संभोग या क्रियेशी तो जोडला आहे. असे आपले सर्व अवयव भूक, तहान, झोप आणि अनेक क्रियांशी निगडित आहेत. संभोग हीदेखील एक शारीरिक क्रिया आहे. तिचा संबंध नैतिकतेशी जोडून आपण अनेक गोष्टी अवघड केल्या आहेत. म्हणूनच बलात्काराची नैतिक जबाबदारी पुरुषाबरोबर स्त्रीची होते आणि त्याचा संबंध स्त्रीच्या अब्रूशी जोडला जातो. स्त्री, तिचं शिक्षण, कला, तिचं करियर, तिचं ‘असणं’, यावरून तिची इज्जत ठरवूयात ना, तिच्या योनीचा कोणीतरी बळजबरीने वापर केला, यावरून नको!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापूरला दररोज पाणीपुरवठा! नव्याने टाकली जाणार ७१५ किमी पाइपलाइन; १५ ते ३२ लाख लिटरचे असतील २९ जलकुंभ; ८९२ कोटींपैकी २०० कोटी रोख्यातून उभारले जाणार

Morning Breakfast Recipe: हिवाळ्यात सकाळच्या नाश्त्यात मुलांसाठी बनवा 'हे' 2 इन्स्टंट पदार्थ, लगेच नोट करा रेसिपी

संचमान्यतेपूर्वी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बोगस नोंदणी! मधूनच शाळा बदललेल्या विद्यार्थ्यांची होणार पडताळणी; इयत्ता अकरावी-बारावीसाठी बायोमेट्रिक हजेरीचे बंधन

Messi in Mumbai: अमृता फडणवीस यांनाही नाही आवरला मेस्सीसोबत सेल्फी घेण्याचा मोह... Video Viral

महापालिकेचा याच आठवड्यात वाजणार बिगुल! भावी नगरसेवकांकडून त्यांच्या प्रभागात आरोग्य शिबिरे, महासेवा शिबिरांसह ‘होम मिनिस्टर’चे डिजिटल फलक, वाचा...

SCROLL FOR NEXT