shivya pathania sakal
वुमेन्स-कॉर्नर

माय फॅशन : ‘अनावश्यक दागिने टाळा’

फॅशन करताना, पोशाख घालताना, साडी नेसताना काळजी घेतलीच पाहिजे. साड्या किंवा पारंपरिक पोशाखामधून मनमोहक आणि आकर्षक लूक मिळतो.

सकाळ वृत्तसेवा

फॅशन करताना, पोशाख घालताना, साडी नेसताना काळजी घेतलीच पाहिजे. साड्या किंवा पारंपरिक पोशाखामधून मनमोहक आणि आकर्षक लूक मिळतो.

- शिव्या पठानिया

मला नेहमीच आरामदायी पोशाख परिधान करायला आवडतात. मला साडीदेखील आवडते. साडीचा लूक हा खूपच आकर्षक दिसतो. ‘बालशिव’ या मालिकेत माझी भूमिका माता पार्वतीची आहे. त्यासाठी दररोज मला पारंपरिक पोशाख परिधान करण्‍यास मिळत असल्‍याचा आनंद होत आहे.

फॅशन करताना, पोशाख घालताना, साडी नेसताना काळजी घेतलीच पाहिजे. साड्या किंवा पारंपरिक पोशाखामधून मनमोहक आणि आकर्षक लूक मिळतो, म्‍हणून कमी प्रमाणात मेकअप व दागिने उत्तम लूक देतात. आपण करणारी सामान्‍य चूक म्‍हणजे साडी परिधान केल्‍यानंतर अनावश्‍यक दागिने घालतो, ते टाळले पाहिजे. साडीमध्ये आपले सौंदर्य उठून दिसेल आणि साडीसोबत कॉम्प्लिमेंट करतील असेच दागिने आपण घातले पाहिजेत. माझा फॅशन फंडा असा आहे, की स्‍वत:ला आत्‍मविश्‍वास वाटेल, असे पोशाख परिधान करावेत. कारण, आपल्याला त्या पोशाखात कम्फर्टेबल वाटत नसेल, आपला आत्मविश्वास कमी होत असेल, तर त्याचे प्रतिबिंब आपल्या चेहऱ्‍यावर उमटत असते अन् ही गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या लगेचच लक्षात येते.

रंगांची निवड करताना माझ्या मते तुमचा मूड त्‍वरित उत्‍साहित करणारे रंग निवडावेत. मला माझ्या त्वचेला अनुकूल रंग आवडतात. लव्हेंडर आणि गुलाबी हे माझे सगळ्यात जास्त आवडते रंग आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येकाची आवड वेगवेगळी असू शकते. त्यामुळे आपल्या रंगाला आणि व्यक्तिमत्त्वाला सूट होतील, चांगले दिसतील, अशाच प्रकारच्या रंगांची निवड करावी. माझ्या फॅशन आयकॉन आहेत आणि पुढेदेखील राहतील अशा रेखाजी. त्‍या ज्‍या पद्धतीने त्‍यांच्‍या साड्या आणि आभूषणे कॅरी करतात ते मला खूप आवडते. ते त्‍यांच्‍या व्‍यक्तिमत्त्वाला शोभून दिसते. त्यांची स्‍टाइल अत्‍यंत मोहक आहे आणि त्या अत्यंत ग्रेसफुल आहेत.

फॅशन टिप्स

  • इतरांचे अनुकरण करण्‍याऐवजी त्‍यामधून प्रेरणा घेत स्‍वत:च्‍या लूक्‍सबाबत प्रयोग करत राहा. त्यात जो लूक छान दिसतो, त्यानुसार पोशाख परिधान करा.

  • ऑर्गेनिक क्‍लोदिंग, थ्रिफ्टिंग इत्‍यादीसह स्थिर फॅशनचा अवलंब करा.

  • नेहमीच स्‍वत:ला कम्फर्टेबल वाटेल अशा पोशाखांची निवड करण्याला प्राधान्‍य द्या.

  • तुमच्‍या व्‍यक्तिमत्त्वाला शोभेल असे पोशाख परिधान करा. फुलांची आवड असेल, तर फ्लोरल डिझाइनचा अवलंब करा. ट्रें‍ड्स आहेत म्हणून मुद्दामहून पालन केले पाहिजे असे काही नाही.

  • इतरांना प्रभावित करण्‍यासाठी नव्हे, तर स्‍वत:ला आरामदायी वाटेल असे पोशाख परिधान करा. कारण, त्यातूनच तुमचे व्यक्तिमत्त्व उजळत असते.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी वाढ! चांदीही 3 लाखांवर; गुंतवणूकदार खुश, मात्र सर्वसामान्यांची चिंता वाढली; पाहा आजचा भाव

Kabanur Protest in Kolhapur : महापुरुषांच्या अवमानकारक वक्तव्यामुळे कबनूरमध्ये तणाव; संतप्त जमावाची इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडे धाव, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला धमकीचा मेल

Video : अरे, ही काय डोक्यावर पडलीय का? Hardik Pandya बाद होताच, गर्लफ्रेंड माहिका शर्माने काय केलं पाहा; नेटिझन्स संतापले

Stock Market Today: ट्रम्प टॅरिफला धक्का देत शेअर बाजार उसळला! सेन्सेक्स 400 अंकांनी वाढला; मात्र IDFC घसरला; कोणते शेअर्स तेजीत?

SCROLL FOR NEXT