वुमेन्स-कॉर्नर

कल्पना सरोज : कधी काळी २ रुपये कमाणारी आज आहे ७०० कोंटीची मालकीण

सकाळ डिजिटल टीम

कल्पना सरोज (Success Story Of Kalpana Saroj) यांचा जन्म महाराष्ट्रच्या अकोला जिल्ह्यातील छोट्याशा गावातील अतिशय गरिब कुटुंबामध्ये झाला. कसे तरी घरखर्च भागवत असते. कल्पना सरकारी शाळेत शिकत होत्या आणि अभ्यासामध्ये हुशार होत्या. पण त्या बहूजन समस्याच्या असल्यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. फक्त १२ वर्षाच्या वयामध्ये त्यांचे लग्न १० वर्ष मोठ्या व्यक्तीसोबत करण्यात आले.

कल्पना यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, जेव्हा त्या आपल्या सासरी गेल्या तेव्हा त्यांनी खूप त्रास सहन करावा लागला. त्यांना जेवायला देत नसे. केस पकडून मारत असे. जनावरांसोबतही कोणी वागत नसेल अशी वागणूक देत असे. यासर्वामध्ये कल्पनाची तब्येत खूप खराब झाली होती. पण एकदा कल्पनाचे वडील तिला भेटायला आले तेव्हा मुलीची अवस्था पाहून त्यांनी वेळ न घालवता तिला गावी घेऊन आले.

दिवसाला २ रुपये कमवत असे

१६ वर्षाच्या वयामध्ये मुंबई आपल्या काकाजवळ गेली. कल्पनाला शिवणकाम येत असे त्यामुळे तिच्या काकांनी तिला कपड्याच्या मिलमध्ये नोकरी मिळवून दिली. तिथे रोजचे २ रुपये ती कमवत असे. येथूनच कल्पनाला आयुष्यात थोडा दिलासा मिळाला. येथे कल्पनाने पाहिले की शिवणकाम आणि बुटीक कामामध्ये खूप संधी आहे. यामध्ये व्यवसाय म्हणून समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. त्यानी अनुसुचित जातीला मिळणाऱ्या लोनद्वारे एक शिलाई मशीनसोबत काही अन्य सामान खरेदी आणि एक बुटीक शॉप ओपन केले होते. त्यानंतर पुन्हा त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही.

कल्पना जेव्हा २२ वर्षाची झाली तेव्हा त्यांनी फर्नीचरचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर कल्पना यांनी स्टील फर्नीचरमधील एका व्यापाऱ्यासोबत लग्न केले पण १९८९मध्ये एक मुलगा आणि मुलगीची जबाबदारी तिच्यावर सोडून त्यांनी जगाचा निरोप घेतला.

अशी पलटले नशीब

कल्पनाचा संघर्ष आणि परिश्रम ज्यांना माहीत होते ते त्यांचे शिष्य बनले आणि मुंबईत त्याला ओळख मिळू लागली. याच ओळखीच्या जोरावर कल्पनाला कळले की, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या कामगारांना 17 वर्षांपासून बंद असलेली कमानी ट्यूब सुरू करण्यास सांगितले आहे. कंपनीच्या कामगारांना कल्पना यांची भेट घेऊन कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. अनेक वादांमुळे ही कंपनी 1988पासून बंद होती. परिश्रम आणि धाडसाच्या जोरावर कल्पना यांनी कामगारांसह 17 वर्षांपासून बंद पडलेल्या कंपनीत जीवदान दिले. कल्पना सरोजचा हा एक चमत्कार आहे की, आज कमानी ट्यूब्स ही 500 कोटींहून अधिक कंपनी बनली आहे.

यशाचा अखेर झाला सन्मान

या महान कामगिरीसाठी, त्यांना 2013 मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आणि कोणतीही बँकिंग पार्श्वभूमी नसतानाही, सरकारने तिचा भारतीय महिला बँकेच्या संचालक मंडळावर समावेश केला. कल्पना सरोज यांच्याकडे कमानी स्टील्स, केएस क्रिएशन्स, कल्पना बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कल्पना असोसिएट्स यांसारख्या डझनभर कंपन्यांचीही मालकी आहे. या कंपन्यांची रोजची उलाढाल कोट्यवधींची आहे. पद्मश्री आणि राजीव गांधी रत्नाव्यतिरिक्त कल्पना यांना तिच्या सामाजिक सेवा आणि उद्योजकतेसाठी देश-विदेशात डझनभर पुरस्कार मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: हा देश अंबानीच्या मुलाच्या वडिलांचा…; महादेवीसाठी कुणाल कामरा मैदानात, नव्या ट्विटनं पुन्हा अडचणीत येणार?

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: पाचोर्‍यातील कृष्णापुरीतील उपद्रवी माकडाला पकडण्यात यश

SCROLL FOR NEXT