Crime News esakal
Nagpur_old

Crime News: गर्लफ्रेंडला मोबाईल गिफ्ट देण्यासाठी काढलं सावकारी कर्ज, फेडता येईना म्हणून आजीला..

सकाळ डिजिटल टीम

यवतमाळ: अवैध सावकारीचा फास ग्रामीण व शहरी भागात घट्ट आवळला गेला आहे. शेतकरी, कामगार, मजूर, नोकरदार, प्रतिष्ठित आदी कर्जदार झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातून शाळा-महाविद्यालयांत शिक्षण घेणारे विद्यार्थीही अडकत चालले आहेत.

अकरावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने प्रेयसीला मोबाईल देण्यासाठी सावकाराकडून कर्ज घेतले. कर्ज परतफेड अशक्य झाल्याने चक्क नातेवाईक म्हणून घरी आलेल्या आजीचे दागिनेच चोरले. त्यामुळे विद्यार्थ्याचा भंडाफोड झाला.

यवतमाळ शहरापासून काही अंतरावर असलेल्या एका गावखेड्यातील विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाल्यावर त्याने अकरावीसाठी प्रवेश घेतला. दरम्यान, त्याची ओळख एका युवतीसोबत झाली. आई आजारी असते, त्यामुळे घरची परिस्थिती हलाखीची आहे.

तुझ्यासोबत बोलत राहावेसे वाटते. मात्र, मोबाईल घेण्यासाठी पैसे नाहीत, अशाप्रकारे इमोशनल ब्लॅकमेल केले. विद्यार्थ्याने आपली परिस्थिती नसताना एका मित्राच्या माध्यमातून पंधरा हजार रुपयांचे सावकारी कर्ज घेत प्रेयसीला मोबाईल दिला.

एखादे काम करून पैशांची परतफेड करण्याचा त्याचा विचार होता. त्यासाठी एका दुकानात नोकर म्हणून राहिला. काही दिवस व्याजाचे पैसे भरले. तरीही कर्ज फेडताना नाकीनऊ येत असल्याने एक दिवस घरी पाहुणपणाला आलेल्या आजीचे दागिनेच चोरले आणि ते विक्रीसाठी एका सराफाच्या दुकानात गेला.

सराफाने दागिन्याची तपासणी केली असता, ते बेन्टेक्सचे निघाले. दागिने विक्रीसाठी आलेला मुलगा लहान दिसत असल्याने त्यांचा संशय बळावला. विश्‍वासात घेऊन कुठे शिकत आहे, अशी विचारणा केली. तो शिक्षण घेत असलेल्या शाळेतील शिक्षक सराफाच्या ओळखीचे होते.

त्यांनी तत्काळ शिक्षकाला फोन लावून दुकानात बोलावून घेतले. शिक्षक दिसताच विद्यार्थी घाबरला. शिक्षकाने बोलते केल्यावर घडलेला प्रकार विद्यार्थ्याने सांगितला. त्याचा एक अल्पवयीन मित्रच सावकाराकडे वसुलीचे काम करीत असून, त्याच्या माध्यमातून कर्ज घेतल्याची बाब समोर आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: नवी मुंबईच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! महापालिका निवडणुकीत १४ गावांचे पुनरागमन; २५ वर्षांनंतर इतिहास पुन्हा घडणार

Latur Protest : औराद शहाजनीत तरुणाच्या मृत्यू प्रकरणावर संताप; बाजारपेठ कडकडीत बंद; सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी!

अखेर ठरलं! अकोल्यात महायुतीचा एकत्र लढा; ५५-१५-१० चे सुत्र अवलंबणार, कोणाला किती फायदा?

Video: पुण्यात दोन बिबट्यांची झुंज! नारायणगावमध्ये गव्हाच्या शेतात थरार; दगड फेकला अन्...

आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी; राज्य सरकारचा मोठा निर्णय, पण ॲलोपॅथिक डॉक्टरांचा विरोध

SCROLL FOR NEXT