विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विद्यार्थी  
युथ्स-कॉर्नर

विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजिच्या टीमने घडवला मतदार नोंदणीचा विक्रम!!

टीम YIN युवा

विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजिच्या सोशल वेलफेअर अँड डेव्हलपमेंट कमिटी(NSS) टीमने आयोजित केलेल्या मताधिकार अभियानांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्यामुळे मतदार नोंदणी मध्ये एक अभूतपूर्व विक्रम घडविण्यात आला आहे. तब्बल 3454 नवीन मतदारांची नोंदणी या अभियानांतर्गत झाली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मतदानाच्या हक्कांबद्दल जागरूक करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आपली नावं मतदार यादीत समाविष्ट करून घेतली त्यामुळे तरुण वर्गातील मतदारांची संख्या वाढण्यास महत्त्वपूर्ण हातभार लागला आहे.

या अभियानाचे आयोजन महाविद्यालयाचे संचालक डॉ. राजेश जालनेकर , विद्यार्थी उपक्रम समन्वयक प्रा. डॉ. कौशल्या थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या अभियानासाठी भारतीय निवडणूक आयोगातर्फे नोडल ऑफिसर म्हणून गजानन गांभिरे, कॅम्पस ॲम्बेसेडर ज्ञानेश्वरी घुगे ह्या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली होती. "प्रत्येक मत महत्वाचे आहे" या घोषवाक्यखाली मतदार जागरूकता वाढवण्यासाठी कार्यशाळा, स्पर्धा, रॅली आणि चर्चासत्र असे उपक्रम आयोजित करण्यात आले. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीची प्रक्रिया सविस्तरपणे समजून देण्यात आली आणि ऑनलाईन नोंदणीसाठी तांत्रिक मार्गदर्शन देण्यात आले. मतदान प्रक्रियेचे महत्त्व पटवून देण्यासाठी महाविद्यालयाच्या NSS टीमने विविध सृजनशील उपक्रम राबवले .

विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे मतदार नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आणि महत्त्वाच्या टप्प्यांवर ती यशस्वीरित्या पार पडली.

या मतदार नोंदणी अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये मतदार होण्याची आणि आपल्या देशाच्या लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याची नवी उमेद निर्माण झाली आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT