युथ्स-कॉर्नर

अजिंक्य डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी.

टीम YIN युवा

अजिंक्य डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या अंतरमहाविद्यालयीन मुष्टीयुद्ध आणि जुडो स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली.

महाविद्यालयाच्या कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. कमलजीत कौर आणि प्राचार्य डॉ. फारुक सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनी आर्या मोरे हिने जुडो क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक, तर विद्यार्थी सिद्धांत हाके याने मुष्टीयुद्ध प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच विद्यार्थी हर्षल परदेशी याने द्वितीय क्रमांक पटकावला आणि आंतरविभागीय स्पर्धांसाठी निवड निश्चित केली.

हॉलीबॉल, टेबल टेनिस, रेसलिंग आणि योगा यांसारख्या विविध क्रीडा प्रकारांमध्येही महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

महाविद्यालयाचे क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. प्रशांत लोंढे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांच्या यशासाठी विशेष प्रयत्न केले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. कमलजीत कौर यांनी क्रीडा विभागाचे आणि सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

Oldest Cities in the world : भारत नाही, तर जगातल्या 'या' 5 शहरांना मानले जाते सगळ्यात जास्त प्राचीन..11000 वर्षांपूर्वीचा वारसा

SCROLL FOR NEXT