यिन कला महोत्सव विजेत्या आणि सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण क्षण

 
युथ्स-कॉर्नर

यिन कला महोत्सवात आकुर्डीचे डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल विद्यापीठ महाविजेता.

पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय उपविजेता - दोन दिवसांच्या महोत्सवात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

टीम YIN युवा

निगडी, ता. ६ : सकाळ माध्यम समूह आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय यिन कला महोत्सवात डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल विद्यापीठ, आकुर्डी यांनी महाविजेतेपद पटकावले. तर डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, पिंपरी हे उपविजेते ठरले.

या महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ आकुर्डी येथील एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड इंजिनिअरिंगच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या जल्लोषात, टाळ्या आणि उत्सुकतेच्या वातावरणात कलाकारांना गौरविण्यात आले.

या सोहळ्यास अभिनेता अतुल कुडले, सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे, पीसीईटी व पीसीयूचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, यिनचे वरिष्ठ व्यवस्थापक शामसुंदर माडेवार आणि सकाळचे उपसंपादक जयंत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सकाळ उद्योग समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) च्या वतीने दरवर्षी या कला महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा या महोत्सवाचे तिसरे वर्ष असून, पिंपरी चिंचवड परिसरातील विद्यार्थ्यांचा यंदा विक्रमी प्रतिसाद लाभला.

दोन दिवस रंगलेल्या या महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार उत्कृष्टरीत्या सादर केले. महोत्सवाचा समारोपही तितक्याच उत्साहात पार पडला.

अभिनेता अतुल कुडले म्हणाले, "यशासाठी सातत्यपूर्ण मेहनत आणि नाविन्यपूर्ण काम आवश्यक आहे. संयम ठेवा, यश निश्चित मिळते."

सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर राहा आणि आपल्या आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा."

डॉ. गिरीश देसाई म्हणाले, "विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असून, अधिकाधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा."

स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे -

माती शिल्प - प्रथम रंजीत पोटले, द्वितीय तनय झोडे, तृतीय पूजा गोल्डर.
कॅरिकेचर - प्रथम स्वर्ण पाटील, द्वितीय साईनाथ लुटे, तृतीय जयदीप वाकडे.
मेहेंदी - प्रथम अचल खोपडे, द्वितीय तनिष्का भोसले, तृतीय वैष्णवी चांदणे.
रांगोळी - प्रथम विनायक चव्हाण, द्वितीय प्रार्थना वाला, तृतीय मधुवर्शिनी वेझावेंदन.
चित्रकला - प्रथम सिद्धांत सिरसाट, द्वितीय चंचल वर्मा, तृतीय अंशुल मेश्रराम.
कोलाज वर्क - प्रथम अनुजा तुपे, द्वितीय अनुष्का अरगडे, तृतीय तनुजा नानेकर.
वादविवाद - प्रथम चेतना गोरडे व तेजस्विनी गुणारकरन, द्वितीय नयाशा तिवारी, तृतीय डी'सूझा सलोमे व ऐश्वर्या पिल्लई.
वक्तृत्व - प्रथम दिव्या पिंगळे, द्वितीय दिव्या केंजळे, तृतीय यशराजे देवगुंडे.
पथनाट्य - प्रथम सृष्टी जाधव, द्वितीय किरण कोकाटे.
माइम अ‍ॅक्ट - प्रथम स्वप्निल निंबाळकर.
सोलो डान्स - प्रथम सोहम मल्लिक, द्वितीय अथर्व मेहता, तृतीय ईशा आढाव.
रॅप - प्रथम प्रथमेश वाघ, द्वितीय ओम पासी, तृतीय साई काक.
कविता - प्रथम मानसवी काळे, द्वितीय राहुल खंडभोर, तृतीय प्रतीक भंगारे.
स्टँड-अप कॉमेडी - प्रथम क्षितिज जाधव, द्वितीय साहिल येवले, तृतीय रोहन पवार.
गायन - प्रथम सम्यक नून, द्वितीय सल्यानी साहू, तृतीय मिथिली शर्मा.
गट नृत्य - प्रथम एआयटी फिटापर्स, द्वितीय प्रगती मसाळ व टीम, तृतीय सृष्टी देवगडे व टीम.
मोनो अ‍ॅक्ट - प्रथम अनघा कुलकर्णी, द्वितीय श्रींगेरी देशपांडे, तृतीय साक्षी पोखरकर.
स्किट - प्रथम प्रतिभा कॉलेज, द्वितीय सरहद कॉलेज, तृतीय कुमिन्स कॉलेज.
फॅशन शो (मिस्टर यिन) - प्रथम श्रीहर्ष नरवाडे, द्वितीय अरमान खान, तृतीय नीम.
फॅशन शो (मिसेस यिन) - प्रथम अंजली, द्वितीय अनन्या साळवे, तृतीय अनुष्का मुकरे.
फोटोग्राफी - प्रथम अमित अंकलगिकर, द्वितीय आकाश जाधव, तृतीय आदित्य वाघमारे.

परीक्षक म्हणून प्रभाकर पवार, कृपा चव्हाण, प्रणिता आहेर, देवदत्त कशाळेकर, अनुपम कुंभार, वर्षा अनंथरामन, दिग्विजय पवार, मयुरेश महाजन, प्रांजली कांबळे आणि अमृता ओंबळे यांनी काम पाहिले.

अभिनेता अतुल कुडले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

Marathi News Live Updates: अंगारकी चतुर्थीनिमित्त मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण

World Heart Day 2026: कार्डिओफोबिया म्हणजे काय? लक्षणे, कारणे आणि उपचार याबद्दल संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT