युथ्स-कॉर्नर

मुझको भी तू मेंटेन करा दे! 

सकाळवृत्तसेवा

बाइकची मस्त राइड घ्यायला, इम्प्रेशन मारायला आपल्या सगळ्यांना आवडतंच; पण जी बाइक किंवा टू-व्हीलर आपल्याला इतकी उपयोगी पडते, आपली काळजी घेते; तिची काळजी आपण घेतो का? आपण आपल्या शरीराची, आहाराची, कपड्यांची काळजी घेतो; तशी बाइकचीही काळजी घ्यायला पाहिजेच. अनेक जण घेत असतीलच; पण अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. बाइकची छान काळजी घेतली, तर ती आपली काळजी घेते. त्यामुळे बाइकचा मेंटेनन्स कसा राखायचा, याचे काही सोपे कानमंत्र आपण बघूया.

बाइक स्वच्छ ठेवा 
खरं तर अगदी साधा सोपा मंत्र; पण अनेकांना ते जमत नाही. बाइक रोजच्या रोज पुसायला पाहिजेच; पण किमान पंधरा दिवसांमधून ती धुवायला पाहिजे. शक्य असल्यास प्रेशर वॉशिंग तीन महिन्यांमधून तरी नक्की करा. याचे खूप फायदे आहेत. एक तर बाइक छान दिसतेच, पण खूप धूळ, चिखल साठत गेला, तर गंज चढण्याचा धोका असतो. अनेक पार्ट्स खराबही होऊ लागतात. त्यामुळे क्लीनिंग इज मँडेटरी. 

टायरचं प्रेशर योग्य ठेवा 
टायर हे ट्यूब असलेलं असो किंवा ट्यूबलेस, त्यातलं हवेचं प्रेशर योग्य प्रमाणातच हवं. ते जास्त झालं, तर टायर फुटण्याचा धोका आणि कमी झालं, तर मायलेजपासून पंक्चरपर्यंत अनेक गोष्टींचा धोका. त्यामुळे योग्य प्रेशर सतत मेंटेन करा. हवा भरण्याचं एकच गॅरेज ठेवलंत तर उत्तम. टायर प्रेशर नियमितपणे चेक करण्यामुळं पंक्चर असल्यास त्याचा अंदाज लवकर येतो आणि नंतरचे अनेक त्रास वाचतात. 

चेन टाइट हवी 
गाडीची चेन हा दोन चाकांना जोडणारा दुवा असतो. तो व्यवस्थित पाहिजे. तुम्हाला अनेकदा चेन लूज झाल्याचा आवाज येत असतो; पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता. मात्र, त्यामुळे घर्षण जास्त वाढतं आणि चेन तुटण्याचा धोका असतो. गाडी चालवत असताना चेन अचानक तुटली, तर त्यामुळे जीवघेणे अपघात होतात. चेन लूज असेल तर गाडीचं मायलेजही कमी होतं. चेनचं ऑईलिंगही शक्य असल्यास स्वतः नियमितपणे केलंत, तर त्यामुळं चेनचं आयुष्य वाढेल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नियमित सर्व्हिसिंग 
गाडी कितीही उत्तम चालत असली, तरी ती नियमितपणे सर्व्हिंसिंगला द्यायलाच हवी. अनेक त्रुटी तुमच्या लक्षात येत नाहीत- पण मेकॅनिकच्या बरोबर लक्षात येतात. त्यामुळे सर्व्हिंसिंग पाहिजेच. खूप काळानंतर सर्व्हिसिंग केलंत, तर खर्च वाढतात- कारण अनेक भाग मर्यादेपुढे खराब झालेले असतात. नियमितपणे सर्व्हिसिंग करण्याची सवय असेल, तर हे खर्च आटोक्यात राहतात. नियमित सर्व्हिसिंगमुळे अचानक होऊ शकणारे बिघाड जवळजवळ रद्द होतात, मायलेज चांगलं राहतं आणि गाडी एकदम फिट राहते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT