Car 
युथ्स-कॉर्नर

झूम... : लॉकडाउनमध्ये कार सुरक्षित ठेवण्यासाठी..

चंद्रकांत दडस

लॉकडाउनमुळे कार घराबाहेर किंवा पार्किंगमध्ये उभ्या आहेत. लॉकडाउन संपल्यानंतर गाडी सुरू करताना अनेक समस्या येऊ शकतील. कार सुरू करताना त्रास होऊ नये, यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स...

कारचे बाह्यरंग स्वच्छ ठेवा
एकाच जागेवर खूप दिवस वाहन उभे केल्यास त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ आणि कचरा जमा होतो. यामुळे ते स्वच्छ करण्यास अधिक वेळ लागतो किंवा कायमस्वरूपी डाग पडतात. यामुळे आठवड्यातून किमान दोनदा कारवर जमा झालेली धूळ आणि कचरा काढावा. यासाठी केवळ पाण्याचा वापर केला तरी चालेल. कार इनडोअर पार्क करत असल्यास कव्हर टाकण्यास विसरू नका. त्यामुळे कारवर अधिक प्रमाणात धूळ साचणार नाही.

इंटेरिअर स्वच्छ ठेवा
कारचा नियमित वापर करताना वाहनाच्या स्टोअरेज स्पेसमध्ये काही अतिरिक्‍त वस्तू ठेवल्या जातात. त्या बाहेर काढून केबिन स्वच्छ करा. अन्यथा कारमध्ये दुर्गंधी निर्माण होऊ शकते. गाडीचे इंटेरिअर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी औषध फवारणीही करू शकता.

बॅटरी मेंटेनन्स
खूप दिवसांपर्यंत गाडी बंद राहिल्यास बॅटरी डिस्चार्ज होऊ शकते. गाडी सुरू करताना मोठी समस्या येऊ शकते. हे टाळण्यासाठी बॅटरीला चार्ज करणे आवश्‍यक आहे. प्रत्येक दोन-तीन दिवसांनी कार स्टार्ट करून १५ ते २० मिनिटांपर्यंत चालू राहुद्या. यामुळे इंजिन गरम होण्यास मदत होईल. यादरम्यान कारचे वायपर, एसी, लाइट सुस्थितीत आहेत का, याचीही तपासणी करा.

हॅण्ड ब्रेक
कारला हॅण्ड ब्रेक न लावता ती उभी करा. खूप दिवसांपर्यंत हॅण्ड ब्रेक लाऊन ठेवल्यामुळे कारचे ब्रेक खराब होऊ शकतात किंवा कारचा ब्रेकही लॉक होऊ शकतो. कारला सपाट पृष्ठभागावर गिअरमध्ये टाकून उभी करू शकता. कार उताराच्या ठिकाणी उभी असल्यास चाकांखाली वीट किंवा दगड ठेवून द्या. यामुळे गाडी पुढे जाणार नाही.

टायर प्रेशर
तुम्ही गाडी वापरा किंवा नका वापरू, काही वेळानंतर गाडीच्या टायरमधील हवा आपोआप कमी होते. खूप दिवसांसाठी कार एकाच जागेवर उभी असल्यास टायरवर एका बाजूला फ्लॅट स्पॉट होण्याची शक्‍यता वाढते. काही ठरावीक दिवसांनंतर गाडीला थोडे पुढे मागे करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनचे शतक अन् CSK ची मुंबईत घुसून दादागिरी! आयपीएलमधील सर्वात मोठा विजय, गुणतालिकेत मोठी उलथापालथ

Video Viral : येडे गबाळे! PSL च्या टॉसच्या वेळेस मारामारी, डेव्हिड वॉर्नरला काय चाललंय कळेना... हसावं की पळावं? झाला कन्फ्युज...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार! महिलांकडून वसुली पूर्ण, पण पुरुषांवर निर्णय प्रलंबित का?

West Bengal Voting : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगाल-तामिळनाडूत विक्रमी मतदान, निवडणूक आयोगाचा मतदारांना सलाम

Sanju Samson Century: १० चौकार, ६ षटकार! संजूच्या शतकाने मोडले अनेक विक्रम; रोहित शर्माशी बरोबरी, गिलख्रिस्टवर पडला भारी

SCROLL FOR NEXT