Colour 
युथ्स-कॉर्नर

फॅशन टशन : रंग बरसे

माधुरी सरवणकर-तेलवणे

विविध रंगांची उधळण करणारा सण म्हणजे होळी. हर्ष, उल्हास रंगांच्या माध्यमातून चहूकडे पसरवणाऱ्या या दिवशी कलरफुल प्लस ब्युटीफुल दिसलंच पाहिजे ना राव. मग या दिवशी देसी लुकला थोडा वेस्टर्न तडका दिला तर? हो ना, भारी आहे ना आयडिया! चला चर मग, होळी पार्टीची तयारी करूयात. प्रत्येक होळीच्या पार्टीत सर्व सेलिब्रिटी पांढऱ्या रंगाच्या पोशाखात दिसतात. त्यामुळं त्यांना पाहून आपल्यालाही पांढऱ्या रंगाचं भूत झपाटतं. असो. पांढरा रंग आहेच इतका क्‍लासी. बरं मुलींनो, देसी लुकसाठी तुम्ही लखनवी कुर्त्यावर छान पेन्सिल पँट घालू शकता. यावर ऑक्सिडाइज ज्वेलरी सुंदर दिसेल. याला वेस्टर्न तडका देण्यासाठी हा टॉप तुम्ही टोन जीन्सवरदेखील वापरू शकता.

तसेच टी-शर्ट, क्रॉप टॉपसोबत हॉट पँटचं कॉम्बिनेशन कमाल दिसतं. ‘ओके जानू’ या मूव्हीतील हम्मा गाण्यातील श्रद्धा कपूरनं घातलेली हॉट पँट आठवतेय का? ती पँट मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तीसुद्धा तुम्ही ट्राय करून बघा. प्रिंटेड मॅक्‍सी ड्रेस, जंप सूट हे पॅटर्नही क्‍लास दिसतात. अनारकली किंवा चुडीदार पॅटर्न तुम्ही निवडू शकता. बरं, रंगांमुळं केस खराब होण्याची शक्‍यता असते; त्यामुळं प्रिंटेड स्कार्फ किंवा स्टायलिश कॅप घालूनच घरातून बाहेर पडा.

मुलींनो, ज्यामध्ये आपण कंफर्टेबल फील करतो ती म्हणजे स्टाईल. त्यामुळं रंग खेळताना तुम्ही प्रथम स्वत:चा विचार करा. मोकळेपणानं वावरता येईल तोच ड्रेस होळी पार्टीसाठी निवडा. 

या झाल्या मुलींसाठीच्या टिप्स. मुलांनो, अब आपकी बारी है. प्लेन व प्रिंटेड शॉर्ट पँटसोबत टी-शर्ट हे कॉम्बो नेहमी छान दिसतं. हा ड्रेसकोड ट्राय करून तुम्ही होळी पार्टी रॉक करू शकता. देसी अवतारासाठी कुर्त्यासोबत धोती घालायला आवडेल ना तुम्हाला? टोन जीन्सवर प्लेन टी-शर्टची फॅशन तशी इन आहे. सुती पॅंटसह लाइट रंगाचा कुर्ता घालून तुम्ही भाव खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bajirao Road Murder: पुण्यात कायद्याचा धाकच संपला? बाजीराव रोडवर दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने खून, रस्त्यावर रक्तपात

Latest Marathi News Live Update : शिरुर तालुक्यात बिबट्या जेरबंद; तीन बळींच्या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक

Shukra Transit: २६ नोव्हेंबरपर्यंत तूळ राशीत राहणार शुक्र; मेष, वृषभसह 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव

Nashik Crime : कार्तिकी एकादशीला अवैधरीत्या दारू विक्री! महागड्या कारसह साडेसात लाखांचा मद्यसाठा जप्त, एकाला अटक

59 वर्षाच्या सलमानचा शर्टलेस लूक पाहून तरुणी घायाळ, सिक्स पॅक आणि अ‍ॅब्स पाहून अनेकांचं हार्टफेल

SCROLL FOR NEXT