Mind-Exercise 
युथ्स-कॉर्नर

लुक'फॅब' : मना सज्जना...!

मौशुमी नगरकर

शारीरिक स्वास्थ्याबाबत आपण खूप बोललो आहोत, मात्र मनामुळेच व्यायामात स्थिरता आणि दृढनिश्‍चय निर्माण होतो. व्यक्तिमत्त्व कोणत्या पद्धतीने विकसित करायचे, यामध्ये मनाचा मोठा सहभाग असतो. मेंदू आणि स्नायू यांमध्ये काही प्रमाणात साम्य असतो, त्यावर काम करता येते, ते विकसित करून या साम्याची क्षमता वाढविताही येते. थोडक्‍यात काय, तर बळकट स्नायू आणि कार्यक्षम मेंदूचा तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो.

रोजच्या आयुष्यात आपल्याला अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागते, त्यामुळे आपले चित्त विचलित होते. साहजिकच आपण चिडतो आणि रागाचे कारणही निश्‍चित करू शकत नाही. अनेकदा चूक नसलेल्या व्यक्तीवर आपण चिडतो. इच्छा- आकांक्षा पूर्ण न झाल्यामुळेच तसे घडते. आपली मानसिकता कशी आहे, यावरही आपल्या आजूबाजूचे वातावरण ठरते. तुम्ही कायम चिडचिडे, असमाधानी असल्यास तुमच्या भोवताली त्याच पद्धतीची मानसिकता असलेल्या व्यक्ती गोळा होतात. त्याचा आपल्या मनावर नकारात्मक परिणाम होतो. तुम्ही समाधानी, आनंदी असल्यास त्याच विचारांच्या व्यक्तींना तुम्ही स्वतःकडे आकर्षित करू शकता. त्या व्यक्ती तुम्हाला यशासाठी मार्ग दाखवत पुढे नेतात. आपल्या भोवताली कोणत्या विचारांच्या व्यक्ती असतात, हे व्यक्तिमत्त्वासाठी विशेष महत्त्वाचे असते.

संतुलित मनाच्या व्यक्तीच सकारात्मक आणि नकारात्मक विचारांबाबत योग्य निर्णय घेऊ शकतात. कोणत्याही परिस्थितीत चित्त विचलित न होऊ देता त्या योग्य पद्धतीने निर्णय घेऊ शकतात. मनाचे संतुलन योग्य व्यायामामुळे साधता येते. मनाचे व्यायाम केवळ संवेदनशील बनवीत नाहीत, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cockroach Janata Party: दिल्लीत ‘कॉक्रोच’ची एन्ट्री! जंतरमंतरवरील आंदोलनाला पोलिसांची परवानगी; हजारो युवक जमणार

Kolhapur Police Transfers : कोल्हापूर जिल्ह्यातील दहा पोलिस निरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या, एसपींनी काढले आदेश

Latest Marathi News Update: नागपूरमध्ये ३५३ व्या शिवराज्यभिषेक दिन सोहळ्यानिमित्त साहसी खेळांचं सादरीकरण

अभिजीतला विमानतळावरून अधिकाऱ्यांनी अज्ञातस्थळी नेलं, संपर्क होईना; CJPच्या दाव्याने खळबळ, आंदोलनाला परवानगी

Pune: पुणे दुर्घटनेनंतर दारूमाफियांविरोधात राज्यव्यापी सर्जिकल स्ट्राईक; आठ दिवसांत ३,३१२ गुन्हे; २,७५७ जणांना अटक, ७४ हजार लिटर गावठी दारू जप्त

SCROLL FOR NEXT