Army-Help
Army-Help 
युथ्स-कॉर्नर

गॅजेट्स : सैन्यदलाची 'तांत्रिक' मदत

ऋषिराज तायडे

भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आपल्यापरीने हातभार लावत आहे. कोरोनाच्या या युद्धात भारतीय सैन्यदलानेही पुढाकार घेतला असून, रुग्णालये उभारण्यासह तांत्रिक स्वरूपाची मदतही दिली आहे. जाणून घेऊया याबाबत...

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

1) बायोसूट
डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेण्ट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) विकसित केलेला हा बायोसूट खास डॉक्टरांसाठी आहे. नौदलातील जवानांना पाणबुडीतून काम करताना परिधान कराव्या लागणाऱ्या सूटप्रमाणे या बायोसूटची वैशिष्ट्ये आहेत.

2) स्वयंचलित ट्रॉली
कोरोना रुग्णांच्या काळजी घेताना वैद्यकीय सेवकांना वारंवार त्यांच्या संपर्कात यावे लागते. त्यांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू देताना इतर लोक त्यांच्या संपर्कात न येण्यासाठी भारतीय भूदलाच्या इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड मेकॅनिकल इंजिनियर्सने खास स्वयंचलित ट्रॉली विकसित केली आहे. रिमोटच्या साह्याने नियंत्रित होणारी ही ट्रॉली वैद्यकीय सेवकांपर्यंत जेवण, पाणी, इतर साहित्य पोचवून देईल. या ट्रॉलीमध्ये ट्रे, वॉश बेसिन, डस्टबिन आदींचीही सुविधा आहे.

3) ऑक्सिजन मल्टिफीडर 
कोरोनाच्या संकटात एकावेळी अधिकाधिक रुग्णांना उपचार मिळावे, यासाठी नौदलाने खास पोर्टेबल ऑक्सिजन मल्टिफीडर तयार केले आहे. एका सिलिंडरमधील ऑक्सिजन एकावेळी सहाजणांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी हे मल्टिफीडर उपयोगी पडणार आहे.

4) तांत्रिक उपकरणे 
अत्यल्प खर्चात दर्जेदार उपचार व्हावेत, यासाठी भारतीय भूदलाने तंत्रज्ञानाचा वापर करत थर्मल स्कॅनर, अॅण्टी एअरोसलायसेशन बॉक्स, सर्जिकल मास्क त्याशिवाय हॅण्ड सॅनिटायझर विकसित केले आहेत.

5) डिसइन्फेक्शन बॉक्स
आग प्रतिबंधक ‘मिस्ट टेक्नोलॉजी’ तंत्रज्ञानाचा वापर करत दिल्ली येथील ‘सेंटर फॉर फायर एक्स्लोझिव्ह अॅण्ड एन्व्हायरमेन्ट सेफ्टी’ने (सीएफईईएस) ऑटोमॅटिक सॅनिटायझर डिसइन्फेक्शन बॉक्स विकसित केले आहे.

6) मायक्रोवेव्ह स्टेरिलायझर
डीआरडीओच्या पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीने खास यू-व्ही तंत्रज्ञानाचा वापर करत ‘अतुल्य’ हे खास मायक्रोवेव्ह स्टेरिलायझर विकसित केले आहे. यामध्ये वापरात येणाऱ्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण केले जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT