Fashion 
युथ्स-कॉर्नर

फॅशन टशन : खणाची साडी

ऋतुजा कदम

यापूर्वी आपण खणाच्या ड्रेसविषयी माहिती जाणून घेतली. मुली पूर्वी खणाची परकर-पोलकी घालायच्या. कॉटनच्या कोणत्याही साडीवर खणाचे ब्लाऊज हे अगदी पूर्वीपासूनचे समीकरण आहे. खणाच्या कापडामध्ये टॉप, ड्रेस, साडी असे अनेक प्रकार आता पाहायला मिळतात. खणाची ओढणीही वेगळी आणि ट्रेंडी दिसते. अस्सल मराठमोळा पोशाख असणाऱ्या खणाने पुन्हा एकदा फॅशनच्या जगात प्रवेश केला आहे. कोणत्याही सणाला किंवा घरगुती कार्यक्रमाला खणाची साडी एक उत्तम पर्याय आहे. जाणून घ्या खणाच्या साडीविषयी अधिक माहिती. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पारंपरिक डिझाइन
साड्यांमध्ये दरवेळी काहीतरी नवीन फॅशन येताना दिसते. मात्र, नवीन फॅशनसह जुन्या पारंपरिक डिझाइनलाही नव्या रूपात सादर करण्यात येते. त्यातीलच एक आहे खणाची साडी. सेलिब्रिटींपासून अगदी सामान्यांपर्यंत सर्वांनाच खणाच्या साड्यांचे आकर्षण आहे. साड्यांचे कलेक्शन आपल्याकडे असते. पण, सणासुदीला व कार्यक्रमाला किंवा इतरवेळी घालण्यासाठी वॉडरोबमध्ये काहीतरी वेगळे कलेक्शन नक्की असावे. यामध्ये खणाची साडी असणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या सणांत खणाची साडी सर्वांपेक्षा वेगळा लुक देईल. 

कशी करावी फॅशन?

  • खणाची साडी घालताना ब्लाऊज शक्यतो प्लेन असावा. खणाच्या साडीवर तसाच खणाचा ब्लाऊज घालू नये. त्यामुळे साडीचा लुक कमी आकर्षित होतो.
  • खणाची साडी आकर्षक प्रकार असल्याने त्यावर खूप फॅशन करणे टाळा. 
  • खणाच्या साडीवर सिल्व्हर ज्वेलरी शोभून दिसते. इतर कोणत्याही प्रकारची अॅक्सेसरीज घालण्यापेक्षा सिल्व्हर ऑक्सेडाईज गळ्यातले, कानातले आणि नोज रिंग घालावी. 
  • केसांचा अंबाडा/हेअर बन करावा. त्यासोबत गजरा माळल्यास लुक पूर्ण होण्यास मदत होईल. 
  • मोठे कानातले घातल्यास गळा शक्यतो मोकळा ठेवावा. केस मोकळे सोडल्यास कानातले न घालता फक्त गळाबंद सिल्व्हर हार घालावा.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Alert : कोयना धरणात 24,938 क्युसेकने पाण्याची आवक; उद्या सकाळी 'या' वेळेत धरणातून 1050 क्युसेक विसर्ग सुरू होणार, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

“आई आणि बहीण ५ वर्षांपासून बोलत नाहीत” राम कपूर खुलासा करत म्हणाला...'वडिलांना मृत्यू स्वीकारण्यात मदत केली'

Latest Live Updates Marathi : : लोकसभेत विरोधकांचा गदारोळ

Ramesh Mhatre: हवं तर तडीपार करा, पण जेलमधून बाहेर सोडा; जामिनासाठी शिंदेंच्या नेत्याची हायकोर्टात गयावया

India Probable Playing XI vs Sri Lanka: ७ फलंदाज, २ अष्टपैलू, ६ गोलंदाज... पण, प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा कुणाला? जाणून घ्या भारताचे तगडे ११ खेळाडू

SCROLL FOR NEXT