Bob-Cut 
युथ्स-कॉर्नर

ग्रुमिंग : इन्व्हर्टेड बॉब कट

ऋतुजा कदम

चांगला लुक येण्यासाठी गरजेची असते ती हेअरस्टाइल. दैनंदिन जीवनात आपण हेअरस्टाइल करतोच असे नाही. खरंतर, रोज इतका वेळ मिळतोच असंही नाही. रोज चांगल्या लुकसाठी वेगवेगळे हेअरकट आपण नक्कीच करून बघतो. केसांच्या विविध प्रकारांप्रमाणे हेअरकट पाहायला मिळतात. या वर्षी ‘इन्व्हर्टेड बॉब कट’ हा सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होताना दिसतोय. केसाच्या या धाटणीविषयी अधिक जाणून घेऊया...

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हेअरकटचे अनेक प्रकार असले, तरी प्रामुख्याने केस मोठे किंवा लहान असतात. बॉब कट म्हणजेच अगदी लहान केस, साधारण मानेपर्यंत किंवा त्यापेक्षाही लहान. इन्व्हर्टेड बॉबमध्ये कोणत्याही एका बाजूचे केस दुसऱ्यापेक्षा मोठे असतात. जेणेकरून संपूर्ण केस एका बाजूला झुकले आहेत असे भासते. या प्रकारच्या धाटणीला ग्रॅज्युएटेड बॉब असेही म्हटले जाते. हा कट बहुधा साध्या बॉबकटऐवजी मागील बाजूस अधिक वक्राकार दिसू शकतो. केसांच्या पुढच्या आणि मागील भागाच्या लांबीमधील फरक हा कमी-जास्त पाहायला मिळतो. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी हा हेअरकट केला आहे.

1) तुम्हाला लहान केसांची स्टाइल निवडायची असल्यास हा नक्कीच एक चांगला आणि क्लासिक पर्याय आहे.
2) हा हेअरकट करण्याआधी तुमचा चेहरा नक्की कोणत्या प्रकारात मोडतो हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक चेहऱ्याला हा शोभून दिसेल असे नाही. त्यासाठी जवळच्या व्यक्तींची किंवा हेअरड्रेसरची मदत घ्या.
3) हा हेअरकट साधारण सरळ केसांवर अधिक पाहायला मिळतो. परंतु, मध्यम कुरळ्या केसांनादेखील हा कट देता येऊ शकतो.
4) अतिशय ट्रेंडी आणि सगळ्यांपेक्षा वेगळा असा हा हेअरकट आहे. इन्व्हर्टेड बॉब कटमध्येही विविध प्रकार आहेत. केसाची उंची, प्रकार आणि तुमचा चेहरा या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही स्टाइल निवडू शकता. 
5) गेल्या काही महिन्यांमध्ये इन्व्हर्टेड बॉब कट पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आला आहे. सोशल मीडियावर याविषयी खूप क्रेझ आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : भुसावळमध्ये संत गाडगेबाबा कॉलेजच्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT