युथ्स-कॉर्नर

ऑन स्क्रीन : स्वराज्याचा इतिहास मांडणारी ‘स्वराज्यजननी जिजामाता’

संतोष शाळिग्राम

स्वराज्याचा आकार जन्माला आला, त्यात राजमाता जिजाऊ यांचे माहात्म्य कालातीत आहे. त्याचे यथार्थ चित्रण ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत पाहायला मिळते. जिजाऊंचा लहानपणापासूनचा प्रवास यात मांडला आहे. या मालिकेचे नवे वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आता खासदार अमोल कोल्हे  दिसणार आहेत. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून संभाजी महाराजांचा शौर्याचा इतिहास त्यांनी दाखविला. आता मातेच्या शिकवणीतून स्वराज्यनिर्मितीचा आविष्कार त्यांच्या अभिनयातून दिसणार आहे. 

ज्ञात असणारा इतिहास सोडून, नंतरच्या घडामोडी आणि जिजाऊंच्या नजरेतून मांडलेला इतिहास म्हणजे ही मालिका आहे. या मालिकेत बाल शिवाजी महाराजांची भूमिका दिवेश मेडगे या बालकलाकाराने, तर जिजाऊ माँसाहेबांची भूमिका भार्गवी चिरमुले यांनी साकारली होती. शिवरायांच्या बालपणीच्या काळातील घटना चित्रित करून झाल्यानंतर मालिकेत आता नव्या पर्वाला सुरुवात होत आहे. त्याचे कथानक पुढे सरकत असून, उत्तरार्धातील इतिहास मांडण्यासाठी पात्रांमध्ये बदल होत आहेत. त्यामुळे आता जिजाऊंच्या भूमिकेत अभिनेत्री नीना कुळकर्णी, तर शिवाजी महाराजांच्या भूमिकेत या मालिकेचे निर्माता अमोल कोल्हे दिसणार आहेत.

महाराष्ट्रात नेतृत्व, कर्तृत्व, मातृत्वाची मूर्ती असलेल्या आईसाहेब जिजाऊ यांचे स्वतःचे असामान्य व्यक्तिमत्त्व अधोरेखित करणे या मालिकेचे उद्दिष्ट. मुलाच्या वाढत्या कर्तृत्वानुसार आई म्हणून स्वराज्याचा वाढता व्याप जिजाऊ माँसाहेबांनी कसा सांभाळला, याचे चित्रण या मालिकेतून मांडणार आहे. माणसाच्या जन्माला येऊन कर्तृत्ववाने देवत्व प्राप्त करता येते, हे शिकवणाऱ्या शिवरायांची भूमिका साकारायला मिळणे, हे भाग्याचे आणि जबाबदारीचे काम आहे. व्यक्तिपूजेपेक्षा त्यांचे कार्य, कर्तृत्व आणि स्वराज्यनिर्मितीसाठी केलेले योगदान लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न असल्याची भावना कोल्हे व्यक्त करतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्वराज्याचा पसारा सांभाळणाऱ्या जिजाऊंचे स्वराज्यासाठी नैतिक अधिष्ठान होते, असे जगाच्या पाठीवर एकमेव उदाहरण आहे. स्वराज्याच्या निर्मितीला प्रेरणा देणाऱ्या आईसाहेब जिजाऊ यांचे महाराजांची आई म्हणून किंवा संभाजी महाराजांची आजी म्हणून असणारे कर्तृत्व, महाराष्ट्राचे नेतृत्व, कर्तृत्व, मातृत्वाची मूर्ती असलेल्या जिजाऊ यांचे असामान्य व्यक्तिमत्त्व या मालिकेतून अधोरेखित होणार आहे, असे खासदार कोल्हे त्यांनी सांगितले. जिजाऊंच्या कर्तृत्वाचा ठसा आजही प्रत्येकाच्या मनात घर घरून आहे. त्यांच्या बालपणापासूनचा इतिहास या मालिकेत पाहायला मिळत असल्याने थोड्याच कालावधीत या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. स्वराज्याची शपथ हा एपिसोड महाराष्ट्रातील जनतेच्या विशेष पसंतीस उतरला. 

महाराष्ट्राच्या स्वराज्याची यशोगाथा आगळ्यावेगळ्या दृष्टीने सांगणारी ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिका दर सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता ‘सोनी मराठी’ वाहिनीवर सुरू आहे. त्यात आता अमोल कोल्हे आणि नीना कुळकर्णी या दोन मातब्बर कलाकारांच्या अभिनयाचा शिवशाही आविष्कार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

माझा शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विचारांवर चालण्याचा नेहमी प्रयत्न राहिला आहे. अभिनय हा माझा व्यवसाय नाही, तर महाराजांचे काम आहे. या प्रतिमा महाराष्ट्राची सीमा ओलांडून जगात पोचण्याचा आपण प्रत्येकाने केला पाहिजे. त्यांची प्रतिमा जागी ठेवण्याचे काम माझ्या हातून होते आहे, याचा मला अभिमान आहे. 
- अमोल कोल्हे, अभिनेता

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याणमधून ठाकरे उमेदवार बदलणार? आणखी एक अर्ज दाखल झाल्यानं चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : दक्षिण मुंबईतून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

Aranmanai 4 Twitter Review: कुणी म्हणालं, 'ब्लॉकबस्टर' तर कुणी म्हणालं, 'जबरदस्त VFX'; तमन्नाच्या 'अरनमनई 4'नं जिंकली नेटकऱ्यांची मनं

Naach Ga Ghuma Review: 'ती' देखील वर्किंग वूमनच...? हास्य आणि भावनिक क्षणांची रोलर कोस्टर राईड

IND vs PAK T20 World Cup 24 : सामना भारत - पाकिस्तानचा फायदा न्यूयॉर्कच्या हॉटेल्सचा! तब्बल 600 टक्क्यांनी वाढलं रूम्सचं भाडं

SCROLL FOR NEXT