pravin mane 
युथ्स-कॉर्नर

आत्मविश्वास, सेवा आणि गुणवत्तेवर व्यवसाय मोठा होतो- प्रविण माने

सकाळ वृत्तसेवा

पुणे : 'युवा उद्योजक दिना'चे औचित्य साधून यिनच्या वतीने आजची उद्योजक्ता संधी आणि आव्हाने या विषयावर ऑनलाईन यिन संवाद आयोजित केला होता. त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सोनाई डेअरीचे संचालक युवा उद्योजक प्रविण माने हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यिनचे व्यवस्थापक शामसुंदर माडेवार यांनी केले. कार्यक्रमात बोलताना माने म्हणाले, प्रत्येक मनुष्याला शिकण्यासाठी मोठ-मोठ्या संधी येत असतात, त्या स्वीकारल्या पाहिजेत. प्रत्येक तरुणांकडून काही ना काही घेण्यासारखे असते, आजच्या युवकांनी कोणताही व्यवसाय करायचा असे निवडले तर तो किती मोठा करायचा हे आपल्या हातात असते हे लक्षात घेतले पाहिजे. व्यवसाय सुरू करण्याची पहिली पायरी म्हणजे हे मला जमू शकते. हा आत्मविश्वास जास्त असला पाहिजे. गुणवत्ता, सेवा, मूल्य आणि विश्वास यावरच व्यवसाय उभा राहतो. प्रत्येक मनुष्यालाच आपला प्लॅटफॉर्म तयार करावा लागतो त्यासाठी मॅनेजमेंट आणि स्कील हे महत्वाचे आहे. आजचे युग मार्केटिंगचे आहे, कोणत्याही गोष्टीत आर्थिक नियोजन व व्यवसायाची जाहिरात ही महत्त्वाची आहे. कोणत्याही व्यवसातील कामाचे वाटप आणि त्यात विश्वासाची माणसे जपता आली पाहिजेत. एवढे मोठे उद्योजक झाली आहेत त्यांना माणसे ओळखण्याची दृष्टी असते, अशी आपण ही ठेवली पाहिजे.

कुटुंबाच्या बळजबरीने व्यवसाय करू नका. व्यवसाय करण्याची इच्छा मनातून असावी लागते. व्यवसाय वाढीसाठी सातत्याने बदल करणे गरजेचे आहे, समोरच्याला काय पाहिजे हे ओळखता आले पाहिजे, ग्राहकांचा विश्वास संपादित करता आला पाहिजे कारण जीवनात चढ-उतार हा जसा होत असतो तसा व्यवसायात जरी झाला तरी मन खचले नाही पाहिजे. त्या करीता आत्मविश्वासाने स्वामी विवेकानंद यांच्यासारखे मनावर राज्य करता आले पाहिजे. व्यवसायात शांत डोक्याने काम करावे त्यासाठी योग आणि प्राणायम व ध्यान आणि धारणा केल्याने शांत मनातून अधिक चांगला व्यवसाय करता येतो. आयुष्यात सर्व अपेक्षा इच्छा पूर्ण होणाऱ्या नसल्या तरी आहे त्यात समाधानी रहायला शिकावे, नोकरी पेक्षा व्यवसायातून जास्त अपेक्षा पूर्ण होत असतात. सुरवातीला येणाऱ्या अडचणी या यशस्वी पायरीचे लक्षण आहे असे ते म्हणाले.

त्यावेळी यिनचे विभागीय अधिकारी नितीन धांडे उपस्थित होते, जिल्हा यिन अधिकारी अनिकेत मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. यिनच्या पुणे शहर अधिकारी अनुजा पाटील उपस्थित होत्या. सुत्रसंचालन सिंहगड फार्मसी काॅलेज लोणावळाच्या यिन उपाध्यक्षा सायली तांबे यांनी केले, स्वागत यिनचे इंदापूर तालुका प्रमुख शिवराज रणसिंग यांनी केले तर आभार यिनचे जुन्नर तालुका प्रमुख हरीओम शिंदे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

Navi Mumbai: मुलगा घरी एकटाच, पालक घरी येताच समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नवी मुंबईत काय घडलं?

IPL सारखीच नवी टी२० स्पर्धा, 'या' क्रिकेट बोर्डानं केली घोषणा; सुरुवात कधी?

IPL 2026 Video: धोनी वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत खेळणार? थालाचं उत्तर ऐकून आख्ख्या स्टेडियममध्ये जल्लोष

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT