युथ्स-कॉर्नर

जमाना हॅचबॅकचा 

चंद्रकांत दडस

वाहन उद्योग सध्या कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनच्या समस्येमुळे गर्तेत अडकला आहे. वाहन कंपन्यांनीही नवीन वाहन बाजारात दाखल करण्यास ब्रेक लावला आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई, होंडा या कंपन्या लॉकडाउन संपण्याची वाट पाहत आहेत. लॉकडाउन संपल्यानंतर भारतीय वाहन बाजारात एकाचवेळी अनेक कारचा प्रवेश होणार आहे. यामध्ये काही हॅचबॅक कारचाही समावेश आहे. यातील प्रमुख पाच हॅचबॅक कारविषयी माहिती घेऊ. 

मारुती सुझुकी एस प्रेसो सीएनजी 
लॉकडाउन संपल्यानंतर भारतामध्ये पहिल्यांदा ही हॅचबॅक दाखल होऊ शकते. एस प्रेसो सीएनजीला २०२०च्या वाहन मेळाव्यात शोकेस करण्यात आले होते. यामध्ये १.० लिटर इंजिन असणार आहे. सोबत ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स असेल. सीएनजी मॉडेलचे मायलेज ३१.५९ किमी प्रती किलोग्रॅम असण्याचा दावा करण्यात आला आहे. सध्या एस प्रेसोच्या एलएक्सआय मॉडेलची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत ४ लाख आणि एलएक्सआयओ मॉडेलची किंमत ४.१५ लाख रुपये आहे. 

डॅटसन रेडी गो 
कंपनीने नवीन रेडी गोचा टिझर सादर केला आहे. या मॉडेलची सर्व माहिती समोर आली आहे. मात्र, आत्तापर्यंत इंजिनाबाबत खुलासा करण्यात आलेला नाही. डॅटसन नवीन ‘रेडी गो’मध्येही सध्याच्या मॉडेल प्रमाणेच ८०० सीसी आणि १.० लिटर इंजिन असण्याचा अंदाज आहे. १.० लिटर इंजिनासोबत ऑटोमॅटिकचा पर्यायही समोर येऊ शकतो. नवीन ‘रेडी गो’ची किंमत बेस मॉडेलच्या तुलनेत बीएस ६ इंजिनच्या तुलनेत ६ हजार रुपये आणि टॉप मॉडेलमध्ये १५ हजार रुपये अधिक असण्याची शक्यता आहे. 

ह्युंदाई ‘आय २०’ 
नवीन ह्युंदाई ‘आय २०’ सप्टेंबर महिन्यात येऊ शकते. यामध्ये माईल्ड हायब्रीड पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिनचे पर्याय मिळणार आहेत. नवीन ‘आय २०’ची किंमत ६ लाख रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. 

होंडा जझ्झ 
होंडा जझ्झचा टिझर कंपनीच्या संकेतस्थळावर दाखवण्यात आला आहे. याचाच अर्थ ही कारही लवकरच सादर केली जाण्याची शक्यता आहे. कंपनी बीएस ६ डिझेल आणि पेट्रोल इंजिनसह अन्य काही प्रमाणात बदलही जझ्झमध्ये करण्याची शक्यता आहे. नवीन होंडा जझ्झची किंमत जवळपास ६५ हजार रुपयांनी अधिक असण्याची शक्यता आहे. 

डॅटसन गो 
डॅटसन गोचे बीएस ६ इंजिन लवकरच येणार आहे. यामध्ये ऑटोमॅटिक डोअर लॉक आणि पेडस्ट्रेन प्रोटेक्शनसारख्या सुरक्षेच्या वैशिष्ट्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. बीएस ६ मॉडेल मध्ये ही १.२ लिटर पेट्रोल इंजिन असेल, असा अंदाज आहे. याचसोबत सीव्हटीचा पर्यायही देण्यात येणार आहे. कारची किंमत बीएस ६ इंजिनच्या तुलनेत थोडी अधिक असण्याची शक्यता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : एल्फिन्स्टन ब्रिज परिसर जलमय, सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT