युथ्स-कॉर्नर

स्वस्तातील सीएनजी कार... 

चंद्रकांत दडस

फिजिकल डिस्टन्सिंगला लक्षात घेत तुम्ही कमी बजेटमध्ये कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ६ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत सीएनजी कार घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. साधारणपणे सीएनजी मॉडेलची किंमत ही पेट्रोल मॉडेलच्या तुलनेत थोडी अधिक असते. मारुती सुझुकी आणि ह्युंदाईने ६ लाख रुपयांच्या बजेटमध्ये सीएनजी कार भारतीय बाजारात उपलब्ध करून दिल्या आहेत. याचसोबत या कार्समध्ये ‘बीएस ६’ मानकांचे इंजिनही जोडण्यात आले आहे. स्वस्तात सीएनजी कार खरेदीचे कोणते पर्याय आहेत ते जाणून घेऊ... 

मारुती सुझुकी अल्टो 
किंमत - बीएस ६ अल्टो सीएनजीची. एक्स शोरूम किंमत (दिल्ली) ४.३३ लाख रुपयांपासून पुढे. 
इंजिन - ७९६ सीसी, १२ वॉल्व्ह, ३ सिलिंडर 
टॉर्क - ३०.१ किलो वॉट ऊर्जा आणि ६० एनएम. 
ॲव्हरेज - ३१.५९ किलोमीटर प्रति किलोग्रॅम 
वैशिष्ट्ये - ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन 
- ड्युअल एअर बॅग, ड्रायव्हर आणि बाजूला बसणाऱ्या प्रवासासाठी सीट बेल्टसाठीचा रिमाइंडर, - एबीएस + ईबीडी, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, स्पीड अलर्ट सिस्टीम, इमोबिलायझर, रिअर डोर चाईल्ड लॉक. 


मारुती सुझुकी वॅगनआर 
किंमत - बीएस ६ मॉडेलची एक्स शोरूम किंमत (दिल्ली) ५.२५ लाख रुपये 
इंजिन - १.० लीटर, ३ सिलिंडर के सिरीज. 
टॉर्क - ५८ एचपी ऊर्जा आणि ७८ एनएम. 
ॲव्हरेज - ३२.५२ किलोमीटर प्रति किलोग्रॅम 
वैशिष्ट्ये - कारमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन 
ड्युअल फ्रंट एअर बॅग, ईबीडीसह एबीएस, चालक आणि बाजूला बसणाऱ्या प्रवाशासाठी सीट बेल्ट रिमाइंडर, स्पीड अलर्ट सिस्टीम, रिअर पार्किंग सेन्सर, सेंट्रल लॉकिंग, चाईल्ड प्रूफ रिअर डोअर लॉक. 


मारुती सुझुकी इको 
किंमत - बीएस ६ इको सीएनजीची एक्स शोरूम किंमत (दिल्ली) ४.९५ लाख रुपये 
इंजिन - १.२ लिटर 
टॉर्क - ६२ एचपीची ऊर्जा आणि ८५ एनएम 
ॲव्हरेज - २०.२ किलोमीटर प्रति किलोग्रॅम 
वैशिष्ट्ये - ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन 
ड्रायव्हरसाठी एअर बॅग, एबीएस, ईबीडी, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, दरवाजासाठी चाईल्ड लॉक, स्पीड अलर्ट सिस्टीम, चालक आणि बाजूला बसणाऱ्या प्रवाशासाठी सीट बेल्ट रिमाइंडर 


मारुती सुझुकी सेलेरिओ 
किंमत - एक्स शोरूम किंमत (दिल्ली) ५.३० लाख रुपये. 
इंजिन - ९९८ सीसी, ३ सिलिंडर, ४ वॉल्व्ह इंजिन 
टॉर्क - ४३.५ किलो वॉट ऊर्जा आणि ७८ एनएम 
ॲव्हरेज - ३१.७६ किलोमीटर प्रति किलोग्रॅम 
वैशिष्ट्ये - ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. 
ड्युअल एअर बॅग, चालक आणि बाजूला बसणाऱ्या प्रवाशासाठी सीट बेल्ट रिमाइंडर, पेडस्ट्रेन प्रोटेक्शन, चाईल्ड प्रूफ रिअर डोअर लॉक, इमोबिलायझर, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, एबीएस, स्पीड अलर्ट सिस्टीम. 


ह्युंदाई सॅन्ट्रो 
किंमत - एक्स शोरूम किंमत (दिल्ली) ५.८४ लाख रुपये. 
इंजिन - १.१ लीटर, ४ सिलिंडर, १२ वॉल्व्ह इंजीन 
टॉर्क - ६० एचपीची ऊर्जा आणि ८५ एनएम 
ॲव्हरेज - ३०.४८ किलोमीटर प्रति किलोग्रॅम 
वैशिष्ट्ये - ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन 
ड्युअल एअर बॅग, ईबीडी, एबीएस, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, रिअर पार्किंग कॅमेरा, स्पीड सेन्सिंग ऑटो डोअर लॉक, इमोबिलायझर, सेंट्रल लॉकिंग, चालक आणि इतर प्रवाशांसाठी सीट बेल्ट रिमाइंडर, चाईल्ड सेफ्टी डोअर लॉक. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Supply: स्वयंपाकाच्या गॅसवर केंद्राचा मोठा निर्णय! २१ कंपन्यांसाठी LPG उत्पादनाचा कोटा निश्चित; केंद्राची नवी रणनीती

Marathi News Live Updates : दिल्लीत २५ 'अटल कॅन्टीन्स'चे उद्घाटन; ५ रुपयांत मिळणार जेवण

Amit Shah: सोनिया गांधींच्या 'त्या' कृतीवर अमित शाह संतापले! चित्तोडगडमधून साधला निशाणा; म्हणाले, देशाची माफी मागा...

Dharur Ghat Accidents: धारूर घाटात अपघातांची मालिका कायम; जिल्हाधिकाऱ्यांच्या दुरुस्ती आदेशाला विलंब, नागरिकांमध्ये संताप

Malshej Ghat Project Protest: माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्प रद्द करण्यासाठी मढ येथे आदिवासींचा ‘गाढव मोर्चा’ व रास्ता रोको; अदानी हटाओ, सह्याद्री बचावोच्या घोषणा

SCROLL FOR NEXT