वृक्षारोपण मोहीम sakal
युथ्स-कॉर्नर

सी.ओ.ई.पी. एन.एस.एस. द्वारे वृक्षारोपण मोहीम

जागतिक तापमानवाढ यासारखे अनेक संभाव्य धोके टाळण्यासाठी वृक्षारोपण हाच एकमेव उपाय आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : “वृक्षवल्ली आम्हां सोयरे” म्हणजे वृक्ष आपले मित्र. वृक्षसंपदा नाही तर जीवन सुद्धा नाही. मानवाची सेवा करण्यात निसर्गाचा फार मोठा सहभाग आहे. वृक्षांपासून आपणास अन्नधान्य, भाजीपाला, फळे, औषधी, इंधन, इमारती लाकूड आदी प्राप्त होते. भूमी आणि जलसंरक्षणाचे काम झाडे करतात. पाण्याचा दुष्काळ, पूर नियंत्रण, जमिनींची धूप या गोष्टी रोखण्यासाठी वृक्षच मदत करतात. पर्यावणाचा समतोल राखण्यासाठी व जागतिक तापमानवाढ यासारखे अनेक संभाव्य धोके टाळण्यासाठी वृक्षारोपण हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे ‘एक झाड कोरोना वॉरीयर के नाम’ हे धोरण समोर ठेवून राष्ट्रीय सेवा योजना, अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे यांच्याद्वारे वृक्षारोपण मोहिमेस सुरुवात करण्यात आली.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये १९ ऑगस्ट २०२१ रोजी वृक्षारोपण करत वृक्षारोपण मोहिमेस सुरुवात केली. या प्रसंगी महाविद्यालयातील स्टाफ क्वार्टर भागात तसेच सिव्हिल इंजीनीरिंग डिपार्टमेंट परिसरात वृक्षारोपण केले गेले. वृक्षारोपणामध्ये प्रामुख्याने आंबा, चिंच, औदुंबर, अशोका, नीम, फणस या वृक्षांचा समावेश होता. या कार्यक्रमासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.रश्मी कुलकर्णी ,विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.पी.आर.धामनगावकर, डॉ. एम. एस. सुतावणे इत्यादी उपस्थित होते. तसेच विद्यार्थी प्रतिनिधी विशाल रॉय, सिध्दी राऊत, आदिनाथ ढमढेरे, वैष्णवी वाधोकार यांचे महत्वाचे योगदान लाभले.

ज्या स्वयंसेवकांना महाविद्यालय परिसरात येऊन वृक्षारोपण करणे शक्य नाही आहे , त्यांना त्याच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Let us all participate in this activity and protect our mother earth!!

"Protect Trees, Trees will protect us"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gas Connection : महिन्यात ४० हजार पाईप गॅस कनेक्शन; कोल्हापूर शहरात राजारामपुरीसह काही उपनगरांत जोडणी पूर्ण

Latur Accident: चाकूरमध्ये भीषण अपघात; सिमेंट मिक्सरखाली येऊन नगरपंचायती कर्मचारी ठार

South Africa vs New Zealand: दक्षिण आफ्रिकन संघाची विजयी सलामी; न्यूझीलंडवर सात विकेट राखून मात; मोकोएना ठरला सामनावीर

Kolhapur Scam : गॅस कनेक्शन बंद होण्याच्या; नावाखाली फसवणुकीचा धोका, पुणे - मुंबईतील सायबर गुन्हेगार झाले सक्रिय

Latest Marathi Update : दुबईतील ड्रोन हल्ल्यांनतर एमिरेट्सचे विमान तिरुवनंतपुरमला माघारी परतले

SCROLL FOR NEXT