युथ्स-कॉर्नर

गुगल अर्थवर दिसणार सोलापुरातील कोरोना बाधित क्षेत्र (VIDEO)

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे प्रतिबंधित करण्यात आलेल्या परिसर आता गुगल अर्थवरून पाहता येणार आहे. त्याची प्राथमिक तयारी पूर्ण झाली आहे. ही माहिती सध्या कार्यालयीन उपयोगासाठीच असणार आहे. आवश्‍यकता भासल्यास ती सार्वजनिक केली जाणार आहे. या यंत्रणेमुळे राज्यातील निर्णयक्षम यंत्रणेला जागेवर बसून परिसरातील स्थिती पाहता येणार आहे. 

गुगल अर्थवर दिसणाऱ्या माहितीत जीआयएस मॅपिंगमध्ये प्रतिबंधित करण्यात आलेल्या परिसरात किती लोकसंख्या आहे, या परिसरात कोणती दुकाने, व्यावसायिक संस्था आहेत, जीवनावश्‍यक साहित्याची किती दुकाने आहेत याचीही माहिती दिली जाणार आहे. रुग्ण आढळलेल्या व्यक्तीच्या घरापासून किती क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले आहे याचीही माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहे. या माहितीच्या आधारे हा परिसर किती दिवस प्रतिबंधित ठेवायचा याबाबतचा निर्णय घेण्यासही मदत होणार आहे. सोलापूर शहरात आतापर्यंत जवळपास 285 कोरोना बाधित क्षेत्र निश्‍चित केले आहेत. त्या रोज वाढच होत आहे. 

सोलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे महापालिकेत स्वतंत्र कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. या केंद्रात 24 तास कर्मचारी कार्यरत असणार आहेत. सोलापूर शहरातील कोविड रुग्णालये, नॉन कोविड रुग्णालये यांची माहिती तसेच प्रत्येक रुग्णालयात किती बेड आहेत, किती रुग्ण दाखल आहेत, किती बेड रिक्त आहेत याची माहिती देण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक रुग्णालयाने त्यांच्याकडील खाटांची स्थिती रोजच्या रोज अपडेट करण्यास सांगितले आहे. जे रुग्णालय माहिती देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईही केली जाणार आहे. 


संपर्कासाठी हा आहे टोल फ्री क्रमांक 
सोलापूर शहरातील रुग्णालयातील खाटांची व रुग्णांची माहिती मिळवण्यासाठी 0217-2740341 हा टोल फ्री क्रमांक आहे. या क्रमांकावर नागरिकांना चोवीस तास माहिती उपलब्ध होणार आहे. त्यासाठी कोविड सेंटरमध्ये तीन पाळ्यांमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गुगल अर्थवर दिसणार सोलापुरातील कोरोना बाधित क्षेत्र (VIDEO)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

Asian Games 2026: भारतीय पुरुष कबड्डी संघ उपांत्य फेरीत! बांगलादेशला लोळवले, आता उपांत्य फेरीत Pakistanला भिडणार?

Mumbai-Goa Highway : ठेकेदार कंपनीचा १८ कोटींचा दंड थकीत विनापरवानगी नदीत खोदाई; एकाचा बळी गेल्यानंतर कारवाईला वेग

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख ज्ञानेश कुमार , त्यांना तातडीने तुरुंगात टाका: उद्धव ठाकरे घणाघात

Indrayani River Pollution : ‘इंद्रायणी’वर पुन्हा एकदा विषारी फेसाची चादर ; प्रशासकीय निष्क्रियतेमुळे लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT