टेक्नॉथॉन अंतर्गत विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आलेल्या रोबोटिक्स प्रकल्पाचे मान्यवरांसमोर प्रात्यक्षिक.

 
युथ्स-कॉर्नर

पीव्हीपीआयटीमध्ये ‘टेक्नॉथॉन 2K26’ राष्ट्रीय तांत्रिक स्पर्धेला भव्य प्रारंभ.

क्विक हीलचे संस्थापक कैलास काटकर यांचे मार्गदर्शन - डीआरडीओ व एआरआय तज्ज्ञांची उपस्थिती - राज्यभरातील सुमारे 3000 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.

टीम YIN युवा

बावधन, पुणे येथील टीएसएसएम संचलित पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे राष्ट्रीय पातळीवरील भव्य तांत्रिक स्पर्धेस अत्यंत उत्साहपूर् वातावरणात आणि दिमाखात पार पडला. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून सुमारे ३००० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून स्पर्धेला मोठा प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे क्विक हील टेक्नॉलॉजी लिमिटेडचे संस्थापक श्री कैलास काटकर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी मान्यवर अतिथी म्हणून डॉ. भूपेश पराते (शास्त्रज्ञ, शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास प्रतिष्ठान, डीआरडीओ, पुणे) तसेच श्रीमती उज्वला कार्ले (वरिष्ठ उपसंचालक, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे) उपस्थित होते. स्पर्धेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्य, संशोधनवृत्ती, समस्या सोडविण्याची क्षमता, सर्जनशीलता आणि संघभावना विकसित करणे हा आहे. या अनुषंगाने नवकल्पना सादरीकरण , तांत्रिक प्रश्नमंजुषा , प्रकल्प व मॉडेल सादरीकरण, डिझाईन स्पर्धा, कोडींग व प्रोग्रॅमिंग चॅलेंजेस तसेच प्रत्यक्ष समस्यांवर आधारित तांत्रिक आव्हाने अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. ना. प्रा डॉ. तानाजीराव सावंत, सचिव मा. गिरीराज सावंत तसेच संचालक डॉ. वसंत बुगडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

डीआरडीओ चे डॉ. भूपेश पराटे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे कौतुक करत अभियांत्रिकी ही केवळ पदवी नसून समाजाभिमुख प्रकल्पाच्या माध्यमातून देशाची चौफेर प्रगतीची संधी असल्याचे सांगितले.“इंजिनिअरिंग म्हणजे स्मार्ट सोल्यूशन्सच्या माध्यमातून समाजातील समस्यांकडे अधिक चांगल्या व नाविन्यपूर्ण पद्धतीने पाहण्याची विचारसरणी” असे त्यांनी अधोरेखित केले. आपल्या मनोगतात डॉ. भूपेश पराटे यांनी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी डीआरडीओ मधील करिअर संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. संरक्षण संशोधन क्षेत्रात कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक प्रावीण्य, संशोधनवृत्ती, नवकल्पनाशीलता व राष्ट्रसेवेची भावना यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. एआरआय च्या उपसंचालक मा.श्रीमती उज्वला कार्ले यांनी आपल्या मार्गदर्शनात लोकांच्या गतिशीलतेशी संबंधित दैनंदिन आव्हाने, रस्ते सुरक्षा, शून्य अपघात संकल्पना आणि विविध अभियांत्रिकी शाखांमधील सीमा मिटवत ‘सीमारहित अभियांत्रिकी’ या संकल्पनेवर विशेष भर दिला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुरक्षित, सुलभ व शाश्वत वाहतूक व्यवस्था उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रमुख पाहुणे श्री कैलास काटकर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना तार्किक विचारसरणी आणि स्व-व्यवस्थापन यांचे महत्त्व पटवून दिले. करिअरमध्ये उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी सातत्यपूर्ण परिश्रम, योग्य नियोजन आणि आत्मविश्वास आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.ए.आय. शिक्षण ही काळाची गरज असून प्रत्येक विद्यार्थ्याने त्यामध्ये पारंगत व्हावे, असे त्यांनी मार्गदर्शन केले. विविध स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून ओक्टागोन ग्रुप चे सीईओ श्री रणजित जाधव, माजी विद्यार्थी श्री अम्रत पंडित, डॉ तृप्ती देशपांडे यांनी महत्वाचे कार्य पार पाडले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. पवार यांनी प्रास्ताविक व स्वागतपर भाषण करत स्पर्धेचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी कॅम्पस डायरेक्टर डॉ. एन. एस. बागल, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. डी. घोडे, संयोजक डॉ डी बी जासुतकर, डॉ. आर. रश्मी (डीन अकॅडेमिक्स), डॉ. एस. एम. कुलकर्णी (विभागप्रमुख, ई अँड टीसी), प्रा. राहुल उंडेगावकर (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर), प्रा. स्मिता यादव (विभागप्रमुख, प्रथम वर्ष) , प्रा. निलेश पवार (विभागप्रमुख, मेकॅनिकल), डॉ. सारिका जाधव कॉम्प्युटर विभागप्रमुख, प्रा. सोनिया वाघमारे विभागप्रमुख (डेटा सायन्स विभाग) ,प्रा. ईश्वर पाटील (विभागप्रमुख, बीसीए), तसेच प्रा. मधुकर शेंडे (विभागप्रमुख, डी-फार्मसी) यांची उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून स्पर्धेची औपचारिक सुरुवात केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. विद्यार्थी संसद प्रमुख सृष्टी पाटील,संसद महासचिव पुष्कर शेडगे, सांस्कृतिक सचिव संकेत गर्जे, स्पोर्ट्स सचिव प्रनीत पाटील, महिला प्रतिनिधी समृद्धी कळसकर, विद्यापीठ प्रतिनिधी समृद्धी मारणे, आणि सर्व विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कीर्ती गुरानी व प्रा. सुरभी हर्सुलकर यांनी प्रभावीपणे केले. समारोप प्रसंगी डॉ. डी. बी. जासुतकर यांनी आभार प्रदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugauli Treaty: भारताविरोधात मदतीची मागणी, पण ब्रिटनने हात झटकले; नेपाळचे पंतप्रधान बालेन शाहांची कोंडी

१४१३ कोटींची संपत्ती, पण ना मर्सिडीज ना ऑडी; डीके शिवकुमार यांच्या नावावर फक्त एकच जुनी कार!

'कृष्णाईच्या लेकी'मध्ये 'हा' अभिनेता साकारणार नायक; 'सहकुटुंब सहपरिवार'मधील अभिनेत्रीचीही एंट्री; पाहा संपूर्ण कास्ट

Latest Marathi News Update : नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा हवालदारची जेलमध्ये रवानगी

Thane News: खोट्या कागदपत्रांच्या आधारे उभारली सात मजली इमारत, बिल्डरला अटक; रहिवाशांचे काय होणार?

SCROLL FOR NEXT