वाडिया कॉलेज कॅम्पस येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी सहभागी महिला व मान्यवरांचा सामूहिक फोटो.  
युथ्स-कॉर्नर

वाडिया कॉलेज कॅम्पसमध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा.

टीम YIN युवा

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे नौरोसजी वाडिया कॉलेज, नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स, कुसरो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि वाडिया कॉलेज ऑफ इंजीनियरिंग या सर्व महाविद्यालयांनी संयुक्त विद्यमाने टाटा असेम्ब्ली हॉलमध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन आणि दीपप्रज्वलन करून झाली. मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त प्रा. सचिन सानप, प्राचार्य डॉ. वसंत चाबुकस्वार, प्राचार्य वृषाली रणधीर, प्राचार्य डॉ. मनीषा ढाले, प्राचार्य डॉ. अनुराधा डी., उपप्राचार्य प्रो.डॉ. समीना बॉक्सवाला- काळे, व प्राचार्य सौ. शोभा धांडोरे,प्रबंधक मा. राजेंद्र तागडे, सीनियर पोलीस इन्स्पेक्टर मा. थोपटे, एपीआय शिल्पा निमकर ( कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन) आदी मान्यवर उपस्थित होते.

मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त प्रा.सचिन सानप यांनी यावेळी सर्व महिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून ‘स्त्रियांना अनेक पातळ्यांवर लढावे लागते पण स्त्रियांमध्ये जन्मताच संयम आणि ताकद असते’ अशी भावना व्यक्त केली. एपीआय शिल्पा निमकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ‘प्रत्येक स्त्रीने आपले मानसिक स्वास्थ्य जपले पाहिजे कारण त्याचा परिणाम कुटुंबावर आणि पर्यायाने समाजावर होतो’ अशा भावना व्यक्त केल्या.

या दिनानिमित्त महिला प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर सर्व महिलांसाठी विविध खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व महिलांनी या कार्यक्रमात उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. जिंकणाऱ्या महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. इंग्रजी विभाग प्रमुख प्रो. डॉ. जयंत साळवे यांनी त्यांच्या गाण्यातून सर्व महिलांना मानवंदना दिली. हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण राहिले. सुमारे २५० महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सांगता आर्ट ऑफ लिविंगच्या मा.ऋतिका गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली ध्यानसाधना करून करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त प्रा.अशोक चांडक विश्वस्त व सचिन सानप यांचे मार्गदर्शन लाभले.संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन डॉ.पद्मिनी माने, डॉ. कांचन पाठक, डॉ. कोमल सावंत, प्रो.के.पी.एन.बागवान, प्रो.तुषार गाडेकर, प्रो.सचिन कांबळे, प्रा.अनिंदीता वालीया, डॉ. करुणा जाधव, प्रो. क्षिप्रा टकले, प्रो.शुभांगी वर्मा, डॉ.योगिता अजगर, आणि सौ.सुवर्ण लाटे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

Oldest Cities in the world : भारत नाही, तर जगातल्या 'या' 5 शहरांना मानले जाते सगळ्यात जास्त प्राचीन..11000 वर्षांपूर्वीचा वारसा

SCROLL FOR NEXT