युथ्स-कॉर्नर

कादंबरी चौधरी हिच्या "चित्त स्पर्श" प्रदर्शनाची सुरुवात...

जळगांव जिल्ह्यातील पिलखेडा गावातील शेतकरी कन्या अभिनव प्रयोग...

टीम YIN युवा

मुंबई (प्रतिनिधी) कादंबरीच्या चित्रांचे प्रदर्शन अर्थात चित्त स्पर्श.... चित्त म्हणजे मन अणि खरोखर चित्ताला स्पर्श करतील अशी थीम घेऊन कादंबरी चौधरी हिने तिचे प्रदर्शन आपल्या मुंबई मध्ये आयोजित केले आहे...

Covid काळातील lockdown व त्या नंतर जे जे कॉलेज ऑफ आर्ट्स मधून चित्रकलेचे शिक्षण संपादन केल्या नंतर चा तिचा हा पहिलाच वैयक्तिकरीत्या केलेला चित्र प्रदर्शनाचा प्रयत्न आहे..

कादंबरी ला लहानपणापासून चित्रकलेची प्रचंड आवड आहे, आतापर्यंत तिने विविध राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला असून तिला अनेक पारितोषिके ही मिळाली आहेत...कादंबरी ही एका शेतकर्‍याची मुलगी आहे... एका छोट्याश्या गावातून मुंबईत येऊन काहीतरी करण्याचा तिचा प्रयत्न आहे... ती एक सॉफ्टवेअर डेवलपर असून जे जे स्कूल ऑफ आर्ट ची विद्यार्थिनी सुद्धा आहे.

विशेष म्हणजे तिने रेखाटलेल्या चित्रांना परदेशातही मागणी असून आतापर्यंत होंग-कोंग, दुबई व पेरिस येथे तिने चित्रे पाठवली आहेत..

तिच्या प्रत्येक चित्रात एक विशिष्ट भाव अणि गूढता दिसून येते... प्रत्येक कला रसिकाच्या चित्ताला स्पर्श करतील अशा कलाकृति अणि नाविन्यपूर्ण चित्रे, कादंबरी "चित्त स्पर्श" च्या माध्यमातून होटेल ओबेरॉय येथे घेऊन येत आहे.

कु. कादंबरी सुधीर चौधरी हिने रेखाटलेल्या चित्रांच्या प्रदर्शनाला दिनांक 24 डिसेंबर पासून हॉटेल ओबेरॉय, नरिमन पॉइंट, मुंबई येथे सुरुवात होणार आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन आईपीएस कृष्ण प्रकाश नागर, उदय निरगुडकर , फ़िल्म डाइरेक्टर अक्षय ईंदिकर,

असिस्टंट एडिटर मनोज भोयर अणि यूथ मेंटोर मनोज गोविंदकर यांच्या उपस्थितीत होणार असून प्रसिद्ध जैन इरिगेशन चे संचालक माननीय अशोक भाऊ जैन यांनी या प्रदर्शनास प्रायोजकत्व दिले आहे...कादंबरी ला मराठी ऐक्टर्स अणि बर्‍याच लोकांकडून प्रदर्शनासाठी खूप शुभेच्छा ही मिळाल्या आहेत...

कला रसिकांसाठी सदर "चित्त स्पर्श" प्रदर्शन दिनांक 24 डिसेंबर सकाळी 11 वाजेपासून तर दिनांक 30 डिसेंबर सायंकाळी 9 वाजेपर्यंत खुले असणार आहे...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या २५८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT