युथ्स-कॉर्नर

भेलके महाविद्यालयात ‘सेंट्रल बजेट २०२५ - २६’ प्रदर्शनातून अर्थसाक्षरता अभियान.

टीम YIN युवा

नसरापूर, ता. २९ : शंकरराव भेलके महाविद्यालयात केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ - २६ वर आधारित प्रदर्शनाचे आयोजन ‘यिन’ व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले. या उपक्रमात तृतीय वर्ष कला व वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्पातील विविध मंत्रालये, योजना आणि आर्थिक तरतुदी याविषयी सखोल माहिती पोस्टरच्या माध्यमातून सादर केली.

या प्रदर्शनात अर्थ, शिक्षण, आरोग्य, कृषी, संरक्षण आदी मंत्रालयांच्या तरतुदींवर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांनी पोस्टर आणि चार्टच्या माध्यमातून महत्त्वाच्या योजनांचे सादरीकरण करत इतर विद्यार्थ्यांना अर्थसंकल्पाच्या महत्त्वपूर्ण बाबी समजावून सांगितल्या.

हे अर्थसंकल्प प्रदर्शन पाहण्यासाठी भोर येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयातील प्रा. कुंभार सर तसेच अमृतेश्वर कला वाणिज्य महाविद्यालय विंझर येथील प्रा. डोंगरे सर यांनी अर्थशास्त्र तसेच वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांना घेऊन आले होते.

या प्रदर्शनातून उत्कृष्ट पोस्टर, माहिती आणि सादरीकरण या निकषांवर तीन‌ क्रमांक काढण्यात आले. प्रथम क्रमांक पायल भांडवलकर, अंजली शिळीमकर, ऐश्वर्या खुटवड, अमिषा जाधव, द्वितीय क्रमांक प्रीती वाल्हेकर, मानसी पडवळ, तन्वी जगताप, साक्षी वाल्हेकर, तृतीय क्रमांक आदित्य वणवे, राणी खुटवड इ. विद्यार्थ्यांना देण्यात आला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अर्थसंकल्प व त्यातील धोरणे समजून घेण्याची संधी मिळाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि भविष्यात अशा उपक्रमांच्या आयोजनावर भर देण्याचे सांगितले. या प्रदर्शनाला संबोधित करताना महाविद्यालयातील प्रा. डॉ. संगीता घोडके यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अर्थसंकल्पाची मूलभूत माहिती विद्यार्थ्यांना विचारली, विद्यार्थ्यांनी सुद्धा तितकाच सकारात्मक प्रतिसाद दिला. अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. सचिन घाडगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जाधवर डी एस. यांनी केले. या प्रदर्शनाला प्रा. कोळपे एम डी, प्रा. कोंडे माऊली, प्रा. जगदीश शेवते वाणिज्य विभागप्रमुख प्रा. जीवन गायकवाड, प्रा ननावरे प्रल्हाद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

प्रा. जगदीश शेवते आणि प्रा.डी.ए. जाधवर यांच्या हस्ते यिन क्लब च्या विद्यार्थ्याना निवडीचे पत्र देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT