युथ्स-कॉर्नर

लीप वर्ष दिवस

माधव गोखले

आजच्या दिवसाला एक विशेष खूण करून ठेवा, कारण आता पुन्हा हा दिवस उजाडणार आहे २०२४मध्ये. आपण वापरत असलेल्या ग्रेगरियन दिनदर्शिकेनुसार आजचा दिवस हा लीप ईयर डे आहे, म्हणजे वर्षातला अतिरिक्त दिवस आहे. मराठी विश्वकोशात ‘वर्ष’ अशी एक नोंद आहे. तिथं आपल्याला या जादा दिवसाचं कारण सापडतं. तसंही शाळेत केव्हातरी आपण हे शिकलेलो असतो, चांगलं पाठबिठ करून, टीप लिहून एखाद-दोन मार्कही मिळवलेले असतात, पण आता पटकन विचारलं तर नाही सांगता येत. असो.

पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याचा काळ आणि ३६५ दिवसांचं वर्ष यांच्यातल्या फरकाचं गणित बिघडू नये म्हणून धरलेला हा जास्तीचा दिवस पुस्तकाचा विषय असू शकेल का, असा विचार मनात डोकावला तो ‘बुकीश’साठी पुस्तकं पाहत असताना कोणीतरी २९ फेब्रुवारीचा उल्लेख केला म्हणून. भरपूर वाचणारे एक दोन मित्र आहेत, त्यांना विचारलं. पटकन काही आठवत नाही, पाहतो अशी उत्तरं आली. आठवणींच्या फायली चाळल्या. फेब्रुवारीच्या २९ तारखेला एखाद्या पुस्तकाच्या नायकाने काही विशेष करामत केल्याचं आठवेना. उत्सुकता स्वस्थ बसू देईना. मग लीप ईयर, लीप ईयरचा जप करत त्या निमित्तानं माहितीच्या महाजालात एक फेरफटका झाला; आणि एकदा नजरेखालून घालायला हरकत नाही अशा पुस्तकांच्या यादीत थोडीशी भर पडली.

लीप ईयर डेला वाढदिवस असणाऱ्यांना तो साजरा करण्याची संधी चार वर्षांनी एकदा मिळते याची आपल्याला कल्पना असते, पण आपल्या मित्रांचे वाढदिवस दरवर्षी होतात आणि आपला मात्र कधीतरी एकदाच; हे एखाद्या लहानग्याला कसं समजावून द्याल? आणि वाढदिवस येईल तेव्हा तो नेमका किती वर्षांचा असेल? स्वतः एका लीप ईयर मुलाची आई असणाऱ्या मिशेल व्हिटेकर विनफ्रे यांचं ‘इटस् माय बर्थ डे... फायनली!’ हे पुस्तक या प्रश्नांची उत्तरं देतं.

आयरीश परंपरेनुसार २९ फेब्रुवारी ‘बॅचलर्स डे’ असतो. त्या दिवशी तरुण मुलींना त्यांचा जोडीदार निवडून त्या तरुणाला विवाहाचा प्रस्ताव देण्याचं स्वातंत्र्य असतं. त्या तरुणाचंही त्या मुलीवर प्रेम असेल, तर या दिवशी आलेला प्रस्ताव तो नाकारू शकत नाही. या परंपरेभोवती गुंफलेली ‘लीप ईयर ब्राईड’ नावाची एक कादंबरी सध्या मी माझ्या कधीतरी वाचण्याच्या यादीत नोंदवून ठेवली आहे. या कादंबरीची नायिका चेरी तिच्या वर्तमानपत्राचा बातमीदार असलेल्या मित्रासमोर, डॅनसमोर, विवाहाचा प्रस्ताव ठेवते आणि ते लगेच पळून जाऊन लग्न करतात, असा काहीसा विषय आहे. बघूया कधी हातात येईल ते.

लीप ईयर डे आणि पुस्तकं अशा संबंधानं शोध घेताना आणखी एक पुस्तकवेडी नोंद सापडली. फेब्रुवारी २९ म्हणजे चोवीस तासांचा एक अख्खा अधिकचा दिवस. चार वर्षांनी का असेना, पण वाचणाऱ्याला वाचायला हा एक अख्खा जास्तीचा दिवस मिळतो, असं तुम्हालाही नाही वाटतं? 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident: कोल्हापुरातील रस्त्यावर घडला 'कॅरम बोर्ड'सारखा थरार! भरधाव कारनं दुचाकींना उडवलं, तिघांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Market Cap: सेन्सेक्स ऐतिहासिक उच्चांकावर; बीएसई कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 14 लाख कोटींची भर

Wayanad Lok Sabha Election Results: काँग्रेससाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वायनाडमध्ये राहुल गांधींना धक्का?

"BJP ने आपल्याच समर्थकांना हिंसक बनवले," माजी मुख्यमंत्र्याच्या धक्कादायक आरोपांमुळे देशभरात खळबळ

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल नागपूरच्या निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT