MindSpark, COEP Technological University

युथ्स-कॉर्नर

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात माइंडस्पार्क या टेक्निकल फेस्टचे आयोजन!

टीम YIN युवा

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा वार्षिक टेक्निकल फेस्टिवल 'माइंडस्पार्क-२६' या वर्षी ३ आणि ४ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित केला आहे. यंदाच्या वर्षी माइंडस्पार्क-२६ विसावी आवृत्ती साजरी करत असून, हा कार्यक्रम पुण्यातील प्रतिष्ठित सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणेच्या संकुलात आयोजित करण्यात येत आहे.

दरवर्षीप्रमाणे ऑक्टोबरमध्ये आयोजित होणाऱ्या या कार्यक्रमाची थीम यंदाच्या वर्षी 'इन्फिनिट कंटिन्युअम' आहे. या थीमची प्रेरणा व्हॉयेजर-१ ने एक प्रकाश दिवस अंतराळात प्रवास पूर्ण केला आहे, यावर आधारित आहे. माइंडस्पार्क हा महाराष्ट्रातील दुसरा सर्वात मोठा टेक्निकल फेस्टिवल असून, राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च १० तंत्रमहोत्सवांपैकी एक आहे. माइंडस्पार्कच्या सर्व आवृत्तींना देशभरातून भरघोस प्रतिसाद लाभलेला आहे.

गतवर्षी माइंडस्पार्कला ४०,००० पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती लाभली. या महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी अनेक मनोरंजक टेक्निकल व नॉन-टेक्निकल स्पर्धा आयोजित केल्या जातात. सर्व विद्यापीठांतील विद्यार्थी या ३५ स्पर्धांमध्ये नाव नोंदवू शकतात. महोत्सवात २४ तासांची हॅकॅथॉन, ऑटो एक्स्पो, बाईक एक्स्पो, टेक एक्स्पो आणि रोबोटिका यांसारख्या आकर्षक आणि आव्हानात्मक उपक्रमांचा समावेश असेल, अशी माहिती माइंडस्पार्क-२६ चे टेक्निकल सेक्रेटरी सिद्धार्थ पुंडळे आणि गौरी डांगरीकर यांनी सांगितले आहे.

गतवर्षी माइंडस्पार्कला ४०,००० पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती लाभली. या महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी अनेक मनोरंजक टेक्निकल व नॉन-टेक्निकल स्पर्धा आयोजित केल्या जातात. सर्व विद्यापीठांतील विद्यार्थी या ३५ स्पर्धांमध्ये नाव नोंदवू शकतात. महोत्सवात २४ तासांची हॅकॅथॉन, ऑटो एक्स्पो, बाईक एक्स्पो, टेक एक्स्पो आणि रोबोटिका यांसारख्या आकर्षक आणि आव्हानात्मक उपक्रमांचा समावेश असेल, अशी माहिती माइंडस्पार्क-२६ चे टेक्निकल सेक्रेटरी सिद्धार्थ पुंडळे आणि गौरी डांगरीकर यांनी सांगितले आहे.

महोत्सवाच्या सल्लागार, विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉ. राधिका डी. जोशी यांनी सांगितले की, माइंडस्पार्कचा उद्देश तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये शिकण्यासाठी आणि स्वतःची व देशाची तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी मदत करणे हा आहे.

विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक प्रा. डॉ. एम. पी. खोंड यांनी यंदाच्या आवृत्तीसाठी शुभेच्छा दिल्या असून, असे सांगितले की, “माइंडस्पार्क विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्ये विकसित करण्यासाठी एक अद्वितीय मंच उपलब्ध करून देतो.”

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. एन. सोनावणे, कुलगुरू प्रा. सुनील भिरुड व इतर सर्व प्राध्यापकांनी माइंडस्पार्क-२६ च्या टीमला सतत प्रोत्साहन व मोलाचे मार्गदर्शन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission: ज्ञानेश कुमार यांच्या विरोधादरम्यान ECचा मोठा निर्णय; SIRमध्ये वगळलेल्या मतदारांना पुन्हा संधी, कशी आहे प्रक्रिया?

PF Claim Reject: PFचा पैसा काढताना करू नका या 10 चुका! नाहीतर रिजेक्ट होईल तुमचा क्लेम

Latest Marathi News Live Update : "आता मला वेदना नाही, तर अभिमान वाटतो" ,कॅप्टन स्मित यांची पंतप्रधान मोदींशी बातचीत

रणवीर सिंहनंतर आणखी एका अभिनेत्याने केलं न्यूड फोटोशूट; अंगावर एकही कपडा नाही; फोटोची जोरदार चर्चा

Heart Health: झिरो शुगर ड्रिंक्स हृदयासाठी सुरक्षित आहेत का? जाणून घ्या कार्डिओलॉजिस्टचा महत्वाचा सल्ला!

SCROLL FOR NEXT