Owl
Owl 
युथ्स-कॉर्नर

अपशकुनी घुबडाचं जीवघेणं कनेक्शन

नितीन थोरात

भारतीय संस्कृतीत गव्हानी घुबड अपशकुनी मानलं जातं, तर इंग्लंडमध्ये हेच घुबड विद्वत्तेचं प्रतीक मानले जातं. गंमत म्हणजे, हे अपशकुनी तोंडाचं घुबड रोज रात्री आमच्या घराच्या गॅलरीत येऊन बसत होतं. बरं येताना एकटं येत नव्हतं. जोडीदारालाही सोबत आणत होतं. एका रात्री अडीच तीनच्या दरम्यान कुत्र्याला ही जोडी दिसली आणि ते मोठमोठ्यानं भुंकायला लागलं. 

कानाजवळ भुंकणाऱ्या कुत्र्याच्या आवाजानं आम्ही नवरा-बायको खडबडून जागे झालो. पांढऱ्याशुभ्र घुबडांना पाहून क्षणभर भिती वाटली. कुत्र एवढं भुंकत असूनही ते जराही हललं नव्हतं. शिवाय शहरात कशाला येतील घुबडं हाही प्रश्‍नच. आम्ही झोपेतून जागे झाल्याचं कुत्र्याला समजलं तसं ते घुबडांच्या दिशेनं धावलं. दोन्ही घुबडं उडून गेले. आम्ही पुन्हा झोपी गेलो. 

दुसऱ्या रात्री पुन्हा सेम तसेच. ही घुबडं आपल्याच गॅलरीत का येताहेत, याच्यावर आमच्याच चर्चा झाली. बहुतेक आपण कुत्र्याला घरात पाळलयं म्हणून त्याला आपण चांगली माणसं आहोत असं वाटलं असावं, अशी मनाची समजूत घातली. त्यात कुत्र्याचं पिल्लू एका कॅनॉलमधून आणलं होतं. मग या कुत्र्याचं आणि त्या घुबडांचं काही कनेक्‍शन असेल का, असा फिल्मी विचारही मनात येऊन गेला! आई-बाबांना हे सांगितलं, तर आईनं शिरा बनवून गॅलरीत ठेव, असा सल्ला दिला. त्यावर बाबांनी कपाळावर हात मारून घेतला आणि पावशेर चिकन आणलं. श्रावणात आमच्या घरात चिकन शिजलं आणि त्याचे तुकडे आम्ही गॅलरीत ठेवले. आठवड्यात ते सवयीचं होऊन गेलं. श्रावण सुरू झालता आणि घरात बोंबील, चिकन, मासे शिजत होते. आम्ही ते गॅलरीत ठेवून झोपी जात होतो. घुबडं खात होतं, बोका खाऊन जात होता का आम्ही झोपल्यावर आमचंच कुत्रच खात होतं, ते देवालाच ठाऊक. सर्व व्यवस्थित सुरू होतं.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नेमकं सोमवारी त्यातलं एक घुबड घरासमोरच्या अंगणात पडलेलं दिसलं. दोन कावळे त्याच्याशेजारी बसून त्याचे पंख कुरतडत होते. तिसऱ्या मजल्याच्या गॅलरीतून आम्हाला हे दिसलं आणि अंगावरच काटा आला. आधी वाटलं घुबडं मेलं. पण, त्यानं मान वळवली तशी त्याला वाचवण्याची मोहीम सुरू झाली. गंमत म्हणजे, त्या घुबडाला उचलून मी आणि बायको निघालो, त्यावेळी तीस ते चाळीस कावळे किमान दोनशे मीटरपर्यंत आमचा पाठलाग करत होते. फायनली ते घुबड कात्रजच्या प्राणी पक्षी अनाथाश्रमात दाखल केलं आणि निश्‍चिंत झालो. फेसबुकवर समजलं, की जे सापडलं होते ते गव्हानी घुबड होतं आणि इंटरनेटवर माहिती मिळाली की त्याला अपशकुनी म्हणतात. शेजारची आज्जी म्हणाली, रात्रीचं त्या घुबडाचं तोंड पाहणं चांगलं नसतं. आता त्या बिचाऱ्याला काय माहिती रात्रीच्या वेळी माणसाचं तोंड पाहणं आपल्यासाठी अपशकुनी ठरंल म्हणून. 

असो, या घटनेतून एक गोष्ट शिकता आली की, एखादा पक्षी किंवा प्राणी वारंवार तुमच्या नजरेसमोर येत असल्यास समजून घ्या, तुमचं आणि त्याचं काहीतरी कनेक्‍शन आहेच. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT