या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास अभ्यासक, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांची विशेष उपस्थिती होती.  
युथ्स-कॉर्नर

एशियन कॉलेज मध्ये युवा दिनानिमित्त डॉ. शरद गोरे यांचे प्रेरणादायी व्याख्यान.

टीम YIN युवा

पुणे, ता १५ - एशियन कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स येथे युवा दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा आणि विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास अभ्यासक, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि राजमाता जिजाऊसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर मा. डॉ. शरद गोरे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाला सुरुवात झाली. या वेळी पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करत "राजमाता जिजाऊसाहेब आणि आजची तरुणाई" या विषयावर व्यापक दृष्टिकोनातून विचार मांडले. त्यांच्या व्याख्यानातून इतिहासातील महत्त्वाच्या घटना, व्यक्तिमत्त्वे, आणि त्यांचा तरुणाईवर झालेला प्रभाव यांचे अनोखे दर्शन उपस्थितांना घडले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊसाहेबांच्या वेशभूषेतून त्यांची प्रेरणादायी भूमिका साकारत सशक्त विचार मांडले. यानंतर वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गौतम जगताप यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.सुष्मिता निकाळजे यांनी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. साधना होनाळीकर यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेच्या अध्यक्षा मा.डॉ. अनिता साप्ते, सचिव अनिल साप्ते, उपाध्यक्ष आनंद साप्ते, कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सविता सिंग, उपप्राचार्या श्रुती रेगे, वेल्हे कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या स्वाती काळे, (संगणक विभाग प्रमुख) लतिका चामे, (कला शाखाप्रमुख) प्रा.अंकुश जाधव आणि कार्यक्रम अधिकारी प्रा.बी. टी. भारजकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचा समारोप आकांक्षा खंडारे यांनी आभार प्रदर्शनाने केला. हा कार्यक्रम प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे संस्मरणीय ठरला. "इतिहासाची शिकवण घेऊन भविष्यात प्रेरणादायी समाज घडवणे" हा संदेश विद्यार्थ्यांच्या मनावर कोरला गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT