Pune News 
युथ्स-कॉर्नर

Pune News: बावधन येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूटऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये (पीव्हीपीआयटी) 'टेक्नोथॉन २०२३' या कार्यक्रमाचे आयोजन.

टीम YIN युवा

पुणे : 'आझादी का अमृत महोत्सव' या संकल्पनेवर आयोजित केलेल्या या तीनदिवसीय कार्यक्रमात राज्यातील अडीच हजारहुन अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स संचालक (एस आर ओ टी) श्री युसूफ इनामदार यांच्या हस्ते झाले.

या वेळी जेएसपीएमचे संचालक प्रा. अनिल भोसले, संस्थेचे सचिव मा. गिरिराज सावंत, संकुल संचालक डॉ. वसंत बुगडे, प्राचार्य डॉ. आर. एस. पवार, सर्व शाखांचे विभागप्रमुख, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

यावेळी इनामदार यांनी, दैनंदिन जीवनातील अनेकविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांनच्या बुध्दीमत्तेला चालना देण्यासाठी , भविष्यातील भावी अभियंता म्हणून संशोधन करण्यासाठी आणि देशातील उद्योग विकसित करण्यासाठी उपलब्ध असणारे विविध प्रकारचे मार्ग सांगितले.

तसेच टेक्नोथॉन २०२३' हे एक व्यासपीठ असून, विद्यार्थ्यांनी स्वतःचे कौशल्य व ज्ञान यांचा विकास करून आपली उपयुक्तता वाढवावी."

जे एस पी एम ग्रुपचे डायरेक्टर श्री अनिल भोसले यांनी विध्यार्थ्यांना संबोधन करताना, आदरणीय श्री तानाजी सावंत साहेब - आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र शासन व संस्थापक सचिव, जे एस पी एम ग्रुप, पुणे यांच्या संघर्षमय जीवन प्रवास सांगून समाजाच्या कामी आपले जीवन व्यतित करता येते हे सांगितले.

“विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात काम करताना जिद्द आणि चिकाटी बाळगली पाहिजे. कोणतेही काम करून सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

डॉ. आर एस पवार यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. डॉ. रविराज सोरटे, विभागप्रमुख डॉ. नितीन कर्डेकर, डॉ. वि.एम. जोशी, प्रा. गणेश वायाळ प्रसिद्धी समन्वयक प्रा. नवनाथ बागल, प्रा. उदयकुमार फाटक , प्रा. स्वप्नाली घाडगे, प्रा. अक्षदा पाटील, प्रा. जी. पी. जराड व विद्यार्थी प्रतिनिधी यश कारंजावणे, मंथन कुंजीर, राज देशमुख, आशुतोष भोसले यांनी व सर्व शिक्षक प्रतिनिधी यांनी केले.

प्रा. संजय उबाळे व प्रा. प्रणाली काकड यांनी सूत्रसंचालन केले, प्रा. सुरेंद्र कोकणे यांनी आभार मानले.

या वेळी विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमासाठी हिंजेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर व सिनेअभिनेत्री रुचिरा जाधव उपस्थित होत्या. विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध प्रकल्पांना, बक्षिसे देण्यात आली.

Pune News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचाही यादीत समावेश; मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

Marathi News Live Updates: पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षातर्फे सोशल मीडिया प्रबोधन शिबीर

Community Book Bank: ममदापुरात लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेत बुक बँक सुरू; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अवांतर वाचनाचे नवे दालन

SCROLL FOR NEXT