Auto Gear Vehicle
Auto Gear Vehicle Sakal
युथ्स-कॉर्नर

झूम : ऑटो गिअर गाड्यांच्या जमान्यात...

प्रणीत पवार

हल्ली पारंपरिक मॅन्युअल गिअर ट्रान्समिशनपेक्षा ऑटो गिअर वाहनांना जास्त पसंती मिळते. ट्राफिकमध्ये वारंवार क्लच दाबून गिअर बदलण्याची कटकट या ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमुळे राहत नाही. गिअरच्या कटकटीमुळे दुचाकींमध्ये मोटरसायकल घेण्याऐवजी लोक स्कुटी घेण्याला प्राधान्य देत आहेत, हे त्याचेच द्योतक. चारचाकीचेही तसेच. एकदा गाडी सुरू केली, गिअर ठराविक मोडमध्ये ठेवला की, फक्त एक्सिलेटर आणि ब्रेक यांचाच वापर करावा लागतो. त्यामुळे दुचाकींप्रमाणेच चारचाकी गाड्याही ऑटोमॅटिक गिअर ट्रान्समिशनमध्ये घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. या ऑटोमॅटिक गिअर ट्रान्समिशनमध्ये अनेक प्रकार आहेत. याचाच आढावा आपण घेणार आहोत.

ऑटोमॅटिक गिअर बॉक्स

गिअर बॉक्स हा वाहनांमधील महत्त्वाचा हिस्सा. यामध्ये वर्षानुवर्षे अनेक बदल होत गेले आहेत. काही कंपन्या आपापल्या तंत्रानुसार विविध प्रकारचे गिअर बॉक्स कारमध्ये देत आहेत. मॅन्युअल हे पारंपरिक गिअर बॉक्स असून, ज्याचा वापर सुरुवातीपासून होत आला आहे. क्लच पॅडल आणि गिअर स्टिकचा वापर करून या गिअरबॉक्सच्या वाहनांना चालक स्वतः नियंत्रित करतो. ऑटोमॅटिक गिअर बॉक्सचा वापरही अनेक कारमध्ये होतो. या गिअर बॉक्समध्ये गिअर बदलण्यासाठी क्लचच्या जागी हायड्रॉलिक फ्लुईड कपलिंग आणि टॉर्क कन्व्हर्टरचा उपयोग केला जातो. यातील इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट (इसीयू) कारला सहजरित्या चालवण्यास नियंत्रित करण्यास मदत करते.

ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन (एएमटी)

ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशनला ऑटोमेटेड शिफ्ट गिअरबॉक्स (ASG), सेमी ऑटोमॅटिक असेही म्हणतात. या गिअर ट्रान्समिशनच्या कार तुलनेत स्वस्त आणि इंधन कार्यक्षम असतात. हा गिअर बॉक्स मॅन्युअल ट्रान्समिशनप्रमाणेच काम करतो. यातील इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट (इसीयू) गिअर कधी बदलायचे आहे, हे स्वतः ठरवते. या गिअर बॉक्समध्ये रेग्युलर क्लच-गिअरची जुळणी केलेली असते. त्याचबरोबर सेंसर, एक्युटेटर, प्रोसेसर आणि न्यूमेटिकचा वापरही केला जातो. हे गिअर बॉक्स लांबच्या प्रवासात गाडीला चांगले मायलेज देते.

कंटिन्युअस्ली व्हेरिबल ट्रान्समिशन (सीव्हीटी)

सीव्हीटी प्रकारच्या कारमध्ये सोपे तंत्रज्ञान वापरले असते आणि या कारही एएमटीप्रमाणेच इंधन कार्यक्षम असतात. सीव्हीटी हे सहजरित्या गिअर शिफ्ट करण्यात मदत करते. हा गिअर बॉक्स गाडीचा वेग आणि आरपीएमवर (रिव्होल्युशन पर मिनिट) अवलंबून असतो. सीव्हीटी गिअर बॉक्समध्ये शंखाच्या आकाराच्या दोन प्रकारच्या पुलींचा वापर केला जातो, त्यातील एक पुली इंजिनला आणि दुसरी पुली चाकाला बेल्टद्वारे जोडलेली असते. आपण एक्सिलेटर कमी किंवा जास्त देतो, तेव्हा या पुली विस्तारतात आणि त्यानुसार गिअर ऑटोमॅटिक पडतात.

ड्युअल क्लच ट्रान्समिशन (डीसीटी)

डीसीटी गिअर बॉक्सला डायरेक्ट शिफ्ट गिअरबॉक्स (डीएसजी), पॉवर शिफ्ट असेही म्हटले जाते. याचे तंत्र गुंतागुंतीचे असल्याने मेंटेनन्सच्या वेळी अधिक खर्च येतो. हा गिअर बॉक्स ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्शमिशनचा एकत्रित संयोजन (कॉम्बिनेशन) आहे. परंतु यात टॉर्क कन्व्हर्टर दिलेला नसतो. यामध्ये गिअर बदलण्यासाठी दोन वेगवेगळे शाफ्ट दिलेले असतात, ज्यांचा क्लचबरोबर उपयोग केला जातो. अधिक जलदगतीने गिअर बदलले जात असल्याने चालकाला ओव्हरटेकवेळी अधिक हार्ड एक्सिलेटर देण्याची गरज भासत नाही. या गिअर बॉक्समध्ये चालकाला गिअर ऑइल बदलण्याची गरज नसते. परंतु यामुळे क्लचवर परिणाम होतो आणि वारंवार घर्षण झाल्याने त्याचा दर्जा कमी होतो.

इंटेलिजेंट मॅन्युअल ट्रान्समिशन (आयएमटी)

आईएमटी हा एक मॅन्युअल गिअरबॉक्स आहे, ज्याला क्लचची गरज नसते. या तंत्रामध्ये गिअर लिव्हर सेंसरने जोडलेले असते. जो ट्रान्समिशन कंट्रोल युनिट (टीसीयू) ला माहिती देतो की चालक कधी गिअर बदलणार आहे. याचा सर्वांत मोठा फायदा असा, ट्राफिकमध्ये वारंवार क्लच दाबण्याची गरज पडत नाही. मॅन्युअली गिअर शिफ्ट करताना गाडीतील सॉफ्टवेअर क्लचचे नियंत्रण करते. त्यामुळे कार कोणत्याही गिअरमध्ये असली तरी तिच्यावर आपले चांगले नियंत्रण राहते.

ऑटोमॅटिक कारचे फायदे

१) मॅन्युअल ट्रान्समिशनप्रमाणे ऑटोमेटिकमध्ये वारंवार गिअर बदलण्याची गरज पडत नाही. लांबच्या प्रवासात किंवा ट्राफिकमध्ये याचा फायदा होतो.

२) ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये इंजिनच्या गरजेनुसार गिअर बदलले जातात. ज्यामुळे चालक कोणत्याही रस्त्यावर सहज वाहन चालवू शकतो.

३) भारतातील बहुतांश ठिकाणी खराब रस्त्यांवर ऑटोमॅटिक कार चालवणे आणि त्यांना नियंत्रित करणे तुलनेने सोपे असते.

४) जे लोक पहिल्यांदा कार चालवत असतील अशांना मॅन्युअल गिअरपेक्षा ऑटोमॅटिक कार चालवणे अगदी सोपे ठरते.

ऑटोमॅटिक कारचे तोटे

१) मॅन्युअल कारच्या तुलनेत ऑटोमॅटिक कारचा मेंटेनन्स खर्च अधिक असतो.

२) ऑटोमॅटिक कार मॅन्युअलच्या तुलनेत कमी मायलेज देतात. फुल्ली ऑटोमॅटिक असलेल्या कारमध्ये इंधन अधिक खर्च होते. याचा मायलेजवर परिणाम होतो.

३) मॅन्युअल कार ट्राफिकमध्ये आपण हव्या त्या गिअरमध्ये चालवू शकतो. त्यामुळे इंधन बचत होऊ शकते. ऑटोमेटिकमध्ये अशावेळी इंधन बचत होत नाही.

४) ऑटोमॅटिक कारचे गिअर आपण पाहिजे तेव्हा बदलू शकत नसल्याने अचानक एखाद्या गाडीला ओव्हरटेक करताना अडचण येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT