महाविद्यालयीन अध्यक्ष व उपाध्यक्ष   

 
युथ्स-कॉर्नर

पुणे ग्रामीण महाविद्यालयीन यिन अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडी जाहीर

महाविद्यालयात अध्यक्ष पदाच्या घोषणेनंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला

टीम YIN युवा

पुणे, ता. १४ : पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयीन यिन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांच्या निवडी नुकत्याच पार पडल्या. पहिल्या टप्प्यात बारामती, भोर, पुरंदर, इंदापूर आणि दौंड या तालुक्यांतील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी निवड प्रक्रियेत सहभाग नोंदवला.

महाविद्यालयांमध्ये निवडणूक होणार असल्याने उमेदवारांनी जिद्दीने प्रचार केला होता. त्यामुळे कोण निवडून येणार याबाबत उत्कंठा होती. मात्र प्रतिस्पर्धी उमेदवारांनी सामंजस्याने सर्वानुमते बिनविरोध विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

त्यानंतर सर्व महाविद्यालयीन अध्यक्षांची सकाळच्या कार्यालयात विधानसभा-निहाय सामान्य ज्ञानावर लेखी परीक्षा घेण्यात आली. सर्वाधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची ‘प्रति यिन विधानसभा सदस्य’ पदासाठी निवड करण्यात आली.

महाविद्यालयीन स्तरावर यिन क्लबची स्थापना झाल्यानंतर उद्घाटन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना निवडीची पत्रे देण्यात येणार आहेत. तसेच उर्वरित तालुक्यांतील निवडी पूर्ण झाल्यानंतर जिल्हास्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे.

‘प्रति यिन विधानसभा सदस्य’ म्हणून निवड झालेले विद्यार्थी यिन क्लबच्या माध्यमातून प्रशासनाचा जवळून अभ्यास करणार आहेत. त्यासाठी ते तालुक्याचे तहसीलदार, पोलिस उपअधीक्षक, बीडीओ तसेच स्थानिक आमदार यांची भेट घेणार आहेत.

पहिल्या सहा महिन्यांत सामाजिक आणि शैक्षणिक कामांचा अजेंडा तयार करून तो पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक जीवनात सकारात्मक बदल घडण्यास मदत होणार आहे.

यिन क्लबमध्ये सहभागी होण्यासाठी अनिकेत मोरे (मो. नं.७०५८१५११११), आणि निसार पठाण (मो. नं. ९८६०८००१९४) यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EL NINO IMPACT : 'सुपर एल निनो'चा भारतावर काय होणार परिणाम? गेल्या 7 दशकांतील सर्वात तीव्र हवामान बदलाचा इशारा; देशात माॅन्सूनचा पाऊस 14 टक्के कमी!

ढिंग टांग : डीजे : शाप की वरदान..!

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या लढ्यात जरांगे आक्रमक; उपमुख्यमंत्री शिंदे-खासदार जाधवांना निवडणुकीत जागा दाखवण्याचा इशारा

Marathi News Live Updates : 'वसुधैव कुटुंबकम्'चा विचार स्वीकारा; इतरांची सेवा करणे हे आपले कर्तव्य - मोहन भागवत

अर्थवेध : आमचं काय चुकलं?

SCROLL FOR NEXT