युथ्स-कॉर्नर

नववर्षाची धमाल नव्या ॲपसह

ऋषिराज तायडे

आपल्या सर्वांसाठी २०२० हे वर्ष फारच नकारात्मक गेले. कोरोनाचे संकट, पाच-सहा महिन्यांचा लॉकडाउन, घरातूनच करावे लागणारे काम, यामुळे हे वर्ष तणावातच गेले. यंदाचे सर्वच सण आपण साधेपणाने साजरे केले. आता या वर्षातील अखेरचा सण म्हणजे ख्रिसमसही अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा सणही आपल्याला साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. त्यानिमित्त यंदाच्या नकारात्मक वातावरणातून पुढील वर्षाची उत्साहाने सुरुवात करण्यासाठी व्यायाम, वाचन, सुविचार, नवशिक्षण, कामाचे नियोजन, पर्यटनाच्या नव्या संधींबाबत माहिती देणारे ॲप्स तुमच्या भेटीला आले आहेत. त्याविषयी जाणून घेऊया...

मास्टरक्‍लास
आयुष्यात नवीन काहीतरी शिकणे हे नेहमीच उपयोगी पडते. वेगवेगळ्या प्रकारच्या कला, संगीत, व्यवसाय, खेळ याशिवाय अनेक प्रकारचे कौशल्याधारित शिक्षण तुम्हाला घरबसल्या मिळाले, तर ते निश्‍चितच फायदेशीर ठरते. एवढ्या प्रकारचे शिक्षण वेगवेगळ्या ॲपवर शिकण्यापेक्षा एकाच ॲपवर शिकण्यासाठी ‘मास्टरक्‍लास’ हे ॲप निश्‍चितच उपयोगी पडणार आहे. जगातील विविध कानाकोपऱ्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या कला, अभ्यासक्रम तुम्हाला याठिकाणी शिकता येईल. एवढेच नव्हे, विविध क्षेत्रातील मान्यवरांचेही मार्गदर्शन या ॲपवर उपलब्ध आहे.

स्टेपसेटगो
कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन लागल्यामुळे व्यायामशाळा, योगकेंद्र, तरणतलाव बंदच होते. त्यामुळे अनेकांना व्यायाम करता आला नाही. आजही अनेक जण घराच्या घरी किंवा चालण्याचा व्यायामाला प्राधान्य देत आहे. त्याच अनुषंगाने लोकांना चालण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्टेपसेटगो’ हे ॲप निश्‍चित उपयोगी पडणार आहे. हे ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही दिवसभरात किती पावले चाललात त्याची नोंद ठेवते. एवढेच नव्हे, तर तुमच्या पावलांच्या संख्येनुसार तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट्‌सही देते. जितके तुम्ही जास्त चालणार, तेवढे तुम्हाला अधिक पॉइंट्‌स मिळतील. मिळालेल्या पॉइंट्‌सच्या मदतीने ई-कॉमर्स संकेतस्थळावरून खरेदी करताना सवलतही मिळेल.

आय ॲम
दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी झाली, तर संपूर्ण दिवसही चांगला जातो. २०२० या वर्षांतील नकारात्मकता मागे टाकून नव्या वर्षात सकारात्मक विचार करायला आणि नव्या उत्साहात काम करण्याचे प्रोत्साहन देण्यासाठी चांगले विचार नक्कीच प्रेरणादायी ठरतात. त्यासाठी तुम्हाला चांगले सुविचार, थोरांचे मार्गदर्शक विचार तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी ‘आय ॲम’ हे ॲप उपयुक्त आहे. दिवसभरात तुम्हाला किती आणि कोणत्या प्रकारचे सुविचार हवे आहेत, याची नोंद करण्याची सुविधा या ॲपमध्ये दिली आहे. हे ॲप गुगल प्ले-स्टोअर आणि ॲपस्टोअरवर उपलब्ध आहे.

असाना
लॉकडाउनमुळे अनेक महिने घरून काम केल्यानंतर आता नव्या वर्षांत सर्वांनाच आपल्या व्यवसायाची, कामकाजाची नव्याने सुरुवात करायची आहे. कोणतेही काम चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आवश्‍यक असते ते नियोजन. तुमच्या व्यवसायाचा, कामाचा व्याप खूप मोठा असल्यास त्याबाबत नियोजन करताना अनेकदा नाकीनऊ येतात. त्यामुळे सर्व कामाचे नियोजन एका क्‍लिकवर करायचे झाल्यास सोयीचे जाते. त्यासाठी ‘असाना’ हे ॲप निश्‍चितच उपयोगी ठरेल. कामाची रूपरेषा, कच्चा आराखडा, आवश्‍यक मुद्दे, छायाचित्रे, कामांची जबाबदारी, नियोजन हे सर्वकाही तुम्हाला ‘असाना’ ॲपच्या मदतीने सहजपणे शक्‍य होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''केजरीवाल अन् सिसोदिया यांच्याविरोधात एकसारखेच पुरावे कसे? सिंघवींचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

Anil Navgane Attack: ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला, भरत गोगावलेंच्या पुत्रासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

Gautam Adani: कोण आहेत गौतम अदानींचे राईट हँड? डॉक्टर ते उद्योगपती असा आहे प्रवास; चालवतात 20,852 कोटींची कंपनी

SCROLL FOR NEXT